Skip to main content

कथा

अक्षता.. भाग १

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 20/10/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
3

सुंदर माझे घर!

लेखक नीधप यांनी बुधवार, 20/10/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक जुनी कथा इथे टाकतेय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------- खरंतर ती एक खूप सुंदर सकाळ होती. थंडीचा कडाका पडायच्या आधीची मोहक थंडी आणि कोवळ्या उन्हाचे मऊसूत कवडसे. तिच्या घरासमोरून जाणारी वाटही सुंदर सकाळीएवढीच सुंदर होती. या सगळ्या सौंदर्याच्या कल्लोळावर ओरखडा असवा तशी ती तिच्या घराच्या गॅलरीत उभी होती. परत एकदा मिनिटामिनिटाला आत आत उतरत जाणारं नैराश्य अनुभवत. इतक्या सुंदर सकाळी ती निराश का होत होती हे मात्र कोणालाच उमजण्यासारखं नव्हतं. तसं तिच्याभोवती नैराश्याचे ढग जमणं तिला नवीन उरलं नव्हतं. कधी बरं.. हा!

शाळेतला निबंध .......माझा आवडता पक्षी / प्राणी.

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 16/10/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी चला परत शाळॆत जाऊ. तुम्हाला आठवतात तुम्ही लिहिलेले निबंध. काय ते विषय असायचे, एका पेक्षा एक. " माझा आवडता नेता ", " मला पंख असते तर " मी तर असे विषय पाहुनच घाबरुन जायचो. पेपर मधला निबंधाचा पहिला प्रश्न हा माझ्यासाठी नसायचाच. पण तरी कधी कधी एखादा लिहायचो. तसाच तुम्ही सुद्धा लिहित असालच आता परत ते दिवस आठवून निबंध लिहु या. कदाचित तेव्हा नाही जमल ते आता जमेल. मीच सुरुवात करतो. मला नुकताच माझा शाळॆत लिहिलेला एक निबंध मिळाला. तोच इथे लिहितोय.
विषय : माझा आवडता पक्षी / प्राणी.

रामजोशी ( सवाल-जवाब आणि हटातटाने बटा)

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी शुक्रवार, 15/10/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटः रामजोशी गीतकारः ग.दि.मा. सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग.. ************ सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी.. जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं.... *************** सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अवि

बुठ्ठी

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 15/10/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ती पहिलीच नोकरी होती. त्यावेळी मी मेडिकल इलेक्टॉनिक्स या क्षेत्रात काम करत होतो. मी ज्या कंपनीत काम करत होतो, ती कंपनी ऑपरेशन थिएटर व आयसीसीयुला लागणारी इलेक्टॉनिक मशिन पुरवायची. माझ काम होत, त्या मशीनची देखभाल करणं व ही मशीन कशी वापरायची त्याच ट्रेनिंग देणं. त्यामुळे हॉस्पिटलशी सतत संपर्क यायचा. असाच एकदा केईएम्‌ मधुन सकाळीच फ़ोन आला, एक ऑपरेशन चालू होणार होतं व त्यांना आमच्या कंपनीनी दिलेल्या "बलुन पंप" या मशिनची गरज लागणार होती. त्यावेळी हे मशिन नुकतच या हॉस्पिटलनी विकत घेतलेल होत. ते कस वापरायच याचं ट्रेनिंग पूर्ण दिलेल नव्हत.

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 10/10/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.

पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

लेखक सागर यांनी शनिवार, 09/10/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले.