Skip to main content

कथा

महाबळेश्वर ते कास... चालत...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 05/08/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मित्र यशदीप साताऱ्याचा. त्यामुळं मी बऱ्याचदा साताऱ्याला जात असतो. साताऱ्याच्या आसपास भरपूर भटकून झालयं. अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास, बामणोली, जरंडा, नांदगीरी (कल्याणगड), सूळपाणी, मेरुलींग, पाटेश्वर, माहुली असं बरचंस भटकलोय. पण कासची मजा वेगळीच. केवढं ते पठार!!! मस्त बेभान वारा असतो; आणि गर्दी, गोंधळ अजीबात नसल्यामुळं फारच निवांतपणा जाणवतो. पाऊस संपत आल्यावर बारीक-बारीक रंगीबेरंगी गवतफुलं बघतानातर जणू जमीनीवर रंगीत गालीछा अंथरल्या सारखं वाटतं. असंच एकदा कासच्या पठारावर असताना... यशदीप: पश्या...

पाडव्याची साडी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 03/08/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेतील पत्रांचा परीचयः मोहनराव आणि विणाताई : मध्यमवयीन .४७ ते ५० दरम्यानचं वय. संजय आणि निलू : मुलगा आणि सून जनरल :पैचान कौन? तशी घराघरात घडणारी कथा .पण निसर्गाला थोडसं गृहीत धरण्याची चूक कोण करत नाही ? वयाचा आडपडदा निसर्ग ठेवत नाही हे खरं एक छोटीशी चूक किती मोठं रूप धारण करते हे सांगणारी कथा. या कथेतील डी&सी चा अर्थ गूगलवर बघावा.----------------------------------------- मोहनराव : हे आक्रीतच.

शरदाचं चांदणं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 03/08/2009 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
गांवाला आमच्या शेजारीच शरदचं घर होतं आणि त्याच्या शेजारी त्याच्या काकांचं घर होतं.आम्ही सर्व मुलं त्याच्या काकांच्या घरी खेळायला जायचो.हे मला पक्कं आठवतं. शरदची राहणी अगदी साधी पण विचारसरणी मात्र उच्च होती.त्यावेळी त्याच्या सहवासात असतानाच त्याच्या ह्या वृत्तीचा मला पडताळा आला होता.शरद मुळातच गरीब स्वभावाचा होता.दुसर्‍याच्या भावना आपल्या कडून दुखवल्या जाऊं नयेत म्हणून तो पराकाष्टा करायचा हे माझ्या नजरेतून चूकलं नव्हतं. आता मला भेटला तेव्हा मला आमच्या बालपणाची आठवण प्रकर्शाने जाणवली. मी शरदला म्हणालो, "मी माझ्या लहानपणी तुझ्याकडून खूप शिकत होतो.

तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात(ईडंबनात) नाही.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 31/07/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या त्या (अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.

सायकलवर नीळकंठेश्वरला...एकटाच...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 31/07/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला सायकल चालवायला जाम आवडतं. सायकल असली, की उगीचच पैसे आणि इंधन न जाळता आपल्या सोई नुसार हवं तीथं वेळेत पोचता येतं. सायकलवर एखादा घाट चढताना जाम दमून घाटमाथ्यावर पोचण्याचा आनंद वेगळाच असतो. मग हँडल वरचे हात सोडून घाट उतरण्याचा रोमांच तर भारीच (हा प्रकार करताना लहानपणी एकदा जाम वाईट आपटलो होतो... त्याच्या खुणा अजूनपण कपाळावर आणि गुढघ्यावर आहेत...). तर गेल्या पावसात एका weekend ला आराम करायचा बेत होता. मग शनीवार काहीतरी वाचण्यात आणि टेकडीवर भटकण्यात घालवला. उद्या कुठंतरी भटकायला जायला पाहीजे असं शनीवारी रात्री वाटायला लागलं.

"बट-शेवंतीची फुलझाडं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 24/07/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे,आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची. मी कर्णिकांना म्हणालो, "हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?" मला दादा कर्णिक म्हणाले, "गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-reality

एक अनुभव

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 22/07/2009 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी PMT नं डेक्कनला चाल्लो होतो.. मी पुरुषांच्याच seat वर बसलो होतो... बस एकदम full भरली होती... महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बरेच पुरुष बसले होते... एका स्टाँपवर आजीबाई चढल्या... माझ्या seat जवळ येऊन उभ्या राहील्या... मला वाटलं की त्या कोणाला तरी उठवतील (राखीव seats वर बसलेल्यांपैक्की )... पण नाही.... त्या तश्याच उभ्या राहील्या... मग मीच उठून आजीबाईंना बसायला दीलं (एकतर....महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बसलेल्या एकातरी पुरुषानं आजीबाईंना बसायला द्यासला हवं होतं..

कर्नाळा - जैत रे जैत

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 21/07/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
गो.नी.दां. च्या दुर्ग भ्रमण गाथेत कर्नाळ्या बद्दल वाचल्या पासुन मला तीथं जायच होतं. नंतर जैत रे जैत बघीतल्या पासुन तर कधी एकदा लिंगोबाला (कर्नाळा) जातोय असं झालं होतं. अलीबाग हून पनवेल ला जाताना S.T. च्या खिडकीतून कर्नाळा बऱ्याचदा बघीतला होता, पण जाणं काही जमलं नव्हतं. एका weekend ला यशदीप आमच्या घरी आला होता. तेंव्हा आम्हां तिघांचा (मी, मझा भाऊ प्रसाद आणि यशदीप ) कर्नाळ्याला जायचा प्लान ठरला. पनवेल पर्यंत बस आणि मग पनवेल हून कर्नाळ्याला जायला टम-टम मधे बसलो. पनवेल हून पेणच्या दिशेने ५-६ km पुढे गेलो की रस्ता कर्नाळ्याच्या जंगलातूनच जातो आणि झाडीतून लिंगोबा डोकावताना दिसतो.