या अशा कुंठीत वेळी
लेखनविषय:
काव्यरस
एकही कविता आताशा
काळजाला भिडत नाही
शब्द मोहक विभ्रमांनी
भ्रमित आता करीत नाही
कोरडा असतो किनारा
लाट फुटते मत्त तरिही
जखम होते खोलवर पण
रक्त आता येत नाही
प्रार्थनांचे मंत्र निष्प्रभ,
बीजअक्षर श्रांतलेले
भंगलेल्या देवतांना
आळवूनी भ्रष्टलेले
मार्गदर्शी ध्रुव अन्
सप्तर्षी आता लोपलेले
दीपस्तंभांचे दिवेही
भासती मंदावलेले
या अशा कुंठीत वेळी
दाटुनी येते मनी
विफलता, जी रोज उरते
रोमरोमा व्यापुनी
एक आशा तेवते या घनतमी रात्रंदिनी
शृंखला पायातल्या तुटतील कधितरी गंजुनी
वाचने
3641
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मस्त टिपली आहे मनोवस्था...
हे खूप आवडलं
कोरडा असतो किनारा
जखम होते खोलवर पण रक्त आता येत नाही
प्रतिसाद देणार्या
चांगली रचना.
हेच हवं
मस्त!