Skip to main content

रुसवा

रुसवा

Published on सोमवार, 23/02/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
बरं नाई हे रुसनं मुकं मुकाट बसनं डोया भिळूनं डोयातं थोळं गालात हासनं असा कसा हा रुसवा होटं टाकला शिऊनं नको धरुस अबोला देतं काऊनं भिऊनं ? लाली दिसते साजरी तुह्या फुगल्या गालाची कायं फिकीरं सांगना तुले माया या हालाची ? अशी लाळा ची तू मैंना तयं हातावर्ला फोळं लाऊ जीवं मी कितीकं सांगं कायं तुले थोळं ? बस्सं झालं पुरं झालं चाल्ला जीवं खोलं खोलं देनं सोळूनं रुसवा आता बोलनं गोळ गोळं
लेखनविषय:

याद्या 5829
प्रतिक्रिया 25

कविता आवडली. शेवटची ओळ वाचून 'सोनू, तुला भरवसा नाही काय' हे लोकगीत आठवले :-) .

अशी लाळा ची तू मैंना तयं हातावर्ला फोळं लाऊ जीवं मी कितीकं सांगं कायं तुले थोळं ?
अतिशय सुंदर... पार आतून आलेली दिसतेय...

मस्त वाटत राव तुमच्या कविता वाचताना! :)

In reply to by शब्दबम्बाळ

अन् मला तुमची प्रतिक्रिया वाचून ..

वर्‍हाडी बोली ना ही? छान वाटली कविता!

मस्त. आवडली कविता. गोनीदांची 'पूर्णामायची लेकरं' वाचल्यापासून वर्‍हाडी बोली अधिकाधिक आवडायला लागलीय.

:HAPPY:

लाली दिसते साजरी तुह्या फुगल्या गालाची कायं फिकीरं सांगना तुले माया या हालाची ? झ-का-स ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राती... अर्ध्या राती... असं सोडुन जायाचं न्हाय ! ;) { बेLa }