२६/११/२००९
अहवाल, समित्यांमागे वास्तव थंड केले
मेणबत्तीआड डोळ्यांतील विस्तव थंड केले
पाहुनी रण जेव्हा वळल्या मुठी जनांच्या
निषेध खलिता थोपवूनी हातांस थंड केले
जेव्हा उभे राहिले प्रश्नांमागूनी प्रश्न
एका कसाबमागे इतर प्रश्नांस थंड केले
रोखलेली बोटे होतील मुठी म्हणूनी
राजीनामे फेकून त्या बोटांस थंड केले
जेव्हा प्रयत्न केला त्या रात्रीच्या स्मरणाचा
मराठीच्या गदारोळात मेंदूस थंड केले
नव्या सरकारच्या आड 'ते'च जुने मंत्री
'मनसे' देऊन हाती मिडीयास थंड केले
धग चितेची आता उरली आहे स्मशानी
जन पेटणार कसे? त्यांच्या मनांस थंड केले
काव्यरस
मिसळपाव