(ही कुणाचीच कैफियत नाही. हा आहे फक्त एक प्रयत्न, अनेक वर्षे जे पाहिले आणि त्यातुन जे जाणवले, ते शब्दात मांडण्याचा. वाचा, वाटले तर विचार करा, वाटलेच तर नजरेआड करा. माझे असे काहीच म्हणणे नाही. अन्यत्र पुर्वप्रकाशित झालेल्या माझ्याच लेखावर आधारित असे हे लिखाण आहे.)
त्याचे नाव बहुधा राम असावे, किंवा रहमत, किंवा रफाएल! रामशरण असेल नाहीतर रणबीरसिंग. असो! आपल्याला काय त्याचे. तसे त्याच्या घरचे लोक आणि काही जिवलग सोडले तर कुणालाच त्याच्या नावाशी काहीच घेणेदेणे नाही.