Skip to main content

कथा

लसूण

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 24/08/2016 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपुन पद्या. जग आपल्याला पद्या म्हणतं. का म्हणतं? WE DONT NO. आपल्याला ल्ह्यायला भौतेक जमणार नाय. आपुन निसता हिंडतो. सायबाला फोन करुन "सायेब कामधंदा कसा काय चाललाय?" म्हणून इचारतो. आपुन सायबाचे फेवरेट. आपल्याशिवाय लाईन चालणारंच नाय. आपल्याला मशनीतलं सगळं जमतं. नुसतं चालवतंच नाय. नट बोल्ट खोलून मेंटेनस बी ठेवतो. दुपारी आपण कन्वेयरच्या साईडला झोपतो. सायेब काय बोलत नाय. आपण सायबाचे फेवरेट. चार दिवस सुट्टी मारायची तर आपुन आठ दिवस मारतो. तवा सायेब बोंबलतं. आपुन ऐकूण घेतो. पण आपण सायबाचे फेवरेटंच. आपण गँगचे लीडर. पोरांना काय दुखलं खुपलं, आपण निस्तारतो. सकाळी उठलो. दात घासलं. आंघुळ केली.

द स्टार्क स्टोरी-३

लेखक क्षमस्व यांनी बुधवार, 24/08/2016 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
कमांडर रक त्या काळ्या धूसर आकृतीपुढे उभा होता. आकृतीचा चेहरा अस्पष्ट होता. सर्वांग काळ्या चमकदार कपड्याने झाकलेले होते. कमांडर रक गुडघ्यावर बसला.... एक दीर्घ आणि खोल आवाज घुमला... "कमांडर.." "येस डार्थ.." "डार्क फोर्स तुझ्याबरोबर राहील..." रकने मान डोलावली! "सर्व जीवसृष्टीचा विनाश... आणि पुनर्निर्माण... " "येस डार्थ!" "तू जाऊ शकतोस...." रकने तिथून काढता पाय घेतला. मात्र लांबूनही आकृतीचा हसण्याचा आवाज येत होता... रक तिथून तडक उडत्या युद्धनौकेकडे निघाला. ती युद्धनौका म्हणजे गॅलॅक्सिचं एक आश्चर्यच होतं.तिचा आकार नाबू ग्रहाएवढा आणि त्रिकोणी होता.

अवधूत (भाग-८)

लेखक प्रभास यांनी बुधवार, 24/08/2016 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
अवधूत (भाग-७) अवधूत (भाग-६) टेकडीच्या मंद उतारावरुन त्याची पावले वेगात खाली उतरु लागली. चंद्र एव्हाना माथ्यावर आलेला होता. त्याची सावली देखील त्याच्या पायात घुटमळत घुटमळत वेगाने खाली उतरत होती. खुरट्या गवतातून टोकदार दगड पायाला जोरदार काचत होते. बोचरा वारा अंगावर शहारे आणीत होता. पण तिकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता त्याला. इथून वेगात दूर कुठेतरी निघून जायचं. बस्स! अचानक वरुन रंगनाथच्या हाका त्याला ऐकू येऊ लागल्या. त्याने मागे वळून पाहिले.

बादलीयुद्ध ११

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 23/08/2016 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
सुमडीत कुमडी म्हणून त्यादिवशी नुसताच बसून राहिलो. परीक्षेचे दिवस फार वैतागवाणे. म्हणजे रात्रीसुध्दा डोके वगैरे ओले करुन अभ्यासाला बसणे ही माझी पद्धत होती. पुस्तकात जरा कुठं डोकं घातलं की मन कुठल्यातरी डोंगरावर वगैरे जाऊन भटकायचं. हे फार वाईट. मागं एकदा कुणी सांगितलं होतं की पेटत्या मेनबत्तीकडे एकटक बघत राहावे. मी लाईट वगैरे बंद करुन तसा बघत ही बसलो होतो. बराच वेळ. मग भीतीच वाटायला लागली. बरीच भुतंबितं आजूबाजूला वावरत असल्यासारखी वाटायला लागली. म्हटलं नकोच हे. नंतर पुस्तक उघडल्यावर अक्षरं दिसायची पंचाईत झाली. ते वेगळंच. नंतर भिंतीवर एक कोरा कागद लावला. त्याच्या मधोमध ठिपका वगैरे.

आदरांजली -१ टोबा टेक सिंह

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/08/2016 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
स़ाअदत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन. अर्थात तुम्ही त्या वाचल्या असतील पण मी हे माझ्या समाधनासाठी लिहितोय असे समजुयात.....

गावाकडची गोष्ट (भाग 4 ) शेवटचा

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 23/08/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: http://www.misalpav.com/node/37022 भाग २: http://www.misalpav.com/node/37041 भाग 3: http://www.misalpav.com/node/37058 भाग ४  ते गोदामाच्या दिशेने निघाले आणि मी त्यांच्या मागे. गोदामाच्या दारापाशी जीवा उभा होता. "आत कोणाला सोडू नकोस. मी आणि दिघे एकूण लाकडांची मोजणी करून लगेच बाहेर येतो आहोत." अस म्हणून मालक गोदामात शिरले.

दर्द - भाग १

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 22/08/2016 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द . --- भाग १ ----------- कथा --------- काल्पनीक ---------------- कॉलेजमध्ये गॅदरिंगची धामधुम चालु झाली होती . सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते . संध्याकाळची वेळ झालेली होती . हळुहळु अंधार पडु लागला होता . थोड्याच वेळात फॅशन शोचा कार्यक्रम चालु झाला . या फॅशन शोच्या वेळी आणी एकुणच पुर्ण गॅदरींगमध्ये काही गैरप्रकार घडु नये म्हणुन कमिटीने कॉलेजमधल्याच काही धट्ट्या कट्ट्या मुलांना बाउन्सर कम व्हॉलेंटिअर म्हणुन नेमले होते . हे कार्यकर्ते आपल्या खिशाला व्हॉलेंटिअरचा बॅज सगळ्यांना दिसेल असा ठळकपणे लावुन ऐटीत इकडुन तिकडे हिंडत होते . अधुन मधुन उगाचच इतरांवर गुरकावत होते .

रणथंभोर ची राणी

लेखक लोनली प्लॅनेट यांनी रविवार, 21/08/2016 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
राजस्थान मधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान १९९७ चा जुलै महिना, जंगलातील एका भागात एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला, हि अतिशय आनंदाची घटना पाहण्यासाठी भारतीय व्याघ्र तज्ज्ञ डॉ वाल्मिक थापर व आयरिश माहितीपट निर्माता कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन हे दोघे गेले होते, त्यांनी पहिले कि तिन्ही बछडे मादी आहेत. काही दिवस त्यांनी बछड्यांचे निरीक्षण केले, तेंव्हा त्यांना दिसले कि एक मादी बछडा इतर दोन बछड्यांपेक्षा जास्त आक्रमक व खेळकर आहे. त्यांनी पहिले कि तिच्या चेहेऱ्यावर एक माशाच्या आकाराचा पट्टा आहे , कॉलिन नि वाल्मिक थापर ना विचारले FISH ला हिंदीतून काय म्हणतात ?

गावाकडची गोष्ट (भाग 3)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 21/08/2016 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ पुजारीबुवा देवळाच्या बाजूलाच फर्लांगभर अंतरावर राहात होते. घराच्या आजूबाजूला बरीच फुलझाडं होती. पेरू, चिक्कू, आवळे अशी थोडी बहुत फळझाड देखील दिसत होती. ते बघून मी म्हणालो,"बुवा झाडं बरीच आणि छान आहेत. बाग छान ठेवली आहे तुम्ही." त्यावर ते हसत म्हणाले,"अहो मी काही करत नाही. मालिनीला झाडांची खूप आवाड आहे. फुल झाडं आणि फळझाडं सगळी तिनेच लावली आहेत. मागे विहीर आहे त्यातून दहा-पंधरा बादल्या पाणी काढावं लागत रोज या झाडांसाठी. नाहीतर इथल्या हवेला कसली जगतात ही झाडं. पण मालिनीला अजिबात कंटाळा म्हणून माहित नाही. रोज सकाळी उठून ती फुलं काढते आणि सगळ्या झाडाना पाणी घालते.

बादलीयुद्ध १०

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 21/08/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
काळवंडून गेलेल्या आभाळात नुसत्याच विजा चमकत असतील तर ते एक मनोहरी दृष्य असते. आता पाऊस येणार. लगेच पडणार. मात्र तसं काही होत नाही. आभाळात पाऊस दबून बसतो. भक्ष्याच्या प्रतिक्षेत. विजा कडाडतात. भर संध्याकाळी अंधारुन येतं. वारासुद्धा पिसाळलेल्या डुकरासारखा सैरभैर. टेकडीपासून डाव्या बाजूला, उतारावर वाळलेल्या वाहत्या गवतात वसलाय एक वाडा. जीर्ण. युगे लोटली. पण वाडा चिरेबंदी. त्याला वाडा म्हणावं किल्ला हा ही एक प्रश्न आहे. उसवलेल्या छतातला एक पत्रा वाऱ्यावर डुलतो आहे. त्याचा भयानक चिरका आवाज आसमंतात घुमतो आहे. मी झपाझप पाऊले टाकत वाड्यावर जातो आहे. गेटवरुन जाण्यापेक्षा मी कुंपणावरुनच उडी टाकली.