अवेळी असे मेघ दाटून येता
जुन्या वेदनांनी पुन्हा पाझरावे.
जरी कष्ट झाले विसरण्यास ज्याना
जुन्या त्या क्षणांना पुन्हा आठवावे.....
कितीदा पडावे, कितीदा वहावे
धडे अनुभवांचे किती साठवावे.
किती आर्जवे अन किती ती प्रतीक्षा
किती चातकाने मना समजवावे ....
पुरे ओढ वेडी घनांची अनावर
दुरूनी अता पावसा न्याहळावे..
जपावा मनातील पाऊस थोडा
परी भावनांच्या पुरा थोपवावे....
अवेळी असे मेघ दाटून येता
मनाच्या नभाला जरा आवरावे....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4559
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि
In reply to सुंदर by भिंगरी
कविता ज्याम आवडली... आताही
In reply to तुमच्या या प्रश्नाने 'संक्षि by संदीप डांगे
आवडली!
+१.
In reply to आवडली! by एस
सुरेख कविता.बाहेर अवेळी पाऊस
मस्त
धन्यवाद!
In reply to मस्त by चाणक्य
अतिशय आवडली.
खूप छान!
+१
In reply to खूप छान! by शब्दबम्बाळ
कितीही आवर घातला तरी पाऊस लिहायला भाग पाडतोच !
सहमत. आवडली कविता. -दिलीप बिरुटेवा!!
खूप आवडली कविता.
मस्त
+१
In reply to मस्त by मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तं आहे कविता!
ह्या ओळी
सुंदर रचना!!
मस्तय!!!
धन्यवाद मित्र हो!
सुंदर कविता-