Skip to main content

कथा

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ७)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 21/11/2016 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी. खासगी नोकरीला निवृत्तीचं वय नसतं.गुरूनाथ सारखे, वेळ जावा म्हणून किंवा कार्यक्षम रहाण्यासाठी काम करत असतात.शरीर थकत असतं हे अशावेळी जाणवत नाही.बाहेरचे अवयव उदा.डोळे, कान, हातपाय,जोपर्यंत कुठलीच कुरकुर न करता कामात येतात तोपर्यंत सगळे काही आलबेल आहे असं वाटत असतं.पण शरीरातल्या आतल्या अवयवांचं काय?

व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 18/11/2016 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम! तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?! काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे! आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत. १. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल २.

संन्याशी आणि उंदीर!

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 17/11/2016 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
संन्याशी आणि उंदीर! हि गोष्ट लहानपणी वाचली होती. एका गावाबाहेर एक मोठ पण जीर्ण असं गणेशाचं देवालय असते. तिथे एक संन्यासी राहत असतो. असतो तसा त्याच गावाचा पण सन्यास घेतल्यामुळे गावाबाहेर ह्या मंदिरात राहत असतो. गावात भिक्षा मागून आपली उपजीविका चालवायची आणि ध्यान धारणेत काल व्यतीत करायचा हा त्याचा दिनक्रम. त्याच मंदिरात एक उंदीरही राहत असतो. तो उंदीर सुद्धा एकटाच राहत असतो. पण तो ह्या सन्याशाने आणलेल्या भिक्षेतील धन्य कधी मधी मंदिरात वाहिलेले धन वगैरे गोळा करत असतो. आता एव्हढासा उंदीर त्याची गरज ती किती असणार!

बोट - आयजीच्या जिवावर बायजी उदार

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 17/11/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही घटना बोटीवर घडलेली आहे. मात्र ती कुठेही घडू शकली असती आणि त्याचे परिणाम तितकेच तीव्र होऊ शकले असते. मी बोटीवर थर्ड इंजिनियर होतो. एका मालवाहू बोटीवरच्या लोकांची संख्या हल्ली पंचवीसच्या आसपास असते. तेव्हां ती पंचेचाळीस असायची. इंजिनरूममध्ये काम करणार्या खलाशांचा एक म्होरक्या असायचा. त्याला ‘इंजिन सारंग’ म्हणत. आमचा इंजिन सारंग कोकणातला होता. वय साधारण पंचावन्न वर्षं. तेव्हां इ मेल वगैरे नव्हते. पत्रानीच बातम्या कळायच्या. एका पत्रात त्याला त्याच्या आईचं देहावसान झाल्याची बातमी कळली. घरापासून दूर राहाणार्या कित्येक लोकांमध्ये एक गैरसमज असतो.

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 17/11/2016 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१ पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) ‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला..... "ॲना !

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ६)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 17/11/2016 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या उतारवयातल्या आठवणी सुम्या आणि तिच्या नवर्‍याला कोकणात रहायला येऊन बराच काळ निघून गेला.सुरवाती सुरवातीला गुरूनाथ आपल्या घरात एकटाच खाणावळीतून डबा आणून जेवायचा.खरं म्हणजे सुम्याने त्याला आल्या आल्या सांगीतलं होतं की तू आमच्या बरोबरोबर जेव म्हणून.पण गुरूनाथला ते अवघड वाटायचं. नंतर गुरूनाथ एकदा आजारी पडला.सहाजीकच सुम्या आणि तिचा नवरा त्याची देखभाल करायचे.करता करता त्यालाही कळून चुकलं की,बरं झाल्यावर आपण आपला एकट्याचा डाबा आणून जेवणं तेव्हडं योग्य दिसणार नाही. तेव्हा तो त्यांना म्हणाला,आपल्या तिघांचं जेवण आपण खाणावळीतूनच आणूया.नाहीतरी सुम्याला ह्या वयात दोघांसाठी तरी जेवण करण्याची मेहन

पत्थर

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 14/11/2016 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ जवळ अडीच तास मी त्या बसस्टँडवर उभा होतो. कोणतीही बस आली की पळत जाऊन बोर्ड वाचणे हे माझे कामच होऊन बसले. अतिशय अवजड अशी सुटकेस मी एका बाकड्याच्या शेजारी ठेऊन दिली होती. तीही कोणीतरी उचलून चोरुन घेऊन जाईल म्हणून मी मोकळ्या पटांगणातून तिच्यावर नजर ठेऊन होतो. कोल्हापूरला जायच्या सतरा बस येऊन गेल्या. एकाही बसमध्ये नीट उभा राहायलाही जागा नव्हती. वरच्या दांडक्याला धरुन अडिचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास एका पायावर उभा राहून करायच्या विचारानेच कडमडायला झाले होते. आता इथे दिवसरात्र बसून राहिले तरी हाती काय फारसे लागणार नव्हते. सरळ सुटकेस उचलली आणि हायवेवर आलो.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ५)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/11/2016 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
उतार वय होण्या अगोदर जे आयुष्य असतं ते ही मनाची द्विधा करीत असतं त्यावेळच्या आठवणी. सुम्याच्या मुलीची अमेरिकेतली कॉलेजची वर्ष आता संपत आली होती.सुम्याचा एक प्रश्न तिच्या मुलीने सोडवला होता.सुम्याच्या मुलीला अमेरिकेतच एक चांगला जोडीदार मिळाला होता.तो पुण्याचाच होता.

काटा रुते कुणाला…..भाग ६

लेखक Jabberwocky यांनी शुक्रवार, 11/11/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला…..भाग ५ http://www.misalpav.com/node/37966 सागरने फोन ठेवला, ठेवला कसला मधेच कट केला. तो माझ्याशी असं कधीच बोलला नव्हता. मी पुन्हा फोन ट्राय केला पण त्याने कदाचित रिसिव्हर बाजूला काढून ठेवला असणार, फोन लागला नाही. तशी मी तिथून गच्चीवर गेले. आजूबाजूला सगळीकडे शांतता होती, आभाळाकडे पाहत मी स्वतःच्या विचारांमध्ये गढून गेले. सागरला जे मनापासून सांगावस वाटत होत ते मी माझ्याशीच माझ्या मनात बोलू लागले. सागर.....किती विलक्षण आहे हा मुलगा. हा केंव्हा माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्य होऊन गेला माझं मलाच कळलं नाही.