Skip to main content

कथा

तीन दिवस दोन रात्री : भाग १

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 16/09/2016 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुभव खरा, नावे खोटी) त्या नोटांच्या बंडलातून सराईतपणे एक एका नोटेवर अंगठ्याचे बोट फिरत होते. ती दहाची नवी कोरी करकरित नोट हळुवार निसटली. अंमळ झटका घेऊन तीच्या डोक्यावरुन खाली घरंगळली. मऊसूत खांद्यावरुन येऊन उभारलेल्या वक्षावर क्षणभर स्थिरावली, पुढच्या क्षणी फिरून खाली ओघळली. घागर्‍याच्या निर्‍यांमधून लपत-छपत कार्पेटवर पडली. त्या निर्जीव नोटेवरल्या हसर्‍या गांधीजीच्या चष्म्यावर तिच्या टोकदार हायहिलची टाच पडली. गांधींचा चष्मा फुटला नाही पण माझ्या आतमधे खोल कुठेतरी, काहीतरी खळ्ळंकन फुटलं.

वाघीण

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 15/09/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.

ही कथा काल्पनिक आहे, याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही, असल्यास योगायोग समजावा.

इंचू चावल्यासारखं ते जनावर पिसाळलं. झाडाखालनं मुसंडी मारत सरळ मचाणाच्या खांबाला त्यानं ढुसनी दिली. तसं मचाण कलंडी झालं. म्हाराज घसरतंच खाली गेले. पालथं पडूनंच त्यांनी बंदूक सावरली. बसल्या बसल्याच त्यांनी नेम धरुन अजून एक बार काढला. गोळी रानरेड्याच्या पोटात बसली. पण जनावर ढिम्म हललं नाही. पाय खुरडत म्हाराजांना चेंगारण्याच्या इराद्यानं पुढं झेपावलं. शिरपानं घोड्यावरनं खाली उडी मारत तलवार बाहेर काढली. प्रसंग बाका होता.

शेजारनी जीजी (अहिराणी कथा)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/09/2016 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे विरगावले आमना घरनाआडे तुळसा बोय राहे. तिले आम्ही जीजी म्हनूत. जीजीले दोन आंडरो व्हतात आनि दोन आंडरी. दोन्ही आंडरीसना लगनं व्हयी जायेल व्हतात म्हनीसन त्या त्यास्ना सासरले व्हत्यात. दोन्ही आंडरोबी बाहेर राहेत. येक सर व्हता म्हनीसन बदलीना गावले राहे ते दुसरा शेतकरी म्हनीसन दूर वावरात राहे. जीजीना घरना मानोस मालेबी आठवत नही तैन्हपशी गमी जायेल व्हता. म्हनून घरमा जीजी येकटीच राहे. याळभर याना नहीथे त्याना वट्टा दुखाडी जीजी नुसता चावळाना गाडा भरी राहे. आमना घरना मांगे आड व्हता. त्यावर आजूबाजूना खंडीभर घरं पानी भरेत.

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी

दाद

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 12/09/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
दाद . (कथा) . (काल्पनीक) जांभेवाडी.. चारी बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं , निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटसं गाव . जेमतेमच लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये वीज , एस टी , वाहने अशा आधुनीक सुधारणा अजुन पोचलेल्या नव्हत्या . हे गाव या सुविधांपासुन तसं दुर्लक्षितच राहिलं होतं . रोजच्या कामांसाठी , गरजांसाठी जांभेवाडीच्या ग्रामस्थांना तालुक्याच्या गावाचाच आधार होता . जांभेवाडीपासुन तालुक्याच्या गावाकडे जाणारी एक पाउलवाट होती . आपल्या कामांसाठी , गरजांसाठी गावकरी हिच पाउलवाट तुडवत तालुक्याच्या गावाला जात येत असत . हि लांबची पायपीट आता त्यांच्या रोजच्या जीवनाचाच भाग झाली होती .

अवधूत (भाग-९)

लेखक प्रभास यांनी गुरुवार, 08/09/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम बेसावधपणेच तो पाण्यात कोसळला... ग्ळक्क… ग्ळक्क… पाण्याचे जोरदार घुटके नाकातोंडात वेगाने शिरले. डोक्यात एकदम जोरदार कळा उठल्या. काही क्षणांतच त्याचे पाय विहिरीच्या तळास लागले. अचानक तो जाणीवेत परत आला. ही काय भानगड चालू आहे? बंद झालेले डोळे चटकन उघडले. त्या एक दोन क्षणांतच त्याला मिटल्या डोळ्यांपुढे काहीतरी दिसलेलं होतं. अचानक विजेच्या प्रकाशात वस्तु झळाळून उठतात तसंच. पण ही विचार करण्याची वेळ नव्हती. नवीन श्वास घेणे आवश्यक आहे… भराभर हातपाय मारत तो पाण्याच्या बाहेर आला. एव्हाना श्वास संपलेला होता. बाहेर येऊन त्याने नाकातोंडात शिरलेलं पाणी थुंकून काढलं. जोरात ढास लागलेली होती.

मोगरा आणि गुलाब

लेखक निखिल निरगुडे यांनी गुरुवार, 08/09/2016 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या. तो तिला जवळ घेऊन समजावत होता. पण ती हट्ट सोडेना. जणू तिला काहीतरी अपेक्षित होतं, ते तिला मिळेना. आणि तिला काय हवंय हे त्याला कळेना. म्हणून त्याने शब्दांच्या सुंदर जाळ्यात तिला अडकवण्याचा प्रयत्न सुरु केला, म्हणजे गोंधळून तिची तीच सावरेल. हुंदके देत ती म्हणाली, "ठीकेय. मला मान्य आहे तुझं प्रेम मानसीवर आहे. पण म्हणून मला तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार नाही?" तो शांतपणे हसत होता. त्याचा हसणं तिला बोचत होतं. तो तिचे डोळे पुसत तिला उत्तर देऊ लागला, "श्रावणी, प्रेम आणि मैत्री दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. जसा गुलाब आणि मोगरा.

जपानी भूतकथा।।।

लेखक क्षमस्व यांनी सोमवार, 05/09/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक मजेशीर जपानी गोष्ट भाषांतरीत करून सांगतो. सहज टाईमपास म्हणून. मुजीना नामक भूतप्रकाराची... आजच्या टोकीयो शहराच्या बाहेर खूप पूर्वी एक जुना किल्ला होता. त्याला लागूनच एक मोठं तळं होतं. हा किल्ला तत्कालीन व्यापाराच्या महत्वाच्या मार्गावर येत असल्याने व तेव्हा रस्त्यावर लाईट्स नसल्याने जेव्हा जेव्हा कुणी या रस्त्याने प्रवास करीत असत ते ते सर्व लोक शक्यतो रात्रीपूर्वीच किल्ल्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असत.

दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 04/09/2016 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द - भाग १ या आधीचे इतर लेखन - अनुक्रमणिका दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक ) राघवची आणी देविकाची नंतर कधीच भेट झाली नाही . राघवनेही कधी तसा प्रयत्न केला नाही . देविकाने त्याला चांगलाच दर्दभरा धक्का दिला होता . त्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्याबद्दल राग , द्वेश साठला होता . त्याने स्वताला परिक्षा , अभ्यास यामध्ये गुंतवुन घेतले .

शिका

लेखक स्वलिखित यांनी रविवार, 04/09/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपा वर पहिल्यांदा काही शब्द अर्पण करत आहे .लेखनात व टंकनात चुका आहेत / असल्यास क्षमस्व. __/\__ आज शिकाने मनाशीच निर्धार केला होता. जर का आपल्याला उत्तर मिळालं तर शाबासकी मिळाल्या बिगर राहणार नाय असं शिकाला वाटत होतं. काय ना बाय कारणं दाखवून आज मुद्दाम बाकीच्या पोरांना त्याने मगाच गावात धाडलं होतं. उरली सुरली दोन जनावरं घेऊन गावाकडं आता निघाला होता. तसं म्हणलं तर आता कडुसच पडल होतं. पायाखालची वाटच काय ती दिसत होती तेवढी.