Skip to main content

कथा

मोस्ट एलिजिबल बॅचलर...2016

लेखक जयू कर्णिक यांनी शनिवार, 29/10/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइलची बेल वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, ‘०२२’ आणि पहिले चार डिजिट… अरे हा तर ‘बॉंबे हाऊस’ मधून आलेला, म्हणजे टाटा मोटर्स मधील कुणा मित्राचा फोन असणार. ‘हॅलो…’ आता कुणा मित्राचा परिचित आवाज कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, इझ जयंथ कार्निक देअर?’ – जयंत कर्णिक ची एवढी वाट लावली म्हणजे मित्रांपैकी कोणीच नाही.

सर्जिकल ष्ट्राईक आन मोदी गुर्जीची गोष्ट

लेखक वडगावकर यांनी शुक्रवार, 28/10/2016 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या एक दोन आठवड्यापासून 'सर्जिकल स्ट्राईक' ह्या विषयावरून ईतक्या चर्चा,कुचर्चा,विचर्चा चालू आहेत की डोकं अगदी पिकलं .... पवार साहेब म्हणाले,ह्यात काय, सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही बी केलंय की राव...... ह.भ.प. केजरीवाल महाराज दिल्लीकर म्हणाले पुरावे द्या... (खरं म्हणजे केजरीवाल वहिनी तरी त्यांना सीरियस घेत असतील का?,ही शंका आहे ) प.पु....राहुल गांधी तर खून की दलाली वगैरे...

शिक्रेट (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 27/10/2016 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
म्हराटी शाळंची घंटी वाजली. . . . मजी येक वाजला! लगी म्या भांडं घिउन काकुंच्या घरला जाते. ''काकू जरा मुरवण देता का?'' ''बस बाळा दोन मिन्ट, होतंय.'' काकू. मलाबी बरं वाटतं जरा- रेडिवो आयकायला भेटतो. लई छान मराठी गाणी लावत्यात काकू. काकू चांगल्या हायत. रोज मुर्वान मागितलं तरी नाय म्हणीत नैत. पन तेंची तायडी?. ती घरात नसल्यालीच बरी. नायतर मग चवकशा सुरूच- ''सुमी रोज कशाला येती?'' ''आन मुरवान यवड्या मोट्ट्या भांड्यात कशाला?'' उरलं तर काकू कालवनच देत्यात. मग काय दिपवाळीच! मुरवान मिळलं तर चटनी टाकून म्या, पिंटी आन नकुशी- भाकरीला खातो- दिवस निगतो.

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/10/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) पहाटे पडलेल्या चित्रविचित्र स्वप्नांमुळे ग्रेगॉर दचकला व गाढ झोपेतून उठला. त्याने हात ताणायचा प्रयत्न केला आणि तो उडालाच. त्याचे ह्रदय धडधडू लागले. त्याचे चक्क एका मोठ्या किड्यात रुपांतर झाले होते.

सोनचाफ्याची फुलं आणि त्तो स्पर्श(भाग २)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/10/2016 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तीला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची.

वेळ ही निराळी (भाग दोन)

लेखक कऊ यांनी शुक्रवार, 21/10/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ ही निराळी भाग दोन ती एक रात्र. त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं.. सर्व काही.. ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली.. ती वेळ निराळी होती.. पुजा गोरे.. ती मुलगी जी कधीतरी केवल वर जीव ओवाळून टाकायची,तीच पुजा अजय सोबत होती आज.दुपारचं जेवण सुमोने बाहेरून मागवून घेतल.जेवून झाल्यावर पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या.

अरबस्थाना तील दोन बोधकथा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/10/2016 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
... .................... कथा क्रमांक एक एका गावात एक माणुस रहात असतो..तो "मै जिंदगी भर रोता ही रहा हूं" टाईप असतो.. तो परमेश्वरावर नाराज असतो..अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही असे म्हणत तो कुढत जीवन जगत असतो... तो विचार करत रस्त्याने जात असता त्याला एक फकीर दिसतो.. तो त्या फकिराला थांबवतो.अन अमक्याला सुंदर बायको दिली..त्याला भरपूर पैसा दिला..याला जमीन दिली..त्याला बी एम ड्ब्लु कार दिली." अन मला काही नाही.. असे रडगाणे सुरू करत परमेश्वरावर नाराजी व्यक्त करतो.. फकीर हसतो व म्हणतो..अरे एव्हढेच ना?

माझी पहिली मैत्रीण रॉक्सी

लेखक हृषीकेश पालोदकर यांनी बुधवार, 19/10/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतला “खंड्या” धडा वाचायच्या आधीपासूनच मला कुत्रा प्राणी फार आवडतो. माझं हे प्रेम खेड्यात सुरु झाल्याने ते अस्सल देशीच राहिलं. पुलंनी “रावसाहेब” मध्ये सांगितलेली वेव्हलेन्थ प्राणि मात्रांच्या बाबतीतही लागू पडते असा माझा अनुभव आहे. ज्याच्या डोक्यावरून मी सहज हात फिरवला त्याने माझ्यात काय पहिले कोणास ठाऊक, तो थेट शेतापर्यंत सोबतीस आला. मी त्याला भाकरी दिली नव्हती न बिस्किटाची चटक लावली होती. फक्त प्रेमापोटी साथ देणार हे रस्त्यावरच पिल्लू नंतर माझा जिगरी मित्र झाला. माफ करा मैत्रीण झाली कारण ती एक कुत्री होती.

वेळ ही निराळी (भाग - एक)

लेखक कऊ यांनी शनिवार, 15/10/2016 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
"वेळ ही निराळी" "यार हे readings बरोबर येतच नाही. कँडी वोल्टमीटरकडे बघ ग जरा. सर पण कुठे गायब झाले. 5.30 झाले ना यार" सेजलची ही बडबड ऐकून डोक दुखायला लागलं.आधीच 10.40-2.40 lectures 2.45 ला लगेचच practical .

अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 12/10/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy.