Skip to main content

कथा

स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)

लेखक मन यांनी मंगळवार, 18/08/2009 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
चौथी पाचवीत असलेला मनोबा स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपुन मस्त मजेत, झेंडावंदनाची गाणी गुणगुणत रस्त्यानं चालला होता. उत्साहानं भरलेला चेहरा, डाव्या हातानं फ्रेश इस्त्री केलेली चड्डी सावरत आणि उजव्या हातानं आपलं सदोदित गळणारं नाक पुसत स्वारी मजेत चालली होती. वातावरण नेहमीचं ऑगस्टचं ...श्रावण महिना आणि पावसाची चिन्ह. वातावरणात संचारलेला पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह.

या सुखानो या!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 17/08/2009 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रो.देसायांची तळ्यावर वाट पहात बसलो होतो.ते येई पर्यंत पुस्तक वाचून वाचून कंटाळा आला.जरा अंमळ पाय मोकळे करावे म्हणून तळ्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत फेरफटका मारावा म्हणून उठलो.समोरून एक गृहस्थ येत होते.माझ्याशी हंसले.

डुक्करताप, मी अन घबराट

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 16/08/2009 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला. "इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे.

मी विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवतो

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 15/08/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
"जसं पृथ्वी गोल आहे असं आपण नेहमीच म्हणतो.जर का त्या गोष्टीत तुला शंका असेल तर अनेक मार्गानी तिची सत्यता पडताळून पहाता येते." अलीकडे मी नक्षत्राचे देणे ही डी.व्ही.डी पहात होतो.ती सुरेश भटांवर प्रोग्राम केलेली होती.मला त्यांच्या कविता फारच आवडतात.

ध्यास... एक वेड

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
You've got to find what you love - Steve Jobs ------------------------------------------------------------------------ परवा इंटरनेटवर Heinz Stucke बद्दल वाचलं.. एकदम वेडा माणुस आहे हा.. हा मुळचा Germany चा.. वयाच्या २० व्या वर्षी सायकल घेऊन जग बघण्या साठी घरातून बाहेर पडला.. आज पर्यंत ५४५००० कि.मी. सायकल चालवलीय आणि १९३ देश भटकलाय.. घरातून बाहेर पडला तेव्हा त्याच्याकडं एक सायकल, थोडेफार कपडे आणि फारच थोडे पैंसे होते.. त्याच्या फिरण्याला त्याच्या बाबांचा विरोध होता, त्यामुळं त्याला बाबां कडुन पैश्याची मदत मिळाली नाही आणि त्याला ती नकोच होती..

संगीतप्रेमी विरेन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 08/08/2009 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
"संगीत ही एक विद्युनय भुमि आहे आणि त्यामधे चैतन्य राहतं,अनुसंधान राहतं आणि अविष्कार रहातो." कुणी तरी म्हटलंय, "जेव्हा शब्द नाकाम होतात तेव्हा संगीत बोलू लागतं." हे सत्य मी मानतो.संगीत हा कानाला वाटणारा नुसता निनाद नाही.किंवा कानाच्या पटलावर आपटून येणारा नुसता ध्वनि नाही.संगीत हा एक स्वर आहे,औषध आहे, उपचार आहे,संवेदना आहे,बोली आहे,आणि जीवनाचा उगम आणि आवेश आहे.

शामी कबाब!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 06/08/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ट्रिंग, ट्रींग...", बरोब्बर सव्वापाच वाजता त्याचा फोन वाजला.... त्याने बरोब्बर ओळखलं की हा तिचा फोन! गेल्या वीस वर्षांचा पायंडा!!! ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी हा तिचा ठरलेला फोन.... "हॅलो", त्याने फोन उचलला..... "हे बघ, आता मी घरी जायला निघतेय १०-१५ मिनिटांत", तिचा हुकमी आवाज "ओके, मी पण तितक्यातच निघतोय. काय आणायचंय का? आज काय करायचंय?", त्याची नेहमीची चौकशी... इतक्या वर्षांची ठरलेली सवय! तिने थेट घरी जायचं आणि त्याने जे काही आणायचं असेल ते घेऊन मग घरी यायचं!!!! "नाही, काही आणायचं नाही आज!

वेदना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 06/08/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपनाबाजारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, "वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो." जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.