Skip to main content

कथा

छावणी - २

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 20/11/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/29500 ******* ३ जून १९४७ !! या दिवशी दिल्लीहून आकाशवाणीवरुन एक महत्वाची घोषणा केली जाणार होती. जनाब जिन्हांना अपेक्षीत असलेलं पाकीस्तान मिळणार की नाही? हिंदुस्तान एकसंध राहणार की देशाची फाळणी होणार? फाळणी झालीच तर ती नेमक्या कोणत्या आधारावर? पश्चिमेला पंजाब आणि पूर्वेला बंगाल यांच्यातील नेमका कोणता भाग पाकीस्तानमध्ये जाणार? पाकीस्तान झालंच तर तिथल्या हिंदू आणि शीखांचं काय? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? पाकीस्तान की हिंदुस्तान? उभ्या हिंदुस्तानातील अनेकांचं भवितव्य या घोषणेवर अवलंबून होतं.

एका अडनिड गावाची गोष्ट........२

लेखक दशानन यांनी बुधवार, 19/11/2014 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
एका अडनिड गावाची गोष्ट........१ * हणम्या आणि रम्याची चिता धडाडत पेटली होती, अगतिकतेने सारं गाव त्या चितेकडे डोळे सताड उघडे टाकून पाहत होते. बळीवर बळी ते घेत होते, पण आधी गावाच्या वेशीभायेर असलेलं भय आता गावाच्या जागृत बिरोबाच्या मंदिरापर्यंत पोचलं होते, म्हणजे आता त्यांचा वावर गावभर होता? असला प्रश्न चेहरयावर घेऊन प्रत्येकाचे डोळे त्या दोन चिता पहात होत्या.

एका नव्या इतिहासाची सुरुवात -१

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 19/11/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक काल्पनिका आहे – फँटसी. मराठीत दुर्मिळ असलेला प्रकार. इथे तांत्रिक तपशिलापेक्षा कथानकात रस घ्यावा अशी वाचकांना विनंती आहे. शक्यतेच्या पातळ्या तपासण्याचे निकष मानवी ज्ञानाच्या कक्षेत कमी आहेत. शास्त्रे भौतिक पातळ्या तपासू शकतात. अभौतिक अस्तित्वे शास्त्रीय उपकरणांनी टिपता येणार नाहीत. कलाकाराचा मेंदू अन व्यवहारी माणसाचा मेंदू यात वैद्यकीय उपकरणे तारतम्य करू शकतील का शंका आहे. तेव्हा चिकित्सक दृष्टीपेक्षा तरतम दृष्टी ठेवली तर या कथेचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल. ..

छावणी - १

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 19/11/2014 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
पंजाबच्या पश्चिम प्रांतातील गुजरानवाला शहर. शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठा वाडा होता. हा वाडा होता चौधरी महेंद्रनाथ यांचा. महेंद्रनाथ हे शहरातील प्रतिष्ठीत व्यापार्‍यांपैकी एक होते. समाजात त्यांना मोठा मान होता. धातूच्या भांड्यांचं एक मोठं दुकान त्यांच्या मालकीचं होतं. त्याखेरीज एका मोठ्या धान्यभांडाराचेही ते मालक होते. आपली पत्नी कमला आणि मुलगी सरिता यांच्यासह ते या वाड्यात राहत होते. या दुमजली वाड्यातील वरच्या मजल्यावर चौधरी आणि त्यांचा परिवार राहत होता तर खालच्या मजल्यावरील बिर्‍हाडांत अनेक भाडेकरु होते.

एका विचारवंताचा सल्ला...

लेखक चंद्रनील मुल्हेरकर यांनी सोमवार, 17/11/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारच्या वेळी एडव्होकेट बॉबी केसकर आपल्या ऑफिसात बसले होते,षेजारीच माश्या मारायचे रॅकेट ठेवले होते, त्यातुन जळकट वास येत होता..आजचे काम संपल्याचा तो पूरावा होता.. बॉबी केसकर तसा मॉड माणूस ,त्यांच्याकडे प्रचंड बुद्धीमत्ता असल्याने त्यांच्या कडे एकही 'केस' फिरकत नव्हती.

न वढलेली बिडी अन खाल्लेला मार 3

लेखक Vijay Shankar Mane यांनी सोमवार, 17/11/2014 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
उग डोक्याला ताप हून बसला हुता .तवर माग पाटलाचा पांडूतात्या वाकून बगत म्हणाला काय करताय र ! माझ्या हातातली बिडी बगून मला म्हणाल का र तू खालच्या आळीच्या शंकरचाका !

अंधारातली पहाट......!

लेखक फिझा यांनी रविवार, 16/11/2014 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारातली पहाट......! दबक्या पावलांनी श्रिया क्लासच्या दाराशी आली, " मे आय कम इन सर ?" " येस कम इन , यु आर लेट टुडे " सर घड्याळ पाहत म्हणाले . पहाटेचे सव्वा पाच वाजले होते. "सॉरी सर !" असे म्हणत श्रिया क्लास मधे येउन बसली. तिचे घाबरलेले डोळे ,थरथरणारे हात पाहत मी 'काय झाले ' असे खुणावुन विचारले. आणि तिनेही नंतर सांगते अशी ओठाची नुसती हालचाल करून सांगितले. 7 वाजता क्लास संपला तसा झपाझप जिना उतरत आम्ही सगळ्याजणी खाली आलो. आता कॉलेजला निघायचे म्हणून सायकल्स काढ़त काढ़त मी परत विचारले, " काय गं , बरी आहेस ना ? मगाशी काय बारा वाजले होते चेहऱ्यावर ? " " काही नाही गं !

न वढलेली बिडी आणि खालेला मार २

लेखक Vijay Shankar Mane यांनी शनिवार, 15/11/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्या दिशि पुन शाळत्न येताना पक्या म्हणाला कार इज्या आज चान्स मार्तुय का ……लगीच हनम्या माझ्या तोंडाकड आशेन बगत होता मी म्हनालू करतू कस तरी पण तुमी आंब्याकड थांबू नका देवळाच्या पारावर थांबा मी काम झाल कि तडक देवळातच येतु . वाटत खटाव करचा बापू भेटला आन म्हणाला आज इनामात्ला ढू हापसून मास पकडणार हायती इंजन लाऊन येणार असला तर घरन भाकरी घिउन या मास इनामातल्या हिरीवरच करणार हायती .

एक अडनिड गावाची गोष्ट... १

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 14/11/2014 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा आहे का? नाही ही कथा नाही, पण जे काही घडले होते ते एखाद्या कथेतीलच असते. तर किती बरं झाले असते. असं झाले असते, तसे झाले असते असे म्हणून आता काय उपयोग! जे घडायला नको होते ते घडले होते. देवासारखी माणसं शैतानागत वागली म्हणायची की भूताने झपाटली म्हणून तशी वागली ते त्या बिरोबालाच ठाऊक. पण जे काही घडलं भयंकर होते, असे कधी घडेल आणि त्या पापाची फळे अशी येथेच भोगावी लागतील, याची किंचित जरी कोणाच्या मनात शंका आली असती, तरी हा अनर्थ टळला असता. पण... दूरवर पसरलेलं जंगल, उत्तरेकडे आई-बापाचे दोन डोंगर, आणि त्या दोन डोंगराच्या कुशीत वसलेले, लहानसं, पण तसे संपन्न असलेले गावं!

न वढलेली बिडी आणि खाल्लेला मार ! १

लेखक Vijay Shankar Mane यांनी शुक्रवार, 14/11/2014 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इज्या ! ........... हि मुठी मानस बिड्या वडून नाकात्न कसा धूर काडत असतील र ....... पक्या, हनम्या ,दिल्या आन मी रानात्न येताना पक्या म्हणाला ! हे बेन दुसर्याला झाडव चढवायचं आन मग आपुन मजा बगायची खालन ह्यात लय तरबेज हुत इचार करून हान्म्या म्हणाला यक डाव बिडी वडून बगायला पायजे ! मी म्हनालू आयला खरच्कि गड्या माजा आज्या पण मस्त धूर काढतो नाकात्न आयला इज्या तुजा आजा दुपारी झोपल्याव यक बिडी आणकी हळूच काढून बंडलात्न मी जरा इचार केला आन म्हनालू जर घाव्लू बिव्लु तर वल्या फोकाटीन आय मारल सांच्याला . आर घाव्ल्यावर मारलं पण घावल तर पायजे ना...