Skip to main content

कथा

अंधार मिठी

लेखक sneharani यांनी मंगळवार, 07/12/2010 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझिम पाण्याच्या संगीतासारखं चाललेलं माझं जीवन असं अचानक अंधारानं मिठी मारल्यासारखं का झालयं? काही कळेनास झालयं..!सुखामगं दु:ख अन् दु:खामागं सुख येतं असं म्हणतात पण ह्या सुखदु:खाच्या अष्टौप्रहर खेळात दु:खाचाच खेळ जास्त वेळ चालतोय्..असं किती दिवस चालणार आहे? का आज माझी सखी मला सोडून जाणार आहे म्हणून मनाची घालमेल चाललीये. खोलवर रुजलेला दु:खाचा काटा आज परत त्याच दुखण्याची अनुभुती देणार आहे असचं वाटतय आज!दुरावा म्हणू की ताटातूट? हव्या असणार्‍या व्यक्तींशीच का होते ताटातूट...!दरवेळी विधाता का असे धक्के देत राहिलाय मला.

बहरला पारिजात दारी...

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 06/12/2010 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यभामा राजवाड्याच्या गच्चीवर उभी होती , सकाळची सगळी कामं झाली, पुजा, नॆवेद्य वगॆरे, आज सगळं अगदी वेळेत झालं त्यामुळं मन कसं प्रसन्न होतं. बाहेर नुकताच हिवाळा सुरु होवुन काही काळ लोटल्यानं येणारा थोडासा निवांतपणा होता. किंचित धुकं आणि त्यातच द्वारकेतल्या घराघरातुन येणा-या धुरामुळे निर्माण होणारी तरल चित्रं पाहता पाह्ता अचानकच तिची नजर त्याच्याकडे गेली. जेंव्हा हे एकदा स्वर्गातुन परत येताना याच्या फुलांची माळ घालुन आले होते, तेंव्हा पासुन माझं मन त्याच्या साठी फार झुरत होतं. नंतर एक दोन वेळा यांच्याकडे विषय काढला, पण छे आमचं कोणि ऎकेल तर शपथ. मग मी पण शेवटचं अस्त्र उचललं.

बकुळीची फुले..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/12/2010 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
बकुळीची फ़ुले.. भर दुपारी , मालू अंगाणात पडलेल्या वाळलेल्या काटक्या गोळा करत होती. उद्या सकाळी बंबाला जळण तरी होईल! काठ्या वेचता वेचता ती अंगणात एका बाजूला गंभिरपणे उभ्या असलेल्या बकुळीच्या झाडापाशी आली. नकळतच तीने वर पाहिले.. बकुळ! ...... ************ "आऽऽऽऽई!! हे बघ... कित्ती फ़ुलं आली आहेत बकुळीला. उद्या आई याचा लांबच्या लांब गजरा कर मी शाळेत घालून जाईन. तुला माहितीये का.. अगं.. वर्गात एकीच्या जरी केसांत बकुळीची वेणी असेल ना.. तर दिवसभार घमघमाट असतो !! आणि ना...." जाई अखंड बडबडीत होती आणि मालू तिच्याकडे कौतुकाने पाहता पाहता तिच्यासाठी ताट वाढत होती. जाई ७ वीत होती.

..

लेखक प्रियाली यांनी बुधवार, 01/12/2010 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
..

एक होता विदूषक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 29/11/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर होते. नगर तसे संपन्न, नगराला लक्ष्मीचा आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभला होता. खरेतर सरस्वतीने जरा सढळ हातानेच इथे खर्च केला होता. नगरात मोठा मोठे थोर कलाकार, वादक, लेखक, कवी, गायक, नकलाकार निवास करत होते. ह्या हरहुन्नरी लोकांना त्यांच्या राज्याबरोबरच बाहेरच्या राज्यात देखील मोठे नाव होते, सन्मान होता. ह्या अशा नगरात काही नगरकंटक देखील होते पण ते सुग्रास जेवणात मेथीचा खडा यावा इतपतच, आणि खरेतर आरोग्याला गरजेचे. ह्या नगरात एक विदूषक राहायचा. आपली कामे सांभाळून झाली की मग नगराच्या मुख्य चौकात यावे आणि खेळाला सुरुवात करावी हा त्याचा नेहमीचा उद्योग.

आमचा पाव - एक गाव

लेखक यकु यांनी सोमवार, 29/11/2010 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
पावात यायचं म्हणजे हा एक ताप असतो. म्हणजे इथं आलं की लवकर परत जावं वाटत नाही. तास उलटतात, दुपार होते. डबा खाऊन होतो, चारचा चहासुध्दा होतो आणि हळूहळू दिवस कलून दिवेही झगमगू लागतात. तरी पावातले सोहळे काही संपत नाहीत. अगदी रातच्या साडेतीन वाजताही एखादा पावकरी दूरवर पसरलेल्या नदीत अगदी संथपणे होडीत बसून माशांचे जाळे उसवत असावा तसा दिसून येतो. काही लोक थांबावं की जावं? थोडावेळ थांबूच, नको, नको गेलेलंच बरं म्हणून डुबी मारतात, आणि आणखी पाचदहा मिनीटात श्वास कोंडला की पुन्हा एकदा डोकं वर काढतात!

वंचना

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 28/11/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
उलुशा वरणभातात सिंधुताईंनी रात्रीचं जेवण आटोपलं, भांडी विसळली, सकाळी भिजवून ठेवलेली मटकी उपसून पंचात बांधून ठेवली आणि चिमूटभर बडीशेप खाऊन त्या पुढच्या खोलीत आल्या. नेहमीच्या सवयीने टीव्ही लावून त्या कोचावर बसून थोड्याशा सैलावल्या. आपले थकलेले पाय ताणून आणि भेगाळलेल्या टाचा एकमेकींवर टाकून चाळशीच्या वरच्या काचेतून टीव्हीकडे निर्विकार चेहर्‍याने त्या पाहू लागल्या. क्षण दोन क्षणांतच त्याचं मन अलगद टीव्हीच्या पडद्यावरून उडालं आणि पुन्हा रवीचा विचार करू लागलं. हा हा म्हणता महिना सरला सुद्धा येतोय असा फोन येऊन. उद्या तो येणार.