प्राणप्रिये
लेखनविषय:
काव्यरस
प्राणप्रिये,
सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस ,
अन अंगणातील तुळस झालीस तू.
हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस,
अन मला समाधानाचा गारवा देतेस तू.
प्राणप्रिये,
अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस,
अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू.
जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस,
अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू.
प्राणप्रिये,
सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस,
अन माझ्या घरची परसबाग झालीस तू.
सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस,
अन जीवन माझे रोशन केलेस तू.
प्राणप्रिये,
अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस ,
अशीच या पूढेही करशील ना तू.
जन्मोजन्मी एकत्र राहण्याची तू शपथ घेतलिस,
देतो ग्वाही मी पण , संग राहू मी आणि तू.
प्राणप्रिये,
संग राहू मी आणि तू,
संग राहू मी आणि तू.
वाचने
2962
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
?
अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस ,तर मगअशीच या पूढेही करशील ना तू.असा प्रश्न तिला का विचारावा बरे? अविश्वास की संशय?In reply to ? by रंगीला रतन
:)
माझ्या जीवनाची परसबाग झालीस तू
ऍनीवर्सरी झाली काय इतक्यात?
In reply to ऍनीवर्सरी झाली काय इतक्यात? by तुषार काळभोर
+३००४२०२१
तुम अगर साथ देने का वादा करो ... 'तुळशीबाग' कसे वाटेल ?