Skip to main content

ती पहाट

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 05/03/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ती देखणी पहाट हासुनी हळूच गाली फुलवीत पाकळ्यांना वार्‍यासवे निघाली दंवबिंदूचे तुषार उधळीत आसमंती थरकून पैंजणाना जणू चालते रति ती रक्तिम ओठ हसरे दिसताच पाखरांना घुमवीत शीळ निघती नादावूनी स्वरांना लयदार चाल बघुनी तिजला फुले म्हणाली घेऊनी गंध वारा कोठे गडे निघाली ? लाजूनी ती पहाट त्यांना हळूच सांगे दिवसाशी घेत असते जुळवून प्रेम धागे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1962
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुरेख..... कल्पना मस्तच आहे :)

खूप छान पहाट. क्रान्ति

अतिशय सुरेख, मन प्रसन्न करणारी कविता...! ती देखणी पहाट हासुनी हळूच गाली फुलवीत पाकळ्यांना वार्‍यासवे निघाली या ओ़ळी तर अतिशय सहजसोप्या, परंतु तेवढ्याच सुरेख,,! तात्या.

छान . लयबध्द आहे कविता.

सगळीच कविता छान आहे. त्यातही, लाजूनी ती पहाट त्यांना हळूच सांगे दिवसाशी घेत असते जुळवून प्रेम धागे या ओळी विशेष आवडल्यात. शुभेच्छा! मुमुक्षु