Skip to main content

कथा

गूढ कथा: "कालग्रहांचे भविष्यआरसे" (संपूर्ण कथा - ६ भाग एकत्र)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 04/10/2010 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: [यापूर्वी ही कथा सहा भागात मी क्रमशः प्रसिद्ध केली होती. वाचकांच्या सोयीसाठी आणि सलग वाचनाचा आनंद मिळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कथा आता सलग एकत्रीतरित्या प्रसिद्ध करतो आहे.] ----------------------------------- गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे!!! --The Fortune Mirrors of Time Planets!!! ----------------------------------- ही कथा सुरु होते २०२२ साली दि. २२/०२/२०२२- मंगळवार- वेळ सकाळी चार मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता वाहनांची वर्दळ नव्हती. पाऊस पडत होता.

पुण्य, की प्रायश्चित्त?...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/10/2010 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'... ... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला... आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो. पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला. 'वृद्धाश्रम'... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं.

डूड...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 30/09/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
"लेडिज अँड जंटलमन, वी हॅव रिच्ड छॅट्रपॅटी शिवॅजी इंट'नॅशनल एअ'पोऽट मुंबाय. वी विल कमेन्स आऽर डिसेंट शॉर्टली. यु आऽ रिक्वेस्टेड..." समोरच्या छोट्या स्क्रीनवर चाललेल्या टायटॅनिकमधे पार बुडालेला समीर एकदम भानावर आला. मान उंचावून दोन सीट सोडून डावीकडे असलेल्या खिडकीतून त्याने बाहेर नजर टाकली. विमान डावीकडे वळत होते. त्याबाजूला झुकल्यामुळे खाली चमचमणारा दिव्यांचा समुद्र अगदी लख्ख दिसत होता. सोळा सतरा तासाच्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. मस्त हात उंच करून त्याने आळस दिला. खिडकीच्या बाजूला शाय, आय मीन, शलाका काचेला नाक लावून खाली बघत होती. तिच्या बाजूला आई अगदी सराईतपणे घोरत होती.

शर्यत

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 28/09/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमरचे डोळे ' रिसर्च टुडे 'मासिकामधल्या एका बातमीवर खिळले होते- जुलै २००७ उंदरांना जवळ जवळ ३५ कॉन्सन्ट्रेटेड बाटल्या खास द्राक्षासव पाजले की त्यांचे आयुष्य वाढते असे असे पाहणीत आढळले आहे. उंदरांची पाहणी केली असता त्या खास द्राक्षासवातील काही घटक विशेषतः 'लाइफसेवर ' हे आयुष्यमान वाढवण्यात सक्रिय असतात असे सुद्धा एका अभ्यासात आढळले आहे. या ओळी वाचूनच अमर थबकला. त्याच्यापेक्षा अधिक वेगाने कोणीतरी हाच धागा पकडून संशोधन करत होते तर...