म्हाळसाक्का!!
(डिस्क्लेमर : ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यातल्या पात्रांचा घटनांचा कोण्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास योगायोग समजावा.)
रखरखीत सूर्य किरणांनी चेहर्याची त्वचा तापवून काढली तशी भालबा ला शुद्ध आली. डोळे हलके हकले उघडत त्याने मान वर उचलायचा प्रयत्न केला.. पण त्याला तेही शक्य झालं नाही. पुन्हा तसाच तो काही वेळ पडून राहिला. मग पुन्हा थोडासा जोर देऊन, ठणकणार्या अंगाकडे दुर्लक्ष करून तो उठून बसला. सभोवार एक नजर टाकली. रखरखीत उन, आणि उजाड परिसर!! लांब डोंगरावर काही शेळ्या चरताना दिसत होत्या.. "काय खात असतील त्या?