||इदं न मम||

लेखनविषय:
||इदं न मम|| भरली ओंजळ पूर्ण अगदी पूर्ण रिकामी करताना, चार पावलं सोबत चालून पुन्हा मागे येताना, उचलून घेतलं फूल पुन्हा मातीत ठेवताना, शब्दांची साथ सोडून समंजस मुकं होताना, डोळ्यामध्ये उगा कुणी पाणी आणू नये. मनामध्ये उगा तेव्हा त्रागा करू नये. हस-या मुखाने, भीष्माच्या अलिप्तपणाने अनुभवलेली ओल, गंध, स्पर्श वा अर्थ आठवावे. आणि तृप्तपणे म्हणावं, इदं न मम| इदं न मम|

जेल भरती

लेखनविषय:
https://www.lokmat.com/mumbai/during-the-ongoing-written-examination-in-the-mumbai-police-force-it-was-seen-that-the-candidates-competed-in-different-forms-for-the-copy-a-a941/ पोलीस भरती आधी बेड्या? अरे हे काय केलस रे वेड्या?! भरती-पेपर मधे केलीस काॅपी तुला तर घालायची होती खाकी! पेन मधे ठेवले सिम कानात उपकरण, ही कसली रे थीम हे काय प्रकरण? अरे खुळ्या ते आहेत पोलीस तू मात्र अक्कल ठेवली ओलीस आता सुन्न, पहातोय जेल काहीतरी शिकाला पाहीजेल.

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

लेखनविषय:
काव्यरस
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी. वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी. दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी. पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.

जोकशाही

लेखनविषय:
हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री सामान्यांच्या हाती वाणसामानाची जंत्री भाडोत्री बँडवाले अन् भाड्याचे वाजंत्री आकड्यांची कुतरओढ लोक'शाई'ची जोकतंत्री लोकल ला अजून लटकतात ट्रॅफीकमधे अजून अटकतात तरुण नोकरीसाठी भटकतात शेतमाल दलाल अंग झटकतात ह्याची वटवट की त्याची खटपट सिहासन चित्रपट कि राष्ट्रपती लागवट?! हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री जनतेला पडत नाही फरक. त्यांना रोजचाच झालाय समस्यांचा नरक !!

जोकशाही

लेखनविषय:
हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री सामान्यांच्या हाती वाणसामानाची जंत्री भाडोत्री बँडवाले अन् भाड्याचे वाजंत्री आकड्यांची कुतरओढ लोक'शाई'ची जोकतंत्री लोकल ला अजून लटकतात ट्रॅफीकमधे अजून अटकतात तरुण नोकरीसाठी भटकतात शेतमाल दलाल अंग झटकतात ह्याची वटवट की त्याची खटपट सिहासन चित्रपट कि राष्ट्रपती लागवट हा मुख्यमंत्री की तो मुख्यमंत्री जनतेला पडत नाही फरक. त्यांना रोजचाच झालाय समस्यांचा नरक !!

एकदाच काय ते बोलून टाकू

लेखनविषय:
होळीच्या पूर्वसंध्येवर एक हलकीफुलकी कविता लिहिली होती. खास पुणेकर प्रेमींसाठी, यात बरेचसे पुण्याचे संदर्भ आहेत.

तू जाताना...

लेखनविषय:
काव्यरस
अश्रू जरा ओघळले तू जाताना ना शब्द ओठी फुटले तू जाताना... जलप्रलय यावा तैसा पूर नदीला आभाळ ही कोसळले तू जाताना... ती रात होती पुनवेची तेव्हा ही का चांदणे ना पडले तू जाताना...? हे वेदनेचे काटे रस्त्यातूनी ना फूल कोठे फुलले तू जाताना... उधळून जीवन गेले तेव्हा माझे वादळ जरासे उठले तू जाताना... ही वेस ओलांडूनी गेलीस तसे आधार सारे तुटले तू जाताना... दीपक पवार.

धूप के लिए शुक्रिया का गीत (मराठी रूपांतर)

लेखनविषय:
माझे कुटुंब खूप मोठे आहे आंब्याची सहा झाडे आहेत दोन जांभळाची एक लीचीचे झाड आहे आणि चार कदंब वृक्ष माझ्या कुटुंबात माझी आई आहे बाबा आहे आजोबा आहेत कुटुंबात दोन म्हशी आहेत आणि एक गाय एक काळा कुत्रा देखील आहे आम्ही तीन बहिणी आहोत भाऊ अजून झाला नाही (चुनी कुमारी, इयत्ता सातवी) [मिथिलेश कुमार राय यांची ही कविता अंतिका प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'धूप के लिए शुक्रिया का गीत' या संग्रहातील आहे. मराठीकरण करण्याचा पहिलाच प्रयत्न काही चुकल्यास क्षमस्व !

कुणासारखी तू, कुणासारखी...

लेखनविषय:
काव्यरस
कुणासारखी तू, कुणासारखी कधी वागते ना मनासारखी. तू जळासारखी तू पळासारखी रंगीत गंधीत फुलासारखी. तू परीसारखी तू सरीसारखी धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी. गोड स्वप्नापरी कि तू स्वप्नपरी निघून जाणाऱ्या पळासारखी.

पत्र

लेखनविषय:
पत्र तुझे वाचत असताना नटखट शब्दांपाशी अडतो गाभुळलेल्या चिंचेचा मग स्वाद जिभेवर उगा उतरतो पत्र तुझे वाचत असताना अडतो अनवट शब्दांपाशी मग ओळींच्या अधली मधली लड उलगडते जरा जराशी तुझे पत्र वाचत असताना अडतो शब्दांपाशी अवघड शब्दांच्या घनदाटामध्ये अर्थाची मग होते पडझड
Subscribe to कविता