Skip to main content

कथा

कथा: चंद्या सख्याची सहल

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/10/2010 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
कथा: चंद्या सख्याची सहल
चंद्या आन सखाराम दोघं जिगरी दोस्त हुते. शाळंत जायचं बरूबर. इटीदांडू खेळायचं बरूबर. त्याल, साकर, बा ची तमाखू, इडी आनाया गावात बरूबर जात. सकाळची शाळा सुटली म्हंजे संगच दोघांच्या बकर्‍या बरूबर चरायला रानात न्येत आसत. चंद्याच्या ५ आन सख्याच्या ८ बकर्‍या व्हत्या. रानात जातांनाबी त्ये मजा करत जात. कुनाच्या बांधावरच्या बोरी झोडपाया थांबत तर कधी कुनाच्या उसात शिरून मनगटाएवढा जाड उस तोडून खायाला सुरुवात करत. शेळ्या घेवून तसं त्ये मदुनच माळावरनं जात. तिथं थोड्या येड्या बाभळी व्हत्या.

आत्महत्या २० -२२व्या वर्षी.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 28/10/2010 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
आत्महत्या ---- का करावी वाटते आत्महत्या, आणि ते सुद्धा वयाच्या २० -२२व्या वर्षी. जमलेले सगळे झालेल्या घटनेला अतर्क्य, अकल्पित वगॆरे म्हणत होते, पण आदर्शला का वाटलं असेल या मार्गानं जावं असं, असतील काही समस्या, प्रश्न आणि जटिल पण असतिल तरी हे पाउल घेण्याआधी सगळे इतर मार्ग संपल्याची खात्री केली होती त्यानं ?

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

भीती

लेखक पारा यांनी मंगळवार, 26/10/2010 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मराठीत कथा लिहायचा हा प्रथम प्रयत्न. चूकभूल माफ असावी...:) तिला जरा जास्तच उशीर झाला होता आज. नाही म्हणजे कामं काय असतातच सारखी पण म्हणून रात्रीचे साडे-अकरा ? तरी बरं की तिच्या बॉस ने तिला घरापर्यंत सोडण्यासाठी वाहन पाठवलं होतं. ती तशी कार्यालयापासून दूर राहायची. तब्बल एक तास लागायचा तिला घरी पोहोचायला. आता रहदारी कमी जरी धरली तरी चाळीस मिनिटांच्या आत काही ती पोहोचू शकणार नव्हती. तिने गाडीवाल्याला फोन लावला आणि मुख्य गेट वर वाट बघत उभी राहिली. गाडीवाला तसा तिच्यासाठीच थांबला असावा. कारण तिने फोन केल्यावर तो लगेचच आला तिला न्यायला. त्यांचा नेहमीचा ओळखीचा माणूस होता तो.

मी मिसळपाव ची सभासद होते त्याची गोष्ट

लेखक प्रभा यांनी शुक्रवार, 22/10/2010 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी प्रभा. मिसळपाव ची नवी सभासद. माझे मेहुणे श्री सुधीर काळे यांच्या प्रयत्‍नांमुळे व मी नक्कीच लिहू शकेन या त्यांच्या माझ्यावरच्या विश्वासामुळे मी "मिपा" ची सभासद झाले. श्री काळे यांचे "मिपा" वर खूपच लिखाण आहे. ते मध्यंतरी ठाण्यात आले असताना त्यांनी माझ्या "मिपा" च्या सभासदत्वासाठी प्रयत्‍न केले. पण कधी कधी प्रत्येक गोष्टीत, अगदी लहान लहान गोष्टीतही सारखी माशी शिंकत असते. आता ही माशी कशी शिंकते हे मला माहित नाही. तिचा शिंकण्याचा आवाज कसा असतो? तिचे नाक कोठे असते? हे कोणालाच माहित नाही. मुळात माशीला सारखी सर्दी होतेच कशी?

ईशान ..... भाग २

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 21/10/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
3

ईशान ..... भाग १

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 21/10/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
3

को जागृति ? को जागृति ? @@@@@@ मी ! मी !

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 21/10/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख लिहिताना आम्ही परकाया प्रवेश केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी) सीटटया न अगदी दोन दिवस डोकं खाल्ल होत ! तो, मी अन आमच्याच ऑफिसातली आणि दोघं असं मिळून 'पार्टी ' करायची असा त्याच्या मनातला बेत तो माझ्या गळी उतरवायला बघत होता. आता या २०१० साली तुम्ही म्हणाल 'मग काय ? जायचं ! त्यात काय असं नव ?' पण मंडळी ही गोष्ट; हे आत्ता जे सार पार्टी, पिण, अन धमाल करत फिरणं सुरु असतंय त्ये सार करणं फकस्त पिक्चर मध्ये असायचं, त्या काळची !!