Skip to main content

सुरुवात....

लेखक पक पक पक यांनी मंगळवार, 19/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सरळ चंद्रावर नेणारं बुंबाट अंधुक वातावरण, कानठ्ळ्ळ्या बसवणारा डिजेचा खण्खणाट , गुदमरवुन टाकणारी धुराडी अन चखण्याचा वास , आणि या सगळ्यांना सामावणारा असतो एक बार..... ..........असंच बनतं सगळं .... ......... आधी दीर्घ श्वास आणि मग…. एक लार्ज पेग... !! आतमध्ये शिरताना झालेली चलबिचल . ऑर्डर देताना झालेला गोंधळ , आ वासुन ऑर्डरची वाट बघणारे तुझे डोळे , आणि पांढऱ्याशुभ्र कपड्यातल्या कॅप्ट्नची नजर चुकवताना ..... अशी झाली ती पहिली भेट ..... ...सोड्याची बाट्ली आणि तिथे .... एक लार्ज पेग...!! बोटातली सिगारेट ओठात सारताना तू , फुंकुन फुंकुन दमल्यावरही मारलेला गोल्ड्न कश , खारेदाणे अन चकल्यांनी वाढलेली रंगत , आणि तुझ्या ग्लासातला फसफसणारा सोडा .... असंच घडलं सगळं ...... थरथरणारा हात आणि तरीही .....एक लार्ज पेग ...!! तर्र झालेले पाणीदार डोळे , अडखळणारे असंबद्ध शब्द , अन आकलन न होणारा विषय , तुला लपवता न आलेल तुझ्या आउष्यातल गुपीत .... असंच जमलं आपलं ..... नि:शब्द झालेलो आपण आणि आपल्या सारख्याच इतरांनी प्यायलेला .......एक अन एक पेग ...!!!! लेखनविषय::
लेखनविषय:

वाचने 1345
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

का रे बाबा !!! माझ्या चहा चा ...पेग करून टाकलास ..... .....चहा इतका आवडला तर चहा च प्यायचा !!!.असो!!!!

सुरुवात भन्नाटच झालेली आहे. आता प्रतिक्षा शेवटाची ;-).

In reply to by पक पक पक

विडंबनाची प्रेरणा दोन भागांत आल्याने असे वाटले की विडंबनही दोन भागांत येईल. शेवट कसाही असो स्वीकारायची तयारी आहे ;-).

कभी खुशी कभी गम, कभी देशी कभी रम :)) चांगलीच झिंग चढलेली दिसतेय की ओ :))