सपान
लेखनप्रकार
साळंला सुट्टी पडली की दादा येतो.
न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय.
आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत.
लाड करायला.
दादाची माज्यावर लई माया.
माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा.
आज्जी म्हन्ली, "उठा आन्जाक्का”.
"दादा कुठंय?” म्या इचारलं.
“अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली.
"कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली.
"दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो.
आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.”
"काल आला की” म्या पुन्ना बोल्ले.
“स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली.
खोटं?
मंग हेच सपान.
हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून?
* शतशब्दकथा
वाचन
10570
प्रतिक्रिया
0