Skip to main content

कथा

गुढ (एक रहस्य कथा-भाग 3)

लेखक चेतन677 यांनी बुधवार, 26/11/2014 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आता शिवमदेखिल स्वरासोबत त्यांच्या टीम मधला एक मेंबर होता. " मस्त हॉट आहे ना स्वरांजली...." या आवाजाकडे शिवमचे लक्ष गेले. "Excuse me???" शिवम. तोच समोरुन एक तरुण त्याच्याकडे येत होता.त्याचे डोळे लाल झाले होते.बहुतेक तो रोज निदान एकतरी बियर घेत असेल यात अजिबात शंका नव्ह्ती.आणि कदाचित कालची त्याची अजुन उतरली नव्हती. "प्लीज तुम्ही जरा नीट बोला.." शिवम जरा मोठ्यानेच म्हणाला. तोच एक तरुणी शिवमच्या कानात कुजबुजली. "तो संदीप आहे.आपला टीम लीडर...जरा सांभाळुन नाहीतर बॉस कडे तक्रार करेल तो तुझी." "का?

छावणी - ६

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 26/11/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरानवाला इथल्या छावणीतील निर्वासितांमध्ये आता हिंदुस्तानात जाण्याच्या उमेदीने चैतन्यं आलं होतं. हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय हा प्रश्न सर्वांपुढे आSS वासून उभा राहणार होता! छावणीत आलेला प्रत्येकजण आपलं घरदार, नोकरी किंवा व्यवसाय पाकीस्तानात सोडून कायमचा हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होता. प्रत्येकाला पुनश्च हरी ॐ म्हणूनच पुन्हा सुरवात करावी लागणार होती. परंतु हिंदुस्तानात पोहोचल्यावर निदान जीवाची सुरक्षीतता तरी लाभणार होती! कोणत्याही क्षणी एखादा धर्मांध माथेफिरू आपल्यावर चाल करुन येईल आणि आपला जीव घेईल ही तरी भीती नव्हती. मेजर चौहाननी या जथ्याची दहा तुकड्यांमध्ये विभागणी केली होती.

गुढ (एक रहस्य कथा-भाग २)

लेखक चेतन677 यांनी बुधवार, 26/11/2014 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवस झाले होते.कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्ह्ता.ज्या कंपनीत इंटरव्हु दिला तिथुनही काहीच कळाले नव्हते.शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले. "शिवम,अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचय का आपल्याला!!! व्वा मस्त..पण मग मला सांगितलं का नाही?" अजिंक्यने विचारले. शिवम एकदम शांत झाला. "अजिंक्य, एवढ्या दिवस तु माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्द्ल धन्यवाद!!मी गावाला चाललोय परत." शिवम. " तुला नेमक म्हणायचं काय?" कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले. " अजुन काय म्हणु....तीन दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्हु देऊन त्याचा काहिच रिप्लाय नाही.जिथे रिस्युम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही.

गुढ (एक रहस्य कथा-भाग १)

लेखक चेतन677 यांनी मंगळवार, 25/11/2014 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
गुढ इयत्ता सातवीचा निकाल लागला होता. अजिंक्य वर्गाबाहेर थांबलेल्या मुलींच्या घोळक्याकडे पाहात उभा होता. तेवढ्यात त्याच्या कानावर काहीतरी ऐकु आले आणि तो थेट पळाला ते शिवमच्या घरी..... "शिवम....ए शिवम...लवकर बाहेर ये..." तो ओरडला. " व्वा,मित्रा आलास तु!!

छावणी - ५

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 25/11/2014 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मिर्झा सिकंदरअली खान दर दोन - तीन दिवसांनी आपल्या मित्राची चौकशी करण्यासाठी छावणीत येत असत. येताना शहरातून काही आवश्यक वस्तूही आणत असत. प्रताप आणि उमा यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांनाही खूप वाईट वाटलं. महेंद्रनाथ आणि कमलादेवींचं सांत्वन करताना ते म्हणाले, "आपल्या तकदीरमध्ये जे असेल ते भोगल्यावाचून आपल्या हाती काही नसतं महेंदर! अल्लाको जो बच्चे सबसे प्यारे होते है, अल्ला उन्हें अपने पास बुला लेता है! प्रताप और उमाबेटीके साथ जो बी हुआ उसका मुझे बहोत अफसोस है! मेरे मजहबके लोग जो कुछ भी कर रहे है, वो देखकर उन्हें मुसलमानतो क्या इन्सान कहनाभी गलत होगा! इन्सानियत के नामपर कलंक है ये लोग!

एका नव्या इतिहासाची सुरुवात -२

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 24/11/2014 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१ पाटण्याचा तो अवाढव्य बंगला, अत्याधुनिक सजावट सोयीसुविधा यांच्यात अकलिप्ता हरवून गेली. तिला सगळेच नवे होते. आई काही दिवस राहिली अन पुन्हा पुण्याला गेली. शांतन्यच्या गहिऱ्या प्रीतीने तिच्या आयष्यात जादूमय रंग भरले. सोनेरी दिवस फुलपाखरे होऊन उडू लागले. गृहोपयोगी अशी सगळी अत्याधुनिक उपकरणे फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन वापरणे जरी तिला नवीन होते तरी तिने लीलया आत्मसात केले. ती मूळची अत्यंत बुद्धिमान असल्याचे शांतन्यच्या लक्षात आले. नवीन विषयांचे ज्ञान आकलन होण्याची तिची गती आणि क्षमता कल्पनातीत होती.

छावणी - ४

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 24/11/2014 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रँड ट्रंक रोड हा उत्तर हिंदुस्तानातील वाहतुकीचा सर्वात जुना मार्ग. प्राचीन काळी सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळात या मार्गाच्या काही भागाचं बांधकाम झालं होतं. तेव्हा हा मार्ग उत्तरपथ म्हणून ओळखला जात असे. मौर्यांची राजधानी असलेल्या पाटलीपुत्र (पटना) पासून ते वायव्य सरहद्द प्रांतातील तक्षशीला शहरापर्यंत हा मार्ग होता. १६ व्या शतकात शेर शहा सुरीने या प्राचीन मार्गाचं पुन्हा बांधकाम केलं. मुघलांच्या काळात या मार्गाचा वायव्येला खैबर खिंडीतून काबूलपर्यंत आणि पूर्वेला चितगावपर्यंत विस्तार झाला. ब्रिटीश सरकारने या मार्गाचा विस्तार आणि पुनर्बांधणी केली.

धोतर आणि तांब्या

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 23/11/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले अचानक गुडगुड आवाज कानी पडले कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले एका अपघाताने शहाणपण आज सुचल

शिंच्याचं पत्र.

लेखक Targat Porga यांनी शुक्रवार, 21/11/2014 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
होय रे बेण्या! कसा आहेस? तुझं पत्र काही येणार नव्हतंच. म्हटलं,चला आपणच देऊ एखादं धाडून परत. तू केलेला गुन्हा माझ्यासाठी कितीही अक्षम्य असला तरी फार काळ मी तुझ्याशी अबोल राहणार नव्हतोच. तुझ्याइतकं निष्ठूर होणं नाही जमायचं मला. तसं विशेष कारणही होतंच… परवा सुंद्री भेटली होती.,हो तीच! शेंबडी,रडकी,ढापणी,दोन वेण्या घालून मिरवणारी पण मनकवडी,मनमिळाऊ,अवसानी,खेळकर आणि तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारी भोळी सुंद्री.केवढा बदल झालाय म्हणून सांगू तिच्यात!

माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 20/11/2014 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५ या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी. मागिल लेखापर्यंत मी माझ्या कोकणातल्या गावाचे वर्णन केले होते.