Skip to main content

कथा

दगड्फोड्याची गोष्ट...

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 26/11/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक पाथरवट ( दगड फोड्या) राहत होता. तो रोज भल्या पहाटे डोंगरावर जाई आणि मोठ्या शिळा फोडून, त्यांचे तुकडे गावातील शिल्पकारांना विकत असे. एकदा असाच तो शिळा फोडत होता. दुपारची वेळ... वरुन सुर्य आग ओकत होता. दगड फोड्याने थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. त्याने वरुन बघितल तर राजाचा एक मोठा अधिकारी रस्त्यावरून पालखितून मोठ्या मजेत चालला होता. आजूबाजूला सेवक वर्ग त्याची सेवा करत होते. त्याला ना उन्हाची पर्वा होती ना पाण्याची! दगड फोड्या स्तिमित झाला. म्हणाला "अहाहा!! काय सुंदर जीवन आहे ह्याच! काही त्रास नाही, काही कष्ट नाहीत !! हा माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.

वर्तूळ - एक अनुभव

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/11/2010 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते.

या हृदयीचे त्या हृदयी!

लेखक नीधप यांनी मंगळवार, 23/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझी तशी पहिलीच कथा. २००५ मधे लिहिलेली. मायबोलीच्या अर्काइव्हज मधे असेल अजूनही कदाचित. पण त्यानंतर थोडे बदल केलेत. -------------------------------------------------------------------------------------------------------- "केवढा फुललाय चेहरा! काय विशेष आज?" "आज खूप आनंद झालाय.. मस्त वाटतंय.." "काय झालं काय एवढं? नवर्यानं काही गिफ्ट आणलं वाटतं नवीन!!" "केलात पचका!! लावलीत वाट!!‘ "का? नाही आणलं काही त्यानं? मग काय झालंय? का काही विशेष? काही खावंसं वाटतंय का? मला सांग हो, इथे तुझी आई नाही आणि सासूही नाही पण मी करीन हो सगळं!!" "आक्का! स्लो डाउन! मला दिवस गेलेले नाहीत. थॅन्क गॉड!

गुंजग्रामीचे दिवस

लेखक यकु यांनी मंगळवार, 23/11/2010 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील बामणांच्या पोरांचे बालपण जसे जात तसेच माझेही गेले. पण कदाचित इतर पोरांना जी मौज पाहायला भेटली नसेल ती आम्हाला दर गुरूवारी पाहायला मिळायची. आमच्या गावाच्या डगरीखालून वाहणार्‍या गंगेच्या (खरं म्हणजे ही गोदावरी, पण तिला सगळे गंगाच म्हणतात) तीरावरच गुंज क्षेत्र नावाचे दत्तसंस्थान असलेले एक गाव होते. अजूनही आहे. पण आता तिथं ती मौज मात्र राहिली नाही. आमच्या घराण्यात पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी दत्तोपासना सुरू झालेली आणि सकाळी-सकाळी प्रत्येकाचा पाठ, घंटा, पंचपदी वगैरेंची नुसती गडबड. चांगला चौसोपी किल्ल्यासारखा वाडा. वर माडी.

आज अचानक गाठ पडे....

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 22/11/2010 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षे झाली त्याचा शोध घेणं सोडुन दिल्याला, शाळेत असताना विवेकानंद आणि काही इतर जणांची पुस्तकं वाचुन मनाचे विचार एकदम प्रग्लभ वगॆरे झाले असं वाटलं होतं आणि आयुष्याकडे पाहण्याचा द्रुष्टिकोनच बदलला होता. त्यात भर म्हणुन पुढच्या शिक्षणासाठी गावातल्या सिद्धस्वामी मंदिराची शिष्यव्रुत्ती मिळालेली आणि त्या साठी त्यांच्याच संस्थेच्या कॊलेजात जावं लागलं. तिथल्या त्या सकाळ संध्याकाळच्या प्रार्थना,ध्यान या मुळं तर सामान्य जीवनाबद्दलचं आकर्षणच नाहीसं झालं अशी वेळ आली होती. शिक्षण संपलं आणि शेजारच्याच गावांत नोकरीवर रुजु झालो.

"आठवणीतली ढासू दिवाळी "

लेखक पियुशा यांनी सोमवार, 22/11/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
हाय पियुशा सदर लेख आमची दिवाळीतली आठवण नुकतीच दिवाळी झाली आहे म्हटले चला दिवाळीबद्दलच खरडू या थोडेसे ................ "आठवणीतली ढासू दिवाळी " दिवाळीसण,रंगीबिरेंगी रांगोळ्या ,चांदण्यासारख्या टीम-टीमनारया पणत्या, आकाशदिवे ,फुलांची तोरणे , नवीन कपडे गोड - चमचमीत फराळ, सुवासिक फुले ,अत्तरे आणि अजून काय काय काय .......

घाण्या वरचा बैल

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 22/11/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
(ईयत्ता सहावीच्या कवीतेवर आधारीत) गोष्ट एका गावातली. तेलाची घाणी अन् त्यात कोलुवर फिरणारा बैल. बैलाच्या गळ्यातली वाजणारी घंटा म्हातोबाला दिलासा द्यायची. म्हातोबा शेजारच्या खोपट्यात आडवा पडलेला. त्याला त्या घंटेचा आराम. जो पर्यंत ती घंटा किणकिणायची तो पर्यंत सगळे व्यवस्थित चालले आहे ह्याची त्याला खात्री. मग तो खुशाल झोप काढायचा. जेव्हा बैलाला तहान भुक लागायची तेव्हा घंटा वाजायची थांबायची. ती थांबली की लागलीच एक बादली आंबोण त्याच्या पुढे तो घालायचा. त्याच वेळेस सुकं खोबरे घाणीच्या तोटीत आहे का पाहुन लागेल तसा नवा घाणा तयार करायचा. हे असे संध्याकाळ पर्यंत चालायचे.

मी आणि नवा पाऊस

लेखक नीधप यांनी गुरुवार, 18/11/2010 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
२००७ च्या साप्ताहिक सकाळ कथास्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात असलेली माझी कथा. --------------------------------------------------------------------------------- ‘‘कधी येणार तुझा मित्र?’’ प्रश्न आला आणि माझी तंद्री मोडली. पावसाळा सुरू व्हायच्या आधीची वेळ. उन्हाची तलखी, मळभ, मधूनच सुटणारा वारा.... सगळं एकाकी, एकटं वाटायला लावणारं. अश्यात मी विद्यापीठात दुपारच्या वेळेला बसस्टॉपवर उभी होते आणि येणारी प्रत्येक बस सोडत होते. प्रश्नकर्त्या आवाजाचा मालक बहुतेक विद्यार्थी असावा डॉक्टरेटचा.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम