"और पप्पू पास हो गया...."
लेखनप्रकार
हाय मी पियुषा, सदर लेख हि आमची शाळेतील आठवण आहे ,सगळ्यांच्या आयुष्यात लहानपणी शाळेतील असे काही तरी ढासु असतेच
और पप्पू पास हो गया"
शाळेतले दिवस कुणी विसरेल का कधी ?काय दिवस असतात काय धमाल ,नुसते खेळणे,मौजमजा करणे दिवसभर हुंदडणे ,
काही टेन्शन नाही, असते ते फक्त आपल्या आई बाबांना आपले रत्ने चांगल्या मार्कांनी पास तर होतील ना?त्यांची टीर-टीर अभ्यास करा, पण आपल्याला काय आपण बोले तो एकदम बिनधास्त आपले रुटीन चालू ! एक एक दिवस काय मजेत जातो (अपवाद सोडले तर) कधी स्पोर्ट डे,कधी गॅदरिंग ,कधी हि स्पर्धा ,कधी ती, वैगेरे वैगेरे....... असे दिवस संपावेच वाटत नाही, रोज सकाळी टाईम टेबल मध्ये खेळाचे तास शोधणारे आम्ही बापडे हा आमचा
१२-१३ वर्ष पूर्वीचा काळ ! आजचे मुले किती स्कॉलर (९७-९८%) आणि आम्ही कुठे (६०-७० %) पण एन्जोय भरपूर केली शाळा असो,
मी पियुषा आणि माझा लहान भाऊ पप्पू (संदेश)एकाच शाळेत शिकलो , मी सहावीत तो चौथीत ,सकाळी ८-२ शाळेची वेळ, शाळेत सायकलवर जायचो ७-८- जनाचा ग्रुप होता ,टोळीच म्हणा !रस्त्यावर चिंच,बोरे,आवळे एक झाड म्हणून सोडले नाही आम्ही वर्गात तास चालू तसे तोंडही चालू हळू हळू .
शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची, गुडघाभर पाणी, मग काय शाळा सुटली कि आम्हीपण सुटलो बैलासारखे पाण्यात खेळायला मग छोटे छोटे मासे पकडायचो ओढणीने, बाटलीत भरायचो ,घरी आल्यावर काचेच्या हंडीत सोडायचे ,काय कौतुक सर्वाना रंगीबिरेंगी मासे बघण्याचे (ते बेडूक मासे होते नंतर कळले त्यांचे शेपूट गेल्यावर )
असेच आमचे फार मजेत दिवस चालले होते दुपारी शाळा सुटली कि सायकलवर घरी येता येता फार दमायचो ,मग दप्तर फेकून fan खाली लोळत पडायचो ,मग हातपाय धुवून जेवण ,थोडा आराम ,आणि संध्याकाळी जे खेळणे चालू कि आईचे एक दोन फटके खाल्याशिवाय आपल्याला घर आहे हे आठवायचे नाही !
त्यावेळी ६५-७० % पडतात म्हणजे आपण हुशार आहोत अशी समजूत होती आमची ! मन लाऊन अभ्यास करणे नव्हे तर पास होण्यापुरता अभ्यास करणे हे सुखी शालेय जीवनाचे सूत्र होते आमचे! आणि यामुळेच पुढचे रामायण घडले !
आमच्या आई -बाबांना प्रगती माहिती होती आमची , ते कधी प्रेमाने समजावयाचे ,चिडून सांगायचे मारायचे ,अभ्यास करा "आपल्या बाप-जाद्यानी आपल्यासाठी लाखोंची इस्टेट नाही सोडली बसून खायला ,नोकरदार माणसे आहोत आपण, आपले नशीब आपणच घडवायचे त्यासाठी अभ्यास करावा लागतो समजले का? पण आम्हाला त्यांची तगमग समजत नव्हती त्यावेळी !मी आणि पप्पू ,म्हणजे तसे अभ्यासात बरे होतो त्यामुळे नापास नव्हतो झालो कधी नशीब आमचे !
असेच भराभर दिवस चालू असताना सहामाही आली पेपर आले आणि गेले, पण निकालाचा दिवस आला पोटात गोळा आला नेहमीच यायचा..
निकालाच्या आधी पालकांची मिटिंग तुमचा पाल्य कशात कच्चा कशात पक्का वैगेरे वैगेर ...........
वडील आधी माझा निकाल घ्यायला आले , घसा कोरडा ,बारीक तोंड , मॅडम ने बघितले हसली , समजले ,सुटले एकदाची ६५ % पडले होते
वडील सुखावले जरा ! मैत्रिणीशी गप्पा मारत मी थांबले तिथेच!
आता आमच्या पप्पूचा नंबर ,
ते दोघे गेले त्याचा वर्गात , पाच मिनिट नाही झाले तर एक मुलगा धावत आला माझाकडे ,पियू लवकर चल तुझे वडील तुझ्या भावाला मारत आहेत लवकर चल , (अण्णाच्या ढाई किलोच्या हाताचा अनुभव होता दोघानाही )
पुन्हा एकदा भीतीने हातपाय गळाले , धावतच गेले समोरचे दृश्य पहिले
पप्पू रडत होता जोरजोरात !,"अण्णा मला मारू नका मी अभ्यास करीन नक्की देवाची शपथ, मम्मीची शपथ,जो आठवेल त्याची शपथ घेत होता बिचारा !
वडील चिडलेले भयंकर लालबुंद चेहरा झालेला ,(तसे वडील प्रेमळ, चिडायचे ,क्वचित मारायचे पण) आज त्यांचा राग अनावर झाला होता एवढे सांगून मुलगा नापास ! माझे काळीज अजून धस्स झाले काय करावे समजेना
पप्पूला पकडू कि पप्पाला!
"तरी तुला सांगत होतो गाढवा अभ्यास कर म्हणून , खेळा अजून " ,काय समजायचे समजले पप्पू नापास झाला गणितात २३ मार्क !
वडिलांचा राग शांत होत नवता ,आमच्या काळे मॅडम
(तब्येत एकदम जाडजूड पण प्रेमळ, वय अंदाजे २४-२५ असेल )वडिलांना सांगत होत्या काका जाऊ दे मारू नका त्याला मी समजावते, पण नाही, ऐकणे आमच्या खानदानात नाहीच ! बिचारा पप्पू रडत होता वडिलांचा मार वाचवण्यासाठी कधी टेबलामागे कधी मॅडम मागे लपत होता.
आणि तो क्षण आला वडिलांनी फटका मारायला आणि पप्पू मागे लपायला एक वेळ झाली तो फटका मॅडम च्या हातावर बसला चट आवाज सर्वे शांत !कुणाला काही समजेना
पप्पूच्या रडण्याचा आवाज एकदम बंद , वडिलांच्या चेहरा एकदम बदलला, रागाच्या जागी अपराधीपणाचा भाव, sorry मॅडम मला क्षमा करा,मी या गाढवाला ..................इति . मॅडमचा चेहरा रडवेला वाटला,(फटका चांगलाच बसला होता बहुतेक!)
पण तरीही हसण्याचा प्रयत्न करीत होत्या, हात चोळत होत्या जाऊ दे हो काका, काही नाही लागले खरच ,तो पर्यंत दोनतीन बाकीचे शिक्षक जमा झाले ,"काका असे मारू नका सो सोडा ,सोडा त्याला
सभागती फटका लागला असता तर! किती घाबरला बघा तो, त्याला प्रेमाने कुरवाळत म्हणाले संदेश ,बाबा किती कष्ट करतात ना तुझ्यासाठी ?मग त्यांच्यासाठी अभ्यास करशील ना"? पप्पूने रडत रडत मान डोलाविली
पुढे वडील मागे मी आणि मग पप्पू अशी वरात निघाली आमची, झालेला प्रकार बऱ्याच जणांना समजला होता काही टार्गेट हसत होती ,काही पप्पू कडे केविलवाणी बघत होती बिचारा पप्पू!
मार खाला हा हा हा...
आम्ही दोघे शांत होतो पण एकाच विचार डोक्यात "आजचा दिवस जाऊ दे उद्या बघतो तुमच्याकडे फार हसू येत काय?
घरी आलो झालेला प्रकार आईला सांगितला ती पण खुप रागावली , संध्याकाळ झाली ,
पप्पू कडे गेले ,दोघेच होतो मी म्हणाले कसा काय नापास झाला रे? तरी सांगितला होते अण्णांनी, नापास झाला तर बघ होस्टेल ला च पाठवीन तरीही ?"match " नव्हती का माझी अभ्यास नाही झाला" उत्तर मिळाले.
दोन मिनिट शांत मग हास्याचे धबधबे मग खी खी खी ...खो खो खो ....
दुपारचा प्रसंग आठवून ! अण्णा कसे sorry sorry म्हणत होते ना, अक्टिंग करून करून दाखवत होता पप्पू ,! मॅडम ला काय फटका बसला रे बिचारी ! सगळे काय टरकले ना आपल्या अण्णांना ? सर तर कसे थर-थर
कापत होते ना ?
ए पण तू अभ्यास करणार ना ? हो नक्की बाबा ,आपल्याला
पुन्हा चव नाही घालवायची अण्णांची !
खरेच मग दोगेही अभ्यासाला लागलो ,खेळणेही चालूच होते बरोबर, वार्षिक परीक्षा संपली निकाल लागला पहिला पप्पूचा निकाल पहिला पप्पानी!
चक्क ६८% सर्वे विषय पास नो टेन्शन खालेल्या फटक्यांचा चांगला परिणाम ,अण्णांनी सुटकेचा निश्वास सोडला "और पप्पू पास हो गयां"
१२-१३ वर्ष उलटली याला, मी ,नी पप्पू एक चांगल्या ठिकाणी जॉब
करतो पण वेगवेगळ्या ठिकाणी, पण संध्याकाळी घरी कधी कधी
आठवणीना उजाळा मिळतो बालपणींच्या गोड कडू आठवणीना आणि हसतो खळखळून, आमचे आण्णां पण !
वाचने
6684
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम! :)
आयला, हल्लीच्या पोरांना बोटही लावायचं तर मानवाधिकारवाले बोंबलत येतात की काय अशी शंका येते. :)
In reply to छान! by धमाल मुलगा
+१
In reply to +१ by शिल्पा ब
मी माझ्या भाचिला मारले नाहि तर फक्त एकदा ओरडले तर बहिणीने मला चाइल्ड साइकॉलॉजीवर लेक्चर दिले होते :(
बाकि लेख छान हो !!!
In reply to छान! by धमाल मुलगा
हो ना... आणि इथे तर बाईंना सुद्धा मारले तरी हूं की चूं नाही :)
मस्त लिहलय ग...
आवडलं :-)
मस्त!!
>>वडील आधी माझा निकाल घ्यायला आले , घसा कोरडा ,बारीक तोंड
लहानपन डोळ्यासमोर उभा केलत. आज ते थ्रिल राहिलं नाही.
छान ...
अभ्यासाबरोबर लेखनातली प्रगतीही दिसते आहे. :)
अजून येऊ द्या. लेख आणि लिखाणातली प्रगती दोन्हीही.
छान ओघवत्या भाषेत लिहिले आहे. मस्त जमले आहे.
शाळेत नापास होण्याचे सुख मी सुद्धा एकदा नव्हे २ दा अनुभवले आहे. ९वीत असताना तिमाहीत आणि सहामाहीत गणितात गचकलो होतो. दुसर्या तिमाहीत काठावर पास होतो. त्यानंतर माझे कसे होणार याची काळजी माझ्यापेक्षा आमच्या वर्गशिक्षिकेंनाच (आणि आई बाबांना) जास्त होती. लै वाईट गेले ते वर्ष. जातायेता शिव्या खायचो. नशिबाने वर्ष वाचले :)
सुंदर लिहिला आहे अनुभव ..
चित्र डोळ्यासमोर उभे राहते ..
अवांतर :
कालच्या भाउभिजेलाच मी आणि ताइडी आमचे जुणे लहाणपणीचे थोडेशेच असलेले फोटो पहात होतो. त्या दिवसांची खुप आठवण येत होती ... मस्त वाटले वाचुन .. तुमचे बालपण वाचुन मी आमच्या बालपणात शिरलो होतो ...
लिहित रहा .. वाचत आहे
छान जमलाय लेख!!!
>>>शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची
"सीना" नदी म्हन्जे तुम्ही अहमदनगरच्या का?
मीही नगर कॉलेजल ११-१२ वी ला होतो.
पुढील शिक्षण विळत घाटात झाले.
In reply to पियुशा by विलासराव
शाळेच्या पाठीमागे नदी "सीना" नावाची
"सीना" नदी म्हन्जे तुम्ही अहमदनगरच्या का?.
त्याच्यावरचा ब्रिज एकादा पडला होता, आता तिथुन गाडि नेताना ब्रिज हलतो, जपुन.
In reply to पियुशा by विलासराव
'शीना' नदीतल्या पाण्यात तुमी खेळला हे ऐकून तुमचा हेवा वाटला. आमी तर ती नदी कोरडीठकच पाह्यलीय राव....
भारी समर्थ
छान ओघवती भाषा
छान रंगवला आहे प्रसंग.
बाईंना फटका बसल्याचा प्रसंग तर भन्नाट अन मग घरी येउन सार दु:ख विसरुन मग खुदुखुदु हसण , केव्हढा निरागसपणा असतो ना आपल्यात? दोन मिनिटात दु:ख गायब अन हसायला तय्यार!
एकदा माझे काका शाळेत एका शिक्षीकेल भेटायला आले. काहितरी तक्रार होती तीची, फारस काही आठवत नाही पण काकांना बघुन ती अन तीला पाहुन काका दोघेही चमकले. नंतर काका सांगत होते' ती फोफशी होय तुमची शिक्षीका? आम्ही तीला सायकल शिकवण्या साठी म्हणुन सायकल वर बसवुन उतारावर दिली सोडुन. तेंव्हा पासुन जी आमच्या बरोबर बोलत नव्हती ती आज भेटली' काय हसलो आम्ही त्या 'फोफशी ' या शब्दावर.
मज्जाच मजा. :) मी तर ठरवूनही शाळेत नापास नाही होऊ शकलो. :( कॉलेजात पण नाही. एकदा FY ला एक विषयात ३१ मार्क होते १०० पैकी पण बाकी टोटल बरी असल्याने जयकर नियमानुसार पास झालो. साला कालेजात एक पण KT नाही मिळाली.
In reply to मज्जाच मजा. मी तर ठरवूनही by llपुण्याचे पेशवेll
घासून घासून मेरीटात येणं काय लै अवघड नाय. आम्ही मास्तराशी पैज लाऊन सलग १०० पैकी ४० मार्क घेऊन दाखवायचो. ग्रॅज्युएशनला मास्तरानं शेवटी हार पत्करली आणि निकाल जिथं घेतला तिथंच आमच्या पुढं हात जोडले. :D (हां, आता ह्या खेळात करीयरचं मात्रं झालं हे मात्र सांगायचं नसतं ;) )
In reply to हॅ हॅ हॅ! by धमाल मुलगा
घासून घासून मेरीटात येणं काय लै अवघड नाय.
काय सांगता. मी तर इंजिनियरींग्ला असताना घास घास घासायचो. तरी वर्ष बुडायचं ते बुडालंच.
In reply to घासून घासून मेरीटात येणं काय by अप्पा जोगळेकर
काय घासावं आन् काय नाय तेवर सम्दं आवलंबून आस्तय.
घास-घासून तुमचं वर्ष 'बुड'लं यातच सर्व आलं राव...
भारी समर्थ
छानच हो... लिहा अजून.
"नापास मुलाची गोष्ट" अरुण शेवते आठवले..
छान लिहिले आहे.."
va va..kya baat.
Maase pakadane ya prakarane tumhi mala majhya shaalet gheun gelaat. Thanks.
Baaki maar aani tyaache prakaar yaavar pustak hoil.
Keep writing..
Sorry for comment in english script as I am writting on my phone.
Gavi.
"आपल्या बाप-जाद्यानी आपल्यासाठी लाखोंची इस्टेट नाही सोडली बसून खायला ,नोकरदार माणसे आहोत आपण, आपले नशीब आपणच घडवायचे त्यासाठी अभ्यास करावा लागतो समजले का?
माझ्या घरी सुद्धा हेच dialog असायचे.... ;)
सुंदर आठवण....
शाळेचे दिवस आठवले.......
असेच लेख लिहित राहा...
पु.ले.शु.
प्रसंग डोळ्यांपुढे उभा राहिला अगदी!
येऊ द्यात अजून. :)
छान ... मजेशीर प्रसंग.. कथन पण छान झाले आहे.
तुम्हा सर्वान्चे मनापासुन आभार, ध न्यवाद
खूप छान लिहिलयं.. शाळेचे दिवस लगेच आठवले ! ऊगीच मोठा झालो असं वाटतं कधी कधी..
छान लिहिताय.. लिहित राहा असेच..
आम्हलाही काळे मॅडम होत्या अन त्याही चांगल्याच जाडजूड होत्या, हिंदी शिकवायच्या.. त्या शिकवायला लागल्या कि त्यांच्या मानेला पडणार्या घड्यांकडेच आमचं लक्ष.. मग त्या घड्यांवरुन विनोद करीत तोंडावर हात ठेवून फिदीफिदी हसायचो !
अभिनंदन पप्पुचे !!!
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम!
मस्त लिहिले आहे..
सीना नदी म्हणजे तुम्हि पण आम्च्या सारख्या नगरी का?
१२-१३ वर्ष उलटली याला, मी ,नी पप्पू एक चांगल्या ठिकाणी जॉब करतो
मुलांच्या शाळेतल्या मार्कांबद्दल जास्त बाउ करु नका. हा संदेश कमी शब्दात तुम्ही मोठा छानप्रकारे दिला आहे. तुमची शाळा व माध्यम सांगीतलेत तर अमुकच शाळा हवी, अमुकच माध्यम हवे यावर लोकांना पुनर्विचार करता येईल!
छान लेख. युंद्या आजून.
भारी समर्थ
छान!