Skip to main content

भूत

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
डोईवर माझ्या नाही टोपी तरी जगण्याची रीत सोपी नाही ... खांद्यावर माझ्या नाही जरी झेंडा कधीमधी दांडा तिरडीचा... हातामधी माझ्या नाही तलवार कसे झेलू वार देव जाणे... पायामधी माझ्या उरले ना त्राण आवरतो प्राण कंठाशी खिळले... मला नाही ठावे काय माझी जात तरी नाही जात भूत ते भयाचे...
लेखनविषय:

वाचने 3019
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आह्ह्ह्ह, जब्बरदस्त. आवडली एकदमच.

हातामधी माझ्या नाही तलवार कसे झेलू वार देव जाणे...!! विशेष आवडलं

कविता बरीच गंडलीये पण इथे सगळे प्रतिसाद छान छान आलेत!! वार झेलायला ढालही वापरली नाहिये.... नवीन टेक्निक असणार बहुतेक! मीच गंडलोय बहुतेक.... अभ्यास वाढवायला एक मोठ्ठा लिखाणब्रेक घ्यावा लागणारे परत! :(( Sandy

In reply to by चांदणे संदीप

शिंगे रंगविली,बाशींगे बांधली अशी वाटली, थोडी इस्त्री करायला पाहिजे होती. ही ती कविता
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली चढविल्या झुली, ऐनेदार राजा परधान्या, रतन दिवाण वजीर पठाण, तुस्त मस्त वाजंत्री वाजती, लेझिम खेळती मिरवीत नेती, बैलाला गे दुल दुलतात, कुणाची वशींडे काही बांड खोंडे, अवखळ कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे पिवळे तांबडे, शोभिवंत वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा सण बैल पोळा, ऐसा चाले जरी मिरवीती, परि धन्या हाती वेसणी असती, घट्ट पट्टा झुलीच्या खालती, काय नसतील आसूडांचे वळ, उठलेले आणि फुटतील, उद्याही कडाड ऐसेच आसूड, पाठीवर सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर, ओढायाचे.

In reply to by नाखु

नाखुकाका, मस्तच कविता आहे ही! कुणाची आहे??

In reply to by चांदणे संदीप

नको, नको. तू ब्रेक मारु नकोस. आमच्या काही योजनाअंतर्गत प्रतिसाद आहेत. तू पेपर लिहित राहा. अभ्यास पुरेसा आहे तुझा. ;)

संकल्पना चांगलीच आहे... पण मीटरमध्ये असली असती "६-६-६-४" च्या तर अजून मजा आली असती... (अर्थात मला कवितेचे तंत्र फारसे माहित नाही... पण असंच वाटलं) कृहघ्या