Skip to main content

कथा

बादलीयुद्ध १२

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 04/09/2016 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला डायलॉग. "गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो..... गयी रे... ह्या ह्या ह्या..." हे शेवटचं 'ह्या ह्या ह्या' म्हणजे रडण्याचा टोन. तो हसण्याचा की रडण्याचा यावर बरेच तर्क वितर्क होते. कसलेले कलावंत श्मामराव पोर्चच्या मधोमध तंगड्या वगैरे पसरुन आपला अभिनय पणाला लावत होते. "अबे या की आता" बराच वेळ खुदूखुदू रडून झाल्यावर त्यांनी रागाने फर्मान सोडले. दुसरा डायलॉग. "क्या हुआ गणपत ऐसा रो क्यू रहा है?" शेवटी कुणीतरी ढकलून दिल्यावर सागर नावाचं कॅरॅक्टर श्यामरावची चौकशी करायला गेलं. मग पुन्हा एकदा. "गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो..... गयी रे...

<< हिशेब-ठिशेब>>

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 02/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

“जेन्ट्स” टॉयलेट

लेखक हेमंत बेंडाळे यांनी शुक्रवार, 02/09/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक हं एक ब्लॉग काय लिहिला फार मोठा लेखक झाला वाटतं “प्रास्ताविक” म्हणे. अहो अस काय म्हणता मागच्या ब्लॉगच्या घवघवीत यशानंतर ( काय विश्वास नाही बसत घवघवीत यश म्हणून बघा बर मोजुन ६ प्रतिक्रिया भेटल्या त्याला ( ठीक आहे, ठीक आहे २ माझ्या आहेत पण ... लोकांनी टाकल्या म्हणून टाकल्या ना मी , हो एकाने लिहिल आहे कि त्याला काही कळलं नाही म्हणून. काय नेहमीच आपला क्वालिटी क्वालिटी करतात लोकं, क्वांटीटी पण बघायची कधी कधी असो ..

झिंग झिंग झिंगाट....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 31/08/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
झिंग झिंग झिंगाट.... १९७३ च्या दुष्काळानंतर एवढा भीषण दुष्काळ बीड जिल्ह्याने पाहिला नव्हता. राम पोंढेच्या पोरांच्या शाळा केव्हाच सुटल्या. मोठा कुठेतरी बिगारी काम करीत होता तर छोट्याचे कळण्याच वय नव्हते. त्याला बिचाऱ्याला फक्त एवढेच कळत होते की आता भूक लागल्यावर मागच्याप्रमाणे खायला मिळत नव्हतं. जास्त रडारड केल्यावर धपाटं मात्र मिळत होतं. दररोज एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी वर्तमानपत्रातून झळकू लागल्या. राम्याने मनाशी प्रतिज्ञा केली की तो असलं काही करणार नाही. ‘‘वेळ आली तर म्या गाव सोडल, चोऱ्या करल, पण आत्महत्या करणार नाही.

सादत मन्टो आदरांजली-३ थंडा गोष्त..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/08/2016 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’ - मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला. स़ादत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire सादत मन्टो आदरांजली-१ सादत मन्टो आदरांजली-२ सादत मन्टो आदरांजली-३ थंडा गोष्त.. इश्र्व

टाळी - शतशब्द कथा

लेखक विशाल चंदाले यांनी सोमवार, 29/08/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
काठीवर डाव्या पायाचा भार देत तिने एकापुढे हात पसरले. पाऊल पुढे टाकत त्याने मान हलवली. उपाशीपोटी ती हात पसरत पुढे निघाली. एक, दोन रुपयांपेक्षा जास्त मिळत नव्हते. नळावर पाणी पीत असताना एका टाळीने तिचं लक्ष्य वेधून घेतलं. एक हिजडा रेल्वेमध्ये टाळी वाजवून हात पसरत होता/ती. लोक लगबग करून दहा रुपयाची नोट हातावर टेकवत होते. तिने हातातल्या एक रुपयांकडे बघून आशाळभूत नजरेने हिजड्याच्या हातातल्या दहा रुपयांकडे बघितले. मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दूषणे देत ती निघाली. एकाएकी तिचा चेहरा उजळला. ती थबकली. तिला काहीतरी सापडलं होतं. तिने नळावर चेहरा धुतला. रुपयाचं पान खाऊन तोंड रंगवलं.

बेधुंद (भाग : १७ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 28/08/2016 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सुऱ्याचे दिवस आनंदात 'न्हाऊन' सरत होते . स्वप्नातही त्याने त्याला पियासारखी 'गर्लफ्रेंड' मिळेल असा विचार केला नव्हता. स्वर्ग जर कुठे असेल तर इथेच - पियाच्या मिठीत ! अजून २ वेळा तरी त्याला पियाला भेटता येणार होते , त्याचे दिवसरात्र पियाच्या 'गरम' श्वासांच्या आठवणीत जात होते - स्वर्ग कुठे असेल तर इथेच ! अन, दुसरीकडे एकाच रूम मध्ये राहून नित्याला काहीच चांगले भासत नव्हते ! ऐनवेळी हर्षलाचे 'ट्रेनींग' बदलल्याने , तो दिवसातून २०-२५ वेळा तरी तिला कॉल करत असे पण तीचा नंबर लागत नव्हता . दुसऱ्या कुणाला फोन करायची सोय नव्हती ! महाराष्ट्रापासून दूर असल्याने त्याला काय करावे हे कळत नव्हते .

फाळणीच्या कथा 2 : हमारा देश

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 28/08/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ उर्दू कथा : इब्ने इंशा ________________________________ इराण मध्ये कोण राहतात ?? इराण मध्ये इराणी लोक राहतात इंग्लिस्तान (इंग्लंड) मध्ये कोण राहतात ?? इंग्लिस्तान मध्ये इंग्लिश लोक राहतात. फ्रान्स मध्ये कोण राहते ?? फ्रान्स मध्ये फ्रांसिसी लोक राहतात!!! हा कोणता देश आहे ?? हा पाकिस्तान आहे !!! इथे पाकिस्तानी लोक राहत असतील ना ?? नाही, इथे पाकिस्तानी नाही राहत !!! इथे सिंधी राहतात !!! इथे पंजाबी राहतात !!! इथे बंगाली राहतात !!! इथे हे लोक राहतात, इथे ते लोक राहतात पण पंजाबी तर हिंदुस्तानात पण राहतात ??? सिंधी तर हिंदुस्तानात पण राहतात ??? बंगाली तर हिंदुस्तानात पण राहतात ??? मग हा व

सरहद पर

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 26/08/2016 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
फाळणीच्या कथा तश्या वेदनादायकच असतात. गेले खूप दिवस हि कथा मनात घर करून होती, काल जयंत काकांच्या मंटोच्या कथा वाचतांना पुन्हा आठवली. उर्दू कथा : नन्दकिशोर विक्रम __________________________________________________________________________ "सोड रे मला सामान बांधून आवरू दे पटापट", शाहिदा पदर सोडवत म्हणाली. "मग सांग ना अम्मी ??

स़ादत हसन मन्टो आदरांजली - २ ‘‘खोल दो !’’

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/08/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’ - मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला. स़ादत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन.