तू.....
लेखनविषय:
काव्यरस
तू समोरून अलवार चालत यायचीस
मी उगाचंच रानफुलं वेचत रेंगाळायचो
पैंजणांची रुणझुण पुढे निघून जायची
मागे खच पडायचा पाऊलभर स्वप्नांचा
तू पावसात आडोसा पाहून थांबायचीस
मी मुद्दामचं भिजत पुढे निघून जायचो
काकणांची किणकिण कानाआड व्हायची
मागे ढीग पडायचा सकवार निःश्वासांचा
तू जराही वळून न पाहता निघून जायचीस
मी नुसताच थिजून पाहत राहायचो शून्यात
डोळ्यांच्या कडांवर मळभ दाटून यायचे
मागे सडा पडायचा ओंजळभर आसवांचा
मी धीटपणे कधी पाहू शकलोचं नाही तुला
आताशा तुझा चेहराही नीटसा आठवत नाही
नाकातील चमकी मात्र चमकत राहते अधे-मध्ये
आणि नुसताच गंध येत राहतो कडवट रानफुलांचा
#चक्कर_बंडा
वाचने
4633
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान!
In reply to छान! by राघव
धन्यवाद.....
सुंदर
In reply to सुंदर by चांदणे संदीप
धन्यवाद.....
व्वा
In reply to व्वा by कर्नलतपस्वी
:-) वयाने माहीत नाही पण
मस्त लिहिली आहे
In reply to मस्त लिहिली आहे by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद....
वाह, खुप सुंदर
In reply to वाह, खुप सुंदर by Bhakti
मनापासून आभार
छान!
खूप आवडली हि कविता...
सगळ्यांमधे एकच नमस्कार कर...
In reply to सगळ्यांमधे एकच नमस्कार कर... by ज्ञानोबाचे पैजार
:-) समजलं पैजार बुवा.....
सुंदर!
खूप छान कविता! आवडली!!
In reply to खूप छान कविता! आवडली!! by श्रीगणेशा
गूढ वगैरे काही नाही, स्वभाव