मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग़ज़ल - म्हटलेच होते

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
२१ मार्च हा जागतिक कविता दिन आहे. म्हणून एखादी ताजी कविता आपणही टाकू म्हटलं. म्हटलेच होते... होय दगडाला ह्रदय म्हटलेच होते नाइलाजाला सवय म्हटलेच होते धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते एक मिटते वाट अन खुलतेही एक प्रीतिच्या अस्ता उदय म्हटलेच होते वाटली होतीच भीती या क्षणाची मी मनाला 'हो अभय' म्हटलेच होते वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते - अपूर्व ओक २०-३-१७

वाचने 4639 वाचनखूण प्रतिक्रिया 18

समाधान राऊत 21/03/2017 - 17:12
धीर देती ते जणु हरलो पुरा मी मीहि हरण्याला विजय म्हटलेच होते

निनाव 21/03/2017 - 17:52
//वाहुनी गेलो कधी नकळे अपूर्व आसवांना मी प्रलय म्हटलेच होते // हे खूपच आवडली कविता.. खरे तर गजलच.

In reply to by स्रुजा

वेल्लाभट 22/03/2017 - 07:30
धन्यवाद
तुझी सवय ( का नाईलाज ;)
असं नाही काही. ग़ज़लेत शेवटच्या शेरात 'शायर का तखल्लुस' असण्याचं चलन म्हण, पद्धत म्हण, स्टाईल म्हण पूर्वीपासून आहे. अशा आणि प्रामुख्याने शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात. माझा आपला तसा प्रयत्न असतो इतकंच. :)

चतुरंग 21/03/2017 - 23:34
वेगळीच आहे गजल. आमचा नजराणा इथे आहे! ;) -रंगा

विशाल कुलकर्णी 22/03/2017 - 19:03
सुरेख गझल ! राग येणार नसेल तर एक सुचवू? शक्यतो सुट घ्यायचा मोह टाळता येतो का पाहा. मीहि, प्रीति यात हि किंवा ति हे दीर्घ हवेत. फार काही फरक नाही पड़त पण गझलेचा निर्दोषपणा कमी होतो. आगावूपणाबद्दल क्षमस्व _/!\_