मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नशीब...

राजेंद्र देवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
नशीब... जागोजागी फाटले नशीब किती ठिगळे लावू विरणावर काय काय भोगले हे न आठवे नाही विश्वास आता स्मरणावर आयुष्यभर रडत होतो कोण रडेल माझ्या मरणावर आजवर जळत राहिलो तरी टाकिती सरणावर राजेंद्र देवी

वाचने 1802 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चांदणे संदीप Mon, 10/17/2016 - 09:29
विण्टरेस्टींग!! कसा पडलो या जगी माथी घेऊन निराशा स्वतः पाडाव्या लागती तळहातावर रेषा! Sandy

कवि मानव Mon, 10/17/2016 - 13:43
खूप छान आशय आहे कवितेचा .... तुमच्या कवितेने ४ ओळी सुचल्या, हयात असता अंतर ठेवती, गर्जे मध्ये दुर सारिती, जिथे माणूस होतो "देव" मेल्यावर, काय तरी उपयोग अश्या जाण्यावर !!