Skip to main content

कथा

मिपाभारत

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 06/07/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
धिस पिक्चर इज जॉइंट प्रॉडक्शन ऑफ विप्र. खोपडा अ‍ॅंड परा थोपडा. मुळ कथा : बाबा म्हाराज ठाणेकर डायरेक्टर ,स्क्रिप्ट राईटींग : परा एडीटींग : धम्मु (अतिरिक्त भार) मुझी़क : विजूभौ सातारवी अँड प्रमोद देव बॅ़ग्राउंड मुझीक : प्रमोद देव फायनान्स : तात्या भयंकर स्टार कास्ट : नेहेमीचे यशस्वी मिपाकर पुनरपी मरणम पुनरपी जननम (पीत पीत जगणारे, आणि मरणारे) ह्या न्यायाने मिपाकर सुद्धा म्हाभारतातील युद्धात हजर होते. बहुतेक सर्व पांडवांच्या पार्टीत होते. काही चपला घातलेले कौरवांच्या पार्टीत होते. टारझन भीमाच्या बाजुला उभा होता.

म्हमद्या !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 06/07/2009 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेहेमीच्या लोकलने सायनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर पडताना नेहेमीप्रमाणे आपसुकच मागच्या खिशावर हात गेला. खिश्यातलं पाकीट जागच्या जागी असल्याची खात्री झाली आणि एक निश्वास सोडला. हुश्श .... चला आता संध्याकाळपर्यंत तरी काळजी नाही.... अगदी नेहेमीप्रमाणेच. नकळत एक सुस्काराही सोडला गेला.... अहं, म्हमद्या आता कधीच दिसणार नव्हता. मी काही कुणी सराईत लेखकू नाही, त्यामुळे जे सांगायचय ते सरसकट सांगणार आहे. सांभाळुन घ्या. मी अंबरनाथला राहातो. रोज सकाळी सात वाजता घरातुन बाहेर पडायचे, लोकल पकडुन सायन गाठायचे.

" हे विस्मित करणारं स्मारक ह्या धरतीवर कुणी बरं निर्माण केलं असेल?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/07/2009 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
"एखादं लहान मुल आपल्या बोटांचं निरिक्षण करून आणि ती बोटं कुशलतेने वापरून ज्ञान घेण्याच्या प्रयत्नात असतं तेंव्हा ते ज्ञान अनियंत्रित आणि अपरिपक्व असतं." आज प्रो.देसाई जरा खुशीत दिसले.बरेच दिवस ते आपल्या मुलाकडे राहायला होते.मधून मधून माझ्याशी फोनवर बोलायचे.पण आज त्यांची तळ्यावर भेट झाल्यावर मी त्यांच्या आनंदी चेहर्‍याकडे बघून म्हणालो, "भाऊसाहेब,चेहर्‍यावरच्या छटा इतक्या बोलक्या असतात की मनातलं शब्दात येण्यापूर्वी चेहर्‍यावरच्या छटा शब्दापेक्षा बोलक्या होतात. तुम्ही मला आज कसलं तरी लेक्चर देणार आहात हे निश्चितच आहे.तुमच्या मुलाच्या लायब्ररीत फक्त कायद्याची पुस्तकं असतात.वकिलाला त्याची जरूरी अ

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - अंतिम

लेखक प्रसन्न केसकर यांनी गुरुवार, 02/07/2009 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १७

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 01/07/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

मृगजळ- (अंतिम)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/07/2009 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
मृगजळ -१ मृगजळ - २ माय.. ए माय! उठ गं.. थोडं जेवून घे. आज रात्रिच हे वाळवंटातलं जगणं संपणार आहे.. बघ तू. हितनं लांब जायचंय आपल्याला. खूप लांब." ताट वाढता वाढता ती बोलत होती.. मायचं ताट वाढून घेऊन ती माय जवळ आली.."माय... ए माय... माय गं!!! माऽऽऽऽऽऽऽऽऽय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!" हातातलं ताट थाडकन् खाली पडलं.

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १६

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 29/06/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

मी माझ्या वयाच्या सातव्याच वर्षी प्रेमात पडलो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 29/06/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
"हातात हात घेऊन रस्त्याच्या कडेकडेने बिलगून जाणार्‍या त्या प्रेमी युगूलाला वाटणारं ते प्रेम नव्हतं." मी त्यादिवशी अरविंदाला म्हणालो, "तुझे मी खूप लेख वाचले.मला माहित आहे की लहानपणापासून तुला लेखनाचं वेड होतं.तुझ्या त्या वह्या मी उघडून वाचल्या होत्या.तुझ्या एकदोन कथेवर आपण चर्चा पण केली होती." मला अरविंद म्हणाला, "तू ज्याला वेड म्हणतोस त्याला मी प्रेम म्हणतो.वेड तेव्हड्यापुरतंच असतं पण प्रेम मात्र कायमचं असतं.आणि ते प्रेम जर बिनशर्त असेल तर मग प्रश्नच नाही.माझं लेखनावर तसंच बिनशर्त प्रेम आहे. मी जर म्हणालो की माझ्या सातव्या वर्षीच मी प्रेमात पडलो,तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही.कुणी म