चाफा बोलेना, चाफा चालेना...
'चाफा बोलेना, चाफा चालेना' हे गाणं कितीदा ऐकलंय.
लतादिदींचा स्वर अाणि टिपिकल भावगीताचं संगीत...
र्याचदा असं वाटलं की प्रेमगीत अाहे.
पण कधी गाणं पूर्ण कळलं नाही.
काहीतरी मिस होतंय असं वाटंत राहिलं.
पूर्ण कविता मिळवून वाचली तर गुंता अजूनच वाढला.
मग कवीबद्दल शोध घेतला.
ही कविता 'नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२-१९४७)' यांची अाहे. ते 'बी' या टोपणनावानं लिहायचे.
मग गाणं ऐकताना कधीतरी हे सुचलं -
मला वाटतं या कवितेत 'बी'यांनी अापल्या काव्यनिर्मीतीची प्रक्रिया सांगितली अाहे.
'चाफा' हे कवीच्या कवितेचं, काव्यप्रतिभेचं प्रतीक अाहे. ही कविता समजण्याासाठी या कवितेचा फॉर्म समजणं हेही महत्वाचं अाहे.
ही कविता म्हणजे त्यांच्या कविमनाचं त्यांच्या कवितेशी असलेलं हितगुज अाहे.
कविता सुचण्यामागची काव्यप्रेरणा, सृजनाची प्रक्रिया कशी अाहे हे या कवितेतून समजतं. कवी यातून अापल्या कवितेचा शोध घेतो.
"चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना", इथं न बोलणारा, न चालणारा, खंतावलेला 'चाफा' म्हणजे रुद्ध झालेली काव्यप्रतिभाच!
पहिल्या दोन कडव्यात -
"गेले अांब्याच्या वनी, म्हटली मैनसवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून,
गेले केतकीच्या बनी, गंध दर्वळला वनी, नागासवे गळाले देहभान"
हे म्हणताना कवीचं मन काव्यप्रतिभेला साद घालतं. काव्यनिर्मितीसाठी लागणारी प्रेरणा इथं व्यक्त होते. या कडव्यातले 'अाम्ही' कोण तर ते अाहेत - कवीमन अाणि त्याची काव्यप्रतिभा! हे दोघे कवितेचा बहर यावा यासाठी वेगवेगळ्या प्रेरणांचा शोध घेतायंत अशी कल्पना इथे अाहे. मूळ कवितेतली यापुढंची चार-पाच कडवी वाचली हा काव्यप्रेरणेच्या शोधाचा प्रवास दिसू लागतो.
कवीमन पुढं म्हणतं - 'हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण, उणे करूं आपण दोघेजण'.
अर्थात, या विश्वात, या जगरहाटीत अशा अनंत प्रेरणा अाहेत ज्या कविता फुलवू शकतात.
पण पुढच्या कडव्यात कवी त्याच्या कवितेचं ध्येय, प्रेरणा काय अाहे हे व्यक्त करतो. तो म्हणतो -
'जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे आपण करु शुद्ध रसपान रे'.
कवी म्हणतो की मानवी मन विश्वाच्या बाह्यरुपाकडं, भौतिकतेकडं, वैषयिकतेकडं सहज अाकर्षित होतं. पण 'शुद्ध रसपान' हवं असेल तर भौतिकतेला सोडून परमात्म्याचा वेध घेण्याचा ध्यास मनानं घ्यायला हवा. कवीला असं वाटतंय की त्यासाठी त्याच्या काव्यप्रतिभेनं परमात्म्याचा ध्यास घ्यावा. हे ध्येय जितकं उच्च तितकंच दैवी!!!
पण यापुढं कवी जे म्हणतो ती खरी कवीकल्पना - 'दिठी दीठ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून, अंगी रोमांच आले थरथरून'
यांत 'दिठी' म्हणजे दृष्टी! कवी म्हणतो, माझी दृष्टी, माझं मन जेंव्हा परमात्यात विलिन होईल तेंव्हा ही लौकिक जगाची 'गात्रं' गळून पडतील अाणि मग माझ्या कवितेचं जे अंतिम ध्येय अाहे ते साध्य होईल.
इथं कवितेचं शेवटचं कडवं - "चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी - चाफा! कोठे दोघेजण?"
कवी म्हणतो, माझी काव्यप्रतिभा अशी फुलून यावी की तिच्या जोरावर मुक्तिचं ज्ञान मला मिळावं. त्या ज्ञानाच्या तेजानं सगळया दिशा अशा उजळून जातील की मी-माझं काव्य असे अाम्ही दोघे वेगळे राहणारंच नाही, हा 'मी'पणाचा भेद संपून जाईल अाणि माझं काव्य परमात्यात विलिन होईल, वैश्विक होईल.
याद्या
12999
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
चांगला प्रयत्न
+१
In reply to चांगला प्रयत्न by कवितानागेश
साहित्यसम्राट आचार्य अत्रे
मला पण हवे आहे....
In reply to साहित्यसम्राट आचार्य अत्रे by स्पार्टाकस
मीही वाचले नाही. शक्य असल्यास
In reply to मला पण हवे आहे.... by मुक्त विहारि
रसग्रहण छान
ज्ञानेश्वरांवरील कविता
+११११
In reply to ज्ञानेश्वरांवरील कविता by देशपांडे अमोल
सुरेख
surekh
धन्यवाद
चांगलं लिहिलंय
आवडत्या कवितेचं सुंदर रसग्रहण
छान रसग्रहण
छान लेख
चाफा बोलेना ही काव्यनिर्मीतीची प्रक्रिया नाही
बाय द वे,