रॉयल चॅलेंज..
ज्यांनी हे आधी वाचलंय त्यांना आधीच सॉरी..!!
.............
"साहेब कुठली ओतू?"
पटवर्धनच्या मोठ्ठ्या आवाजाने सगळ्या सोनेरी चंदेरी बाटल्या किणकिण हलल्या..
Royal Challenge नाव छान वाटतं..पण त्याला आर सी म्हणायचं..
..
..
"नको हो आज पटवर्धन..मी काय पट्टीचा नव्हे हो..कशाला .. असू दे.. मी पेप्सी घेतो.."
"बसा हो.. घ्या..ए एक आर सी इकडे आणून ठेव रे.."
..
..
चला..पटवर्धन म्हणतोय एव्हढा मनापासून तर बसूया आज..
..
..
"पण स्मॉल बनवा हो.. मला ड्राइव्ह करायचंय.."
ग्लास भरला.. म्हणजे भरूनच आला.. आता त्यात किती ड्रिंक आणि किती सोडा कसं कळणार..??
घोट कडवट लागत होता..घसा आणि पोट गार गार जळालं.. पुढचा पेप्सी मधे घालूनच घ्यावा..
..
"अजून एक ओततोय बरं का साहेब.."
"आता बास् पटवर्धन..!!"
सालं आज काही खरं नाही.. हा आज ऐकत नाही.. एव्हढा एक गटागट पिऊन बास करायचं..
गटक गटक गटक..
"ए जगन्या..साहेबांचा ग्लास संपला की रिपीट करत जा.. विचारायचं नाही.."
अत्यंत खालच्या आवाजात पटवर्धन वेटरला बोलला..
मला काही ते नीट ऐकू आलं नाही.. जाउदे च्या मारी.. त्याची पार्टी आहे.. चालायचंच..
जगन्या.. म्हणजे जगन असणार.. अजूनही इतकी Old fashioned नावं ठेवतात? लहान दिसतो तसा..बालमजूर वाटतोय.. जाऊ दे..पोटाला तर मिळतंय ना त्याच्या..
तिसरा की दुसरा ग्लास आहे हा..? ग्लास म्हणायचं की पेग.. पेग बरं वाटतं.. देशी थोडीच आहे ही..
आता हा पटवर्धन "मराठी विरुद्ध अमराठी", किंवा एकदम "महाभारतातली द्रौपदी" असला काहीतरी विषय काढणार..
बरं असतं ड्रिंक्स सोबत..दोन तीन झाली की मग कुठलाही विषय मस्तच..
मस्तच.. मस्तच..मस्तच..
हे सालं कुठलं मधलंच गाणं लावलंय ?? ना धड दु:खी ना धड आनंदी..
एक तर गझल लावा किंवा मस्त Uptown Girl लावा.. इथे प्यायला बसलोय.. केस कापायला नव्हे..
हा चौथा की तिसरा ग्लास .. साला जगन सगळेच लार्ज भरत चाललाय वाटतं..
तो तरी काय करणार बिचारा.. पटवर्धनने ऑर्डर दिलीय ना..जाऊ दे भेंडी..
नुसते दाणे..?? चिजलींग तरी ठेवायची..
हाश्श्श....
"साहेब हळू सावकाश...!!" पटवर्धनचा आवाज कानात गूं करून घुसला..
अरे तिच्या मारी.. मी ग्लास जर्रा जोरात खाली ठेवला म्हणून लग्गेच..
"I am perfectly Ok पटवर्धन!!.. एक सुरमई फ्राय सांगा लवकर"..
सुरमई.. सुरमई..
सुरमई शाम इस तरह आये..
भूक लागलीय तिच्या आयला...
सहावा की पाचवा ? की साडेचारावा ??
ग्लास आत्ता तर संपवला होता.. आपोआपच भरतोय.. नीट लक्ष ठेवलं पाहिजे..
लोक तरी किती आलेत पार्टीला..फ़ुकटचे खायला लगेच येतात लतकोडगे..
खाबू साले..खाबू खाबू खाबू ...
आत्ता चार पावलं फिरून आलं पाहिजे.. तरच मज्जा..
समोर जोश्या बसलाय.. त्याचा शर्ट वर गेलाय.. बाजरीच्या कणकेसारखं त्याचं पोट दिसतंय.. तरंगत जाऊन मस्त कणीक तिंबून काढावी का ??
का का का..
का का का..
कू कू कू..
अरे यार.. आपल्याच हाताच्या तळव्याकडे बघायला किती मजा येतेय.. वेडावाकडा हलतोय हात.. द्यावी का कोणाला ठेवून राप्पकन.. ?? धम्माल येईल.. लोक म्हणतील साहेबाला चढली.. त्याने तमाशा केला..
पण मला अजिबात चढत नाही हे त्यांना कोण पटवणार.. ??
शांत बसणं सेफ.. उगीच गैरसमज नको कोणाचा..
गैरसमज.. गैरसमज..बम बम..
आठवा ग्लास ?? काहीतरीच.. आपली एव्हढी कपॅसिटी नाहीच आहे..पाचवाच असेल फारतर..
पटवर्धन घेईल काळजी..
ही चायनीज चिंकी कधी आली.. चिकणी बनलीय एकदम..बेब..
हिचं सालं नावच विसरलो..
चिंकी.. चिंकी.. चिकणी.. चिकणी..
चिकन दिसतंय मख्खनवालं.. बुफे टेबलवर..
चिकन जाईल का आपल्याला आता.... पण पोट स्टफ झालंय..
अरे इतके ग्लास लिक्विड.. ****.. पोटाची काशी केलीत..
...
च्यायला.. आले आधार देऊन उठवायला वगैरे.. ज़रा दोन चार पेग घेतले की यांना वाटतं की टल्ली झाला..
मी काय त्यातला दिसतो काय..
मला उठवायला पटवर्धन कशाला.. चिंकीला तरी पाठवायचंत..
मी शांत आहे.. एकदम मस्त शांत..
किंचितही मरगळ नाही..एकदम फ्रेश..
मी उठून ड्राइव्ह करत मसणातही जाऊ शकतो..
मरगळ मरगळ..बरगळ बरगळ..
मळमळ मळमळ ..
काहीतरी यमक जुळतंय ..
मी उठून लिफ्ट पर्यंत सरळ चालत आलो तरी कुणाला पत्ताच नाही..
मस्त उत्तम भिकार फकीरचंद मूड..
जाळून टाकूया का मस्तपैकी जग..की मस्त नाच करुया.. इपडी पोडे पोडे पोडे पोडे..
टॉयलेट कुठे आहे इथे भेंडी..!! जागेवर टॉयलेट ठेवत नाहीत.. कुत्रे साले..
...
मागे पटवर्धन अत्यंत हलक्या आवाजात कोणालातरी सांगतोय..
"साहेबांचं हे मस्त आहे.. कितीही प्यायले तरी एकदम सोबर माणूस..!!"
वाचने
11223
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
लय भारी.... यावरून मागे
In reply to लय भारी.... यावरून मागे by स्वानन्द
आयला...
In reply to आयला... by चिगो
च्यालेंज आवडलं
In reply to च्यालेंज आवडलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्रोब्बर.. हीच ती
In reply to बर्रोब्बर.. हीच ती by स्वानन्द
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
याचं मूळ
In reply to याचं मूळ by पैसा
मलाही
In reply to लय भारी.... यावरून मागे by स्वानन्द
पुन्हा एक जबरा लिखाण गगनविहारी साहेब...
In reply to पुन्हा एक जबरा लिखाण गगनविहारी साहेब... by डावखुरा
धन्यवाद.. हिक्....!!!
भन्नाट!
In reply to भन्नाट! by आळश्यांचा राजा
कमालै!
In reply to कमालै! by धमाल मुलगा
बिल्कुल!
In reply to बिल्कुल! by आळश्यांचा राजा
वा राजासाब :)
In reply to वा राजासाब :) by टारझन
:) पण बाहेर कायबी दाखवलं नाही
In reply to बिल्कुल! by आळश्यांचा राजा
हेहेहे.. हो.. आपण काही पण
चांगला झालाय लेख, आवडला.
. . . . .
इह्हीहॅ..
चांगला चढलाय लेख !
गगनविहारी
मस्तच लेख.... टांगा पलटी,
मस्त. ह्यावरून एक प्रसंग
करमणूक व चक्षु मोदन
In reply to करमणूक व चक्षु मोदन by निनाद मुक्काम …
वा.. "बार टेंडरच्या नजरेतून
छान लेख...
रॉयल चॅलेंज..
मस्त लेख..आवडेश.
मस्त लेख.. आवडला. स्वगत: रॉयल
खल्लास ऽऽऽऽ
In reply to खल्लास ऽऽऽऽ by छोटा डॉन
असेच म्हणतो
डॉन्राव..
In reply to डॉन्राव.. by गवि
+१
In reply to +१ by छोटा डॉन
खरंय..
भन्नाट...
अरारारा लैच खास जमलेले आहेत
पेगायण