Skip to main content

कथा

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ नवा दृष्टीकोन

लेखक रुपी यांनी गुरुवार, 23/02/2017 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
a खांद्यावर पर्स, हातात छत्री, डबा, गळ्यात मंगळसूत्र आणि ओढणी सांभाळत स्टॉपपासून पन्नास मीटर लांब जाऊन थांबलेल्या बसमध्ये चिखलातून वाट काढत गर्दीतून स्वतःला आत घुसवलं. खिडकी नीट बंद होत नसल्यामुळे काल पावसाचं पाणी आत आलं होतं, त्यामुळे आज आयलकडच्या सीटवर जागा मिळाली, बरंच वाटलं. 'मॅनेजरला काय उशीरापर्यंत मीटींग ठेवायला? चापेल घरी जाऊन आयतं.' कॉलेजकन्यकांचा घोळका खिदळत बसमध्ये शिरला.

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ दिवसाची लाईट

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 23/02/2017 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
a "तू लाईट चालू करतो का नाय?", लेबर कॉलनीतला सदाशिव सकाळी सकाळी सोसायटी गेटवरच्या वॉचमनवर भडकलेला. "वरनंच आडर हाय, दिवसा ९ ते ६ बंद ठ्वा सांगील्ती, बाकी काय म्हायीत नाय" इति वॉचमन. हतबल होऊन सदाशिव आला तसा तणतणत गेला. बिल्डीन्गमध्ये कुणाचे पडदे किलकिलले तर कुणाच्या गॅलरीतल्या चहाचे झुरके मंदावले. मग दुपारी एकेकजण खाली गेटवर वॉचमनकडे विचारपूस करून सकाळच्या चर्चेचा आढावा घेऊ लागले. पहिला मजला: अरे, एवढी मस्ती आहे तर हेड ऑफिसला बोल की म्हणावं!

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ स्वप्नं

लेखक निरु यांनी गुरुवार, 23/02/2017 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
aaa "शाळेत अतिरेकी लपल्याची खबर मिळाल्यामुळे आम्ही क्षेपणास्त्र डागलं. अतिरेकी मेले पण शाळेची इमारत कोसळली आणि तुमच्या यजमानांना आणि काही विद्यार्थिनींना हकनाक प्राण गमवावे लागले. पण तुम्ही या दुःखात अडकून न पडता निर्वासितांच्या छावणीत शाळा पुन्हा सुरु केलीत हे खरोखरच कौतुकास्पद आहे. काही मदत लागली तर सांगा", असं छापील बोलून तो ऑफिसर निघून गेला. पण तिला मदतीची गरज नव्हती.

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ हाक

लेखक चॅट्सवूड यांनी गुरुवार, 23/02/2017 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
aa तुम्हाला सगळं जेव्हा संपवायच असतं ना तेव्हा घाई असते, आरामात मरता येत नाही. पण मला शांतपणे मरायच होत. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, स्वतःला समुद्रात लोटून द्यायच. मग तडक निघाले समुद्र किनारी, रात्रीच्या वेळी, कोणी बघणार नाही, शांतपणे निरोप घेता येईल. सरळ त्या समुद्राला जाऊन भिडले, डोळे मिटून घेतले, थोड्याच वेळात मुक्ती!! मला कोणी हाक मारली का? मला कोण बोलवतय? मी माघारी फिरले, धावत परत किनारी आले, डोळे मोठे करून बघितले, वाळूवर कोणाची तरी पावलं उ

मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १७-१८

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 22/02/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
दरवाजाची चौकट एकदम अस्पष्ट झाली व तरंगत कुठेशी नाहीशी झाली. चंद्र...चंद्राचा रोगट प्रकाश... त्याचे डोळे त्या प्रकाशाला सरावताच त्या विवराचा तळ एखाद्या चमकदार पाण्यासारखा चमकू लागला. जणू काही त्या पाण्याला नवी पालवीच फुटली आहे.
मोबियस १७ तेवढ्यात विवराच्या कडेला पंख फडकताना जसा आवाज येतो तसा आवाज झाला.

आईसक्रीम

लेखक तिमा यांनी बुधवार, 22/02/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही. तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई.

मोबियस प्रकरणे भाग -२ : प्रकरणे १५-१६

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 20/02/2017 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
.....पण त्या डोळ्यात त्याला अपरंपार वेदना दिसल्या पण तिरस्कार व कडवटपणा मात्र बिलकूल नव्हता. ती कशाची तरी याचना करते आहे असे त्याला वाटले. अशक्य! त्याला भास झाला असणार. डोळ्यातील भावना हा एक भाषेचा अलंकार आहे. बुबुळाचा आणि भावनांचा काय संबंध?

इक बंगला मेरा न्यारा--२

लेखक तिमा यांनी सोमवार, 20/02/2017 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्रः- त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली. मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!! दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्‍या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला. "तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत." "काय झालं ?" मुलाने विचारलं. " माझ्या मुलाला वरच्या खोलीत एक आजोबा दिसले, असं तो म्हणतो. पण आम्हाला काहीच दिसलं नाही." त्यामुळे, ही जरा अस्वस्थ झालीये.

इक बंगला मेरा न्यारा.

लेखक तिमा यांनी शनिवार, 18/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला.