Skip to main content

कथा

अनुभव !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 20/12/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
हाताच्या तळव्याएवढ्या टक्कल असलेल्या गृहस्ताच्या तोंडून शब्दाने तिरकी उडी घेतली , "काग्र्याच्युलेशंस !" बंडोजी धिल्लम मिणमिण हसत म्हणाला , "अभिनंदन !!" गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त नुसताच हसला लक्षच नव्हते त्याचे .कणाकणाने गहाळ होत जाणारे भान .म्हणजे आपण आपल्या ह्या प्रचंड धान्य गोदामात एकटेच आहोत .आपल्या एका सहकार्याने दांडी मारली आहे .आणि काम नसल्यामुळे एकजण पसार झाला आहे.

सायबानू मीच त्यो .... अंतिम

लेखक स्पा यांनी शनिवार, 18/12/2010 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ http://www.misalpav.com/node/15817 भाग २ http://www.misalpav.com/node/15840 भ्रष्टाचार करून, किसन आणी त्याच्या कुटुंबाचा जीव घेतलेल्या, शेळ्क्यांवर त्यांचाच डाव उलटलेला असतो.... हळू हळू बदल्याचा अघोरी खेळ त्या बंगल्यात सुरु झालेला असतो..

निरुपयुक्त

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 18/12/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
सुटकेस घेऊन पुरू पुढच्या दाराशी आला आणि क्षणभर थबकला. मंद आवाज करीत एका लयीत सरकते दार उघडत असताना त्याने वळून घराकडे एक नजर टाकली. घर अगदी शांत आणि स्तब्ध होतं. अंजली आणि प्रांजल दोघेही घरी नव्हते. इतरवेळी किणकिणणारा होममॅनेजरचा आवाजही बंद होता. जणू त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याची गरज त्या यंत्रालाही वाटत नव्हती. तो घरातून बाहेर पडतोय हे आधीच अपेक्षित असल्याप्रमाणे होममॅनेजरने सगळे दिवे, एसी वगैरे बंद केलं होतं. स्वीपर रोबोज, शेफ रोबोज वगैरे काम संपवून क्लॉजेटमध्ये विसावले होते. घरात एक थंड आणि निर्विकार शांतता भरून राहिली होती. पुरुची नजर एकेका वस्तूवरून फिरू लागली.

कासाराचा गोईंदा

लेखक यकु यांनी बुधवार, 15/12/2010 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्याहून अचानक गज्याचा फोन आला आणि मी दहा बारा वर्षे मागे गेलो. गज्या म्हणजे आमच्या गोविंदकाकाचा मुलगा. हा गोविंदाकाका आमचा पोरासोरांचा गोविंदकाका असला तरी अख्ख्या पंचक्रोशीत त्याला कासाराचा गोईंदा हे एकच नाव होतं. तो आमच्या लहानशा गावात राहून चप्पलबूट, कटलरी सामान, बांगड्या, कंदील, कुलूपं, खेळण्या, आरसे-फण्या-पॉण्ड्स पावडर, इस्नू (स्नो!) असल्या वस्तू विकायचा धंदा करायचा. हा धंदा करण्याची त्याची रीतही त्याच्यासारखीच जगावेगळी. तो हे सामान वाहून नेण्यासाठी घोडा वापरायचा! सतत फूर्रर्र ऽऽ फूर्रर्रऽऽ करणारा आणि बांधला असेल तिथे लीद टाकून त्या आवारात विचित्र वास पसरवणारा घोडा.

सायबानू मीच त्यो .... भाग २

लेखक स्पा यांनी सोमवार, 13/12/2010 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानू मीच त्यो .... भाग १ *** त्यानंतर पुढे काय झाले त्यांना कळलंच नाही ,फक्त तिन्हीसांजेच्या भयाण प्रकाशात, ती मांजरे, तो चिंचेचा वृक्ष, त्यांची बंगली, आणि कोर्टाची इमारत भोवताली गरागरा फेर धरून नाचत आहेत एवढाच जाणवत होतं. जाग आली तेव्हा ते बंगल्यातच होते. डोक भयानक ठणकत होतं. हनम्या समोरच उभा असतो, सोबत डॉक्टर दिलीप बिरुटे! हे इथे कसे काय?

सायबानू मीच त्यो .... भाग १

लेखक स्पा यांनी शनिवार, 11/12/2010 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
एक उदास संध्याकाळ "नागरगोजे" गावावर उतरू लागली होती, गेल्या पंधरवड्यात अशा काही घटना तिथे घडल्या होत्या कि ते छोटंसं गाव चांगलंच हादरून गेलं होतं. "नागरगोजे" सोलापूर-बीड महामार्गावरील तालुक्याच एक ठिकाण . तालुक्याचं असलं तरी मुळ गाव लहानच, फक्त "उसाची मोठी बाजारपेठ" आणि "कोर्ट" यामुळे बऱ्यापैकी गजबजलेलं. त्या भागातली जमीन "अफाट सुपीक" मुख्य पिक हे "ऊस" . गावाच्या आजूबाजूला आता हळूहळू उसाचे कारखाने उघडू घातलेले होते.गावापेक्षा गावाबाहेरच्या लोकांचीच गावात गर्दी जास्त .. यामुळे एकदा संध्याकाळ होऊन सगळी लोक आपापल्या मुक्कामी परतली .. गाव परत चिडीचूप....

[जोगवा] : एक वास्तवदर्शन

लेखक पारा यांनी बुधवार, 08/12/2010 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
जोगवाकाही चित्रपट आनंदासाठी, विरंगुळ्यासाठी नसतातच. तुम्हाला ज्ञात-अज्ञात वास्तवाचा प्रत्यय आणून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजात आपल्या आजू बाजूला घडणाऱ्या अनेक घटनांनी, अस्वस्थ करणाऱ्या वास्तवांनी मनात जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं जरी एका व्यक्तीला शक्य नसलं तरी अशी व्यक्ती मग चार चौघांत आपलं मत मांडते, शक्य असेल तर मग जोगवा सारखी एखादी कलाकृती निर्माण होते.