काळरात्र आयझँक असिमोव्ह
सारो युनिव्हर्सिटीचा संचालक, अँटन ७७ भडकला होता. समोरच्या तरुण पत्रकाराकडे तो रोखून बघत होता.पण थरमॉन ७६२ ला त्याच्या रागाने काहीच फरक पडला नव्हता.आपल्या उमेदवारीच्या
काळात त्याने अशा अनेक अशक्य मुलाखती घेतल्या होत्या आणि बदल्यात शरीरावर जखमा,मोडलेली हाडे नि सुजलेल्या डोळ्याची कमाई केली होती.अर्थात त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. आता तो फक्त
संचालकाचा पारा उतरण्याची वाट बघत होता. त्याच्या मते आधीच हे सगळे अवकाशसंशोधक विक्षिप्त होते,नि हा वृद्ध संचालक त्यांचा शिरोमणी.
संचालक रागावर ताबा ठेवत कसाबसा बोलू लागला," तुझ्या धाडसाचं कौतुकच करायला पाहिजे.
मिसळपाव
