झोंबू लागे सुखद गारवा, मंदसा पाऊस झाला
जाऊ या लोणावळ्याला, सखीस इशारा केला
.
मारली दांडी ऑफिसला, अन तिने हि कॉलेजला
ठरे भेटायचे ,सकाळीच, जिमखान्याच्या स्टॉपला
.
लो वेस्ट जीन वर, स्लीव्हलेस टॉप शोभत होता
तिच्या मधाळ स्मिताने ,मूड रोम्यान्टीक होता
.
नेली फटफटी पंपावर, म्हटले कर टाकी फुल्ल
सुटे गाडी भन्नाट,बुंगाट .असे वातावरण कूल
.
चाले रस्ता ,धावे रस्ता, गावे मागे पडू लागली
टेकले उरोज पाठीला, मिठी तारुण्याची घातली.
.
लय भारी, क्षण भारी, रक्त तारुण्याचे सळसळे.
पुणेमुंबई रस्ता आहे , थांबव हे यौवनाचे चाळे
.
घालून हातात हात ,मस्त हिंडलो लोणावळ्याला
केले, न सांगण्याजोगे, माहीत आमच्याच मनाला
.
परतिचा