Skip to main content

कविता

पैलतिरी..

लेखक प्राजु यांनी शनिवार, 07/11/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा तू नको विचारू! प्रीत आपुली जन्मांतरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. इतुके ओझे अपेक्षांची खांद्यावरती असे भारी किंचित हसूनी जगतानाही कळ उठते हृदयांतरी थोडी होईल गती कमी पण नसेल काही जबाबदारी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. किती संपले किती राहिले, हिशोब सारा यथातथा मनांस वरले मनानेच मग काय कथा अन काय व्यथा? शितल छाया मनांस भावेल, रखरखणार्‍या उन्हापरी सुर्यास्ताच्या साक्षीने मग, भेट होईल पैलतिरी.. नको विचारू कधी, कुठे तू!
काव्यरस

मृगजळ

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 05/11/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तू नाहीस, की जसा पाउसही नाही चातकास मेघाचे दर्शनही नाही हुडकत होतो प्रेमाचा झरा मी नशीबास मंजुर मृगजळही नाही वेड्या मनास साथ असे सुरांची रडण्यास खांदा जवळ एकही नाही आस तुझी अजुनही स्वप्नांस आहे असुनी समोर, डोळ्यांस भासतही नाही मिळता न तु सांग काय करेन मी? "तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही" काव्य 'रिफाईन' प्रोसेसमधे मदतीबद्दल विशेष आभारः श्रामो आणी नाना
काव्यरस

आठवण

लेखक नेहमी आनंदी यांनी बुधवार, 04/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला ते आठवते का सारे? सर्द संध्याकाळी त्या गुंफुनी हात फ़िरलेले तुला ते आठवते का सारे? गर्द चांदण्या आकाशी अन गहिरे ते उसासे तुला ते आठवते का सारे? फुले उमलता प्रितीची मन हळवे झालेले तुला ते आठवते का सारे? पाठमोरा होऊन जाताना पाश सारे तोडलेले तुला ते आठवते का सारे? या देहाच्या धुरातून अश्रु तुझे दाटलेले तुला ते आठवले का सारे? प्रसन्ना जीके १५-१०-०८
काव्यरस

लोटांगण

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 04/11/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू गुरूर देवो सत्यसाईश्वरा धावत आलो दिल्लीवरूनी सरकारा तारा पट्टपुर्थीश्वरा .... विजय जाहला, सत्ता आली 'खाती ' खाती हवी आम्हाला घास मुखीचा निसटू पाहे कृपा असावी पट्टपुर्थीश्वरा ... महान राष्ट्री भाऊबंदकी लोणी हवे सारे आम्हाला सावलीनेच धरला दावा द्या वरदहस्त पट्टपुर्थीश्वरा ... पोहोच तुमची खालवर पुरती हायकमांडही ढाळीते चवर्‍या उद्दंड जाहला जाणता राजा द्या समज त्यासी पट्टपुर्थीश्वरा ... नतमस्तक हो तुमच्यापुढती दास खुर्चीचे पामर आम्ही बुडत्या नौकेस हात द्यावा घ्या दंडवत पट्टपुर्थीश्वरा ... संदर्भ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरुन धावत येवुन सत्यसाईबाबांची

दु:ख

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 03/11/2009 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
दु:ख स्वतःला वेदना होऊ नये म्हणून प्रयत्न करतात रक्त वाहू नये म्हणून पट्टी बांधतात दु:ख दिसले की त्यावर इलाज करतात सज्जन माणसे! पण लोकांना दु:ख दिसत नाही अथवा बंद डोळ्यामागे जागे असते दु:ख!- इथेच सगळी गोची आहे रक्ताने माखलेले सैनिक आक्रोश करणारी लहान मुले भूकबळी, हुंडाबळी, आत्महत्या करणारा शेतकरी खाटिकाकडे बांधलेली मुकी जनावरे सगळे जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा शांत झालेले असते सजलेले, सजवलेले , फोटोच्या चौकटीत असते मोहवणारे असते खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!

आठवतात का ते क्षण तुला?

लेखक झंडुबाम यांनी मंगळवार, 03/11/2009 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतात का ते क्षण तुला? किती सहज विचारले होतेस आवडते का मी तुला? खूप विश्वासाने दिला होता होकार तुला..... कारण वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला. आठवतात का ते क्षण तुला? किनार्‍यावर वाळूत खेळताना,वाळूत आपली नावे लिहिताना, आलेल्या लाटेने फक्त माझेच नाव पुसल्याचे जाणवले होते मला. वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला आठवतात का ते क्षण तुला? एकत्र प्रेमाच्या आणाभाका खाताना ,शेवट पर्यंत साथ देण्याचं वचन देताना का कुणास ठावूक पण आभाळ भरुन आल्याचं आठवय मला. वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला आठवतात का ते क्षण तुला? किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना, पण तेव्हा मात्र धुसर
काव्यरस

वाट पाहतोय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 03/11/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
तु नाही म्हणालीस, ह्या वादळात आणि अश्रुंच्या पुरात, माझ्या मनाने बांधलेले तुझे-माझे आपलं इवलसं घर उध्वस्त झाले पण परसातली रातरानी तशीच आहे, ती वाट पाहतेय, कोणाची ते माहीत नाही अंगनातली बाग वाहुन गेली पण मोगरा तसाच आहे, त्याच्यातली कुठ्ली ही जिद्द माहीत नाही, त्याला कोणाच्या केसांत माळायचे आहे, माहीत नाही अंगणातली तुळस ती पण तग धरुन आहे , का कोणासाठी ते माहीत नाही आणि त्या माझ्या मनातल्या उध्वस्त घराजवळ, आभाळाएवढ माझं वेडं मन इवलसे होउन बसलय, घराकडे येणार्‍या हिरव्या पाऊलवाटेकडे डोळे लावुन, का कोणास ठाउक ...

ऋतूचक्र

लेखक वाचक यांनी सोमवार, 02/11/2009 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतोय मला वसंताच्या चाहूलीत मोहरलेला डेरेदार आंबा घमघमणार्‍या सुगंधाची कोकिळा गातेच आहे अजून माझ्या मनात अजूनही आठवतात मला ते तापलेले रस्ते आणि माझ्या हातात तुझा हात पेटलेल्या गुलमोहरा खालून जाताना अंगावर पडलेला फुलांचा सडा, जळणार्‍या आषाढाच्या पहिल्या पावसानंतरची घमघमणारी ओली माती जमलेच नाही तो मॄद्गंध बंदिस्त करुन ठेवायला मनाच्या कुपीत कधी... पावासाची झड लागलीये बाहेर आत्ताही आणि तेव्हाही असाच कोसळत होता त्या अविरत पडणार्‍या पावसामध्ये शोधतो आहे तुलाच मी, माझ्याही नकळत पानगळीचे दिवस आणि रंगांची उधळण, झाडे कात टाकतायत जुनी, जीर्ण सामोरे जायचेय त्यांना एक नव्या जगण्याला; तयार व्हा

सुरवंट

लेखक कौतुक शिरोडकर यांनी रविवार, 01/11/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू विरलीस पंचमहाभुतात ....... ती वेळ... ती तिथी... मी गोंदलीय माझ्या मनावर..
काव्यरस

मुक्तिदाता

लेखक श्रावण मोडक यांनी शनिवार, 31/10/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
अ-भाव, किर्र, काळा, शून्य, कभिन्न, अंधार! मनांच्या कल्लोळात, इंद्रियांच्या अविष्कारातही उच्चाराच्या अपेक्षेत, उद्गाराच्या प्रतीक्षेतही पाणावलेल्या डोळ्यांत, उकललेल्या पापण्यांतही विरलेल्या विस्मृतीत, दाटलेल्या आठवणींतही सुन्न एकटेपणात, समुहांच्या दाट गर्दीतही, निःशब्द रात्री, अबोल दिवसाही भारलेल्या जन्मकैदेत, आभास अन् अस्तित्त्वाचा अनासक्त मुक्तिदाता काळाकभिन्न अंधार!
काव्यरस