मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुत्र्याचे शेपूट ...

मनीषा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाठीला बाक, पोटाचा घेर बायको यायच्या आधी, काढून घेतो केर | पगाराचे पाकीट, जन्माची ठेव सत्यधर्म हाच आहे माझा देव || पण काय करू, लक्ष सारखे जाते शेजारणीकडे| आहो, माहीत आहे हो म्हणतात कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे|| लाडका पोर, माझ्या जीवाला घोर उद्योग पाहून वाटे, बरा फाशीचा दोर | परीक्षा, नोकरी - नस्से याच्या गावी, बाय डॅड, हाय मॉम फिरवीत म्हणतो चावी || सरळ सरळ रस्ते दिसती याला वाकडे | आहो, तरी बरं म्हणे कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे || ओढणी मॅचिंग, मॅचिंग चप्पल आधी जाते मंडळात, मग देवळात चक्कर | बाराचा मॅटीनी, सहाची भिशी गाठताना जीव मेटाकुटी येई || कधी वाटे, पुरे आता सोडून जावे सारे | आहो पण करू तरी काय कुत्र्याचे शेपूट... वाकडे ते वाकडे || रस्त्यावर गर्दी, बाजारपेठ भरली काकू, मावशी, आत्या, मामी दुकानी हरवली | पॉपकॉर्न चा वास, जीन्समधली ती एक खास कसले कसले आज होतायत हे भास? || बायको सारखी सारखी काय बोलतेय, न कळे | आहो, माहीत नाही का तिला? कुत्र्याचे शेपूट, वाकडे ते वाकडे || दिवाळीची फराळ पार्टी, हॉटेलात केली पाडव्याची गुढी, व्हर्च्युअलच लावली | सासूबाईंना म्हणले कामं करा थोडी पुजा मी करते, मग वाचते पोथी || मंत्रजप करताना, मॅनेज करते सारे | आहो, तुम्हीच सांगा काय करू? कुत्र्याचे शेपूट ... वाकडे ते वाकडे ||

वाचने 2026 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मनीषा 13/10/2010 - 20:25
धागे जिर्णोद्धार मंडळाच्या सदस्यांचे विशेष आभार !