Skip to main content

कथा

नेट केफे

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 29/01/2015 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
नेट केफे ऑगस्ट महिन्यातील एक संध्याकाळ. ऑफिस मध्ये होतो . ८ वाजले असतील . फोन वाजलाच. घरी असलो कि प्रचंड तिटकारा येतो या फोन चा . म्हणजे . एकूणच नको वाटतं . सारखं ते मेसेज न कॉल . त्यातून स्वतःहून कोणाला फोन लाऊन त्यांची विचारपूस करावी . हा स्वभाव नाही . पण ऑफिस मध्ये असताना फोनला पर्याय नसतो . आणि कानाला कायम ब्ल्यूटूथ सेट लावलेलाच . नेहमीच्या सवयीप्रमाणे . नाव न वाचताच उचलला . "कहा है ?" पलीकडून अगदी ओळखीचा आवाज . "ऑफिस मे . क्यू क्या हुआ ? " " कुछ हुआ नाही . नेट केफे आजा . सब है आज . " "नही रे . ऑफिस से लेट होगा . भूक लगी है . घर जाऊंगा . " यावर दोन मिनिटांची शांतता .

गुपित- एक गुढ रहस्यमय रुपक कथा -एकाच भागात संपुर्ण

लेखक जेपी यांनी सोमवार, 26/01/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"कस होणार या पोराच !." पार्थचे बाबा ,पार्थाच्या आईकडे पहात म्हणाले. "जाऊ द्या हो, अजुन लहान आहे आणी काही वाईट तर करत नाही ना!." पार्थची आई. पार्थ मात्र स्वतः मध्येच मग्न होता.पार्थ लहान असताना हातात उदबत्ती घेऊन बोबड्या भाषेत देवापुढे..जय..जय..करायचा तेंव्हा सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायच, पण पार्थ आता आठ वर्षाचा झालता.सुट्टीच्या दिवशी त्याच आवडत काम म्हणजे,देवाची पुजा करणे..देवपुजे मध्ये तो तास-दोन तास सहज रमुन जायचा.देवांना स्नान घालणे,वस्त्रानीं पुसणे. त्यांना गंध लावुन जागे वर ठेवणे हे मन लावुन करायचा.नंतर पाच-दहा मिनीट हात जोडुन प्रार्थना करायचा. पार्थ लहानपणापासुन आपल्या आजोबांना पुजा क

शरयत

लेखक आतिवास यांनी रविवार, 25/01/2015 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी साळा. कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो. तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड. तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत. सोपी नसतीय. पन माजा पैला नंबर आला. आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली. कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं. समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या. मंग बक्शीसं दिली. अंक्याला लब्बर, भान्याला पटटी. गुर्जीन्नी मला बोलिवलं. म्या आज्जीबाईच्या जवळ ग्येली. त्या म्हन्ल्या, “बाळ, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे?” “शरयतवाली” म्या बोल्ली. त्या हसल्या. म्हन्ल्या, “आमचीही शर्यतच चालू आहे कधीपासून.

गप्पा

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/01/2015 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज्जी हे बघ मिकी काय म्हणतो आहे! काय म्हणतोय? पोळ्यांची कणीक मळता मळता तिने स्वैपांकघरातून ओरडून विचारले. टीवी लाव म्हणतो आहे। तेला कार्टून बगायचे आहे. मिकीला की तुला? नाय, मिकीला! चल गप्पिष्ट कुठला. असा आजीचा काहीना काही संवाद दिवाणखान्यात एकटाच खेळणा-या दीपशी स्वैपांकघरातून तार स्वरात ओरडून सुरू होता. ओरडून घसा दुखला तशी भराभरा हातातले काम संपवून ती दिवाणखान्यात आली. आज्जी, हे बग, मी डंपर, डिगर सगळे बाहेर काढले. आज्जी हा मानूसला आत बसव नां ए आज्जी फ़ायर ईंजीन वी वौ वी वौ अस कां करतं? अरे त्याला लवकर जायच असत ना, म्हणून लोकांना रस्त्यातून बाजूला करायला आवाज करतं वी वौ वी वौ ....

चहा .... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2015 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
"साला चहा प्यायचा म्हणले की माझ्या अंगावरचे सगळे केस अटेंशनमध्ये उभे राहतात.......!" मी तिसर्‍या वेळेस हे वाक्य उच्चारले तसे सगळे माझ्याकडे डोळे विस्फारुन पाहायला लागले. "हे जोशी पण ने, साला एकदम घोचू हाये! चाय काय घाबरायचा गोष्ट हाये काय? जोशी तू पन ने साला काय पन गोष्टी करते, गपचुप कप उचल अँड खाली करुन टाक तुज्या पोटामंदी. स्टॉप युअर ड्रामा नाऊ! समजला....!" म्हातारा पारशी भडकला! आमचा होरमसजी दारुवाला म्हणजे एक पात्रच आहे! बर्मा फ्रंटवर महापराक्रम गाजवलेल्या या पारशी म्हातार्‍याला चहा म्हणजे जीव की प्राण.

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 20/01/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885 ' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर' भाग -०२ 'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या.

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 20/01/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.

चौघांची गोष्ट !

लेखक मन यांनी सोमवार, 19/01/2015 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक कथा काही दिवसांपासून डोक्यात घोळते आहे. नेमकी हव्या त्या फॉर्म्याट मध्ये लिहिता येत नाहिये. जशी आहे तशी ... आहे त्या रुपात इथे सादर करत आहे. **********************कथा सुरु***************************** जुनी आहे एक गोष्ट. झाली असतील काही शे वर्ष. एक होतं गाव. खरं तर ते नव्हतं नुसतं गाव. ते होतं मोठं राजधानीचं गाव. मोठ्ठं गाव. प्रसिद्ध गाव. प्रसिद्ध ठिकाणी वर्दळ.भरपूर प्रवाशी. देषोदेशीचे प्रवाशी. गावंही मोठ्ठं. गावात होते भटजी.मोठ्ठ्या गावातले मोठ्ठे भटजी. पण हे आटपाट नगरातले नव्हते. आटपाट नगरातले म्हंजे "एक होतं आटपाट नगर.

कथा-कॉलेज कट्टा भाग ३

लेखक चेतन677 यांनी शुक्रवार, 16/01/2015 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे. दुसरा दिवस उजाडला.पहिले लेक्चर होते ते मॅन्युफॅक्चरींग प्रोसेसचं म्हणजेच म्हात्रे सरांचं.त्या दिवशी ज्ञानेश्वर आणि अभिला यायला जरा उशीर झाला.त्यांची आवडती जागा म्हणजेच मधल्या रांगेतला तो तीन नंबरचा बाकावर आधीच अखिल बसला होता.पण आज त्याच्याशेजारी प्राची नव्हती कदाचित ती अजुन आली नव्हती.ज्ञानेश्वर पटकन अखिलच्या शेजारी बसला.मग त्य

ट्रॅप - ५

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 05/01/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील साऊथ ब्लॉक परिसरातील ऑफीसमधल्या आपल्या डेस्कवर बसून कॅप्टन नितिन देशमुख आपल्या समोरील कागदाच्या कपट्याकडे रोखून पाहत होता. आतापर्यंत किमान तीनवेळा त्याने तो कपटा वाचला होता. त्यावर एकच वाक्य लिहीलेलं होतं. The Man on the terrace winked at the lady beside and thrown flowers at her! एखाद्या सामान्य माणसाने ते वाक्यं वाचलं असतं तर त्याला एखाद्या कथेतील प्रसंगाचं वर्णन वाटलं असतं. पण कॅप्टन नितिनला मात्रं त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळला होता. "गुड मॉर्निंग कॅप्टन!" एक मधुर स्वर त्याच्या कानावर आला. त्यासरशी त्याची समाधी भंग पावली. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं.