Skip to main content

कथा

एका हरण्याची गोष्ट

लेखक नीधप यांनी गुरुवार, 18/11/2010 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
परत एक जुनीच कथा. मी मिपावर येण्याच्या अगोदर लिहीलेली. --------------------------------------------------------------------------------------------------------------- तसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात. तोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही.

"और पप्पू पास हो गया...."

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 11/11/2010 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
हाय मी पियुषा, सदर लेख हि आमची शाळेतील आठवण आहे ,सगळ्यांच्या आयुष्यात लहानपणी शाळेतील असे काही तरी ढासु असतेच और पप्पू पास हो गया" शाळेतले दिवस कुणी विसरेल का कधी ?काय दिवस असतात काय धमाल ,नुसते खेळणे,मौजमजा करणे दिवसभर हुंदडणे , काही टेन्शन नाही, असते ते फक्त आपल्या आई बाबांना आपले रत्ने चांगल्या मार्कांनी पास तर होतील ना?त्यांची टीर-टीर अभ्यास करा, पण आपल्याला काय आपण बोले तो एकदम बिनधास्त आपले रुटीन चालू !

म्याउ... म्याउ...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 11/11/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
म्याउ...म्याउ.... जेवण आटोपुन पडल्यापडल्या दिवाळी अंकाचं वाचन चालु होतं. तिकडे ओबामा दिल्लीतुन पूर्वेकडे गेला असल्याच्या बातम्या चालु होत्या. भारताला काय मिळालं आणि भारतानं काय दिलं यावर काथ्याकुट चालु होता. अजुन दुसर्‍या चॅनेलवर अशोकराव गेले पृथ्वीराज आले यावर कुठे आनंद कुठे दु:ख यावर खल चालु होता. अजुन एक चॅनेल कुठल्यातरी रिअ‍ॅलिटी शोमधल्या लग्नावर घसा खरवडुन चर्चा करत होते. दिवाळी अंकाचं वाचन हाच सर्वोत्तम पर्याय निवडुन इडीयट बॉक्स बंद केला आणि निवांत पाय पसरुन तिरपा होत अक्षरांपासुन बनणार्‍या शब्दांचे अर्थ लावत वाचन सुरु केले.