मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी

Deepak Pawar · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आसवांचे थेंब येता तुझ्या गालावरी दाटले आभाळ हे बरसुनी गेल्या सरी. वादळे येतील तेव्हा नको तू घाबरू दुःख सारी ती तुझी उधळ तू वाऱ्यावरी. दाटुदे अंधार सारा जरी हा भोवती नांदतो हा चांद आता तुझ्या भाळावरी. पूस डोळे हास, ढाळू नको ही आसवे आसवांचा थेंब ना शोभतो गालावरी. हात घे हातात हा सोड साऱ्या वंचना ठेव तू विश्वास आता सखे माझ्यावरी.

वाचने 3878 वाचनखूण प्रतिक्रिया 11

गवि Sun, 05/07/2023 - 19:48
कविता छान आहे. त्यातील भावना छान आहेत. ती वाचून दोन दोन शब्दांत ती पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करावासा वाटला. त्यावरून ती कल्पना सुंदर आहे हेच अधोरेखित होते. उदा. खालील काहीसे : आसवांचे थेंब तुझ्या गालावर दाटले आभाळ कोसळली सर वादळ येता भीती विसर दुःखे सारी लोट वाऱ्यावर लिहीत रहा.