Skip to main content

कथा

कथा-कॉलेज कट्टा भाग ३

लेखक चेतन677 यांनी शुक्रवार, 16/01/2015 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे. दुसरा दिवस उजाडला.पहिले लेक्चर होते ते मॅन्युफॅक्चरींग प्रोसेसचं म्हणजेच म्हात्रे सरांचं.त्या दिवशी ज्ञानेश्वर आणि अभिला यायला जरा उशीर झाला.त्यांची आवडती जागा म्हणजेच मधल्या रांगेतला तो तीन नंबरचा बाकावर आधीच अखिल बसला होता.पण आज त्याच्याशेजारी प्राची नव्हती कदाचित ती अजुन आली नव्हती.ज्ञानेश्वर पटकन अखिलच्या शेजारी बसला.मग त्य

ट्रॅप - ५

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 05/01/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील साऊथ ब्लॉक परिसरातील ऑफीसमधल्या आपल्या डेस्कवर बसून कॅप्टन नितिन देशमुख आपल्या समोरील कागदाच्या कपट्याकडे रोखून पाहत होता. आतापर्यंत किमान तीनवेळा त्याने तो कपटा वाचला होता. त्यावर एकच वाक्य लिहीलेलं होतं. The Man on the terrace winked at the lady beside and thrown flowers at her! एखाद्या सामान्य माणसाने ते वाक्यं वाचलं असतं तर त्याला एखाद्या कथेतील प्रसंगाचं वर्णन वाटलं असतं. पण कॅप्टन नितिनला मात्रं त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळला होता. "गुड मॉर्निंग कॅप्टन!" एक मधुर स्वर त्याच्या कानावर आला. त्यासरशी त्याची समाधी भंग पावली. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं.

आजोळच्या गोष्टी १ आणि २

लेखक गुळाचा गणपती यांनी शनिवार, 03/01/2015 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं गाव औदुंबर. चांगला तासभर धुरळा उडवला कि बस पोचवायची ते औदुंबर फाट्यावर. लाडका मामा गाडी घेऊन बराच वेळ उन्हात, पावसात वाट पाहत असायचा. मोजकीच घरे असल्याने गावातील हरेक गृहस्थ माझ्या घरच्यांना माहितीच असायचा. अगदीच न्यायला कोणी आले नसल्यास लिफ्ट मागणे आणि लिफ्ट मिळाल्यावरचा आनंद म्हणजे....! एखाद्या बैलगाडीतून जायला मिळणे म्हणजे पर्वणी असायची. उगाचच चक-चक आवाज काढत घरापर्यंत पोचायचे ते म्हणजे जणू मी गाडी हाकत आणली अशा आविर्भावात. आम्ही येत असल्याची वार्ता मिळताच आजी खास रव्याचे लाडू वळायला घ्यायची.

आर्ट ऑफ द स्टेट

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 01/01/2015 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी सारखा तो दिवस उगवला, म्हणजे सुर्य उगवला आणि दिवस सुरु झाला, दोन चार दिवसापुर्वीच परीक्षा संपलेल्या असल्यानं घरातली सकाळची गडबड शांत झालेली होती, तरी पण वर्षभराच्या सवयींनं सगळं घर जागं झालेलं, अर्थात त्या जागेपणावर आळसाची एक मस्त साय आलेली होती. मी, बायको अन दोन्ही पोरी सगळेजण निवांत बेडवर लोळत होतो, दोन्ही पोरींचं लाथा आणि उशीयुद्ध मधुन मधुन नियंत्रित करत, रविवारची सकाळ कुणाच्या घरी धाड घालावी यावर आम्ही दोघंही स्वतंत्र विचार करत होतो. एका क्षणी, दोघांचा एकदमच आवाज आला, ''बंडाकडं जायचं ?'', आता एकमेकांना एकच प्रश्न विचारला म्हणजे उत्तर होकारार्थीच असणार होतं, ही दोन लेकरं आमच्या आयुष्

कथा-कॉलेज कट्टा भाग २

लेखक चेतन677 यांनी बुधवार, 31/12/2014 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!! मागील भाग कथा-कॉलेज कट्टा भाग १ या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे. तो दिवस होता २६ ऑगस्ट २०१२.डी.वाय पाटील कॉलेजच्या ऑफीसच्या बाहेर अॅडमिशनसाठी भली मोठी रांग होती. "यार,ज्ञानेश्वर आपण उद्या येउयात का?" अभिनवने सवाल केला. अभिनव दहा दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता.मुळचा अहमदनगर मधील अभिनवचा मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण झाला होता.

म्हमद्या .

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 29/12/2014 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
" कळश्या भोसडीच्या खेळायला का येन्नास . लगीन बिगिन केल्यास कि काय . च्यायला पोरगी घावली तुला . दोस्ताबरोबर खेळूस लाज वाटते स्हाय्बास . . " शनिवारी संध्याकाळच्या अगदी Peak Hours च्या गर्दीत . सिग्नल सुटताना गाडीला किक मारली . गियर टाकून पुढे जाणार तेवढ्यात हे वाक्य पडलं आलं . आलं म्हणण्यापेक्षा . आदळलं म्हणू शकतो . . आता यावर नॉर्मली मी भ , फ ची बाराखडी सुरु करतो . पण . . पण . खूप खूप प्रयत्नानंतर मागची सीट योग्य त्या कामी उपयोग होईल अशी व्यवस्था केली होती . डावीकडचा आरसा थोडासा वाकवून . . डायरेक बघता येईल अशी सोय केली होती .

बंदुकीची गोळी आणि ती

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/12/2014 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थात केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे.

सपान

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 26/12/2014 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
साळंला सुट्टी पडली की दादा येतो. न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय. आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत. लाड करायला. दादाची माज्यावर लई माया. माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा. आज्जी म्हन्ली, "उठा आन्जाक्का”. "दादा कुठंय?” म्या इचारलं. “अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली. "कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली. "दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो. आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.” "काल आला की” म्या पुन्ना बोल्ले. “स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली. खोटं? मंग हेच सपान.

Happy new year!!!

लेखक Maheshswami यांनी बुधवार, 24/12/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
बारमध्ये, परमिट रूम मध्ये, लाईट्स जमेल तेवढ्या मंद करून काळाकुट्ट अंधार करून ठेवण्याचे काय प्रयोजन असेल, हा मला नेहमी सतवणारा प्रश्न आहे. दारू पिणे काही गुन्हा आहे काय कि सगळ्यांच्या नजरा चुकवत अंधारात लपून करावा? गेल्या दहा मिनिटात वेटरचे "हेल्लो , शूक शूक " करून लक्ष वेधून घेण्याचा माझा दहावा प्रयत्न या अंधाराने हाणून पाडला होता. शेवटी, जोरात ओरडून बोलावल्यावर तो धावत पळत टेबलाकडे आला . मी तोंड उघडायच्या आधीच माहितीवजा धमकी दिली त्याने . "साब, और कुछ मंगानेका रहेंगा , तो अब्भीच बोलो . कल कि थरटी फष्ट की तैय्यारी के वास्ते बार आज जल्दी बंद होएंगा .

परवाना !

लेखक Maheshswami यांनी सोमवार, 22/12/2014 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं नुसतं! काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या.