मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

सैरभैर डायरी - २.३

कपिलमुनी ·
२.१ २.२ "मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले. २.३ उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो. पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !" मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो " पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

सैरभैर डायरी - २.२

कपिलमुनी ·
२.१ मॅडम, त्या पोरींना घेऊन या. पोरी लंगडत आल्या.. थोड्या जखमा दिसत होत्या.. "हाच होता का तो?" पोरींनी मान डोलावली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई, बाप ,नोकरी ते जेलमधला संडास सगळ गरगर फिरायला लागले २.२ "जा मॅडम पोरींना घेऊन, मेडिकल झाली असाल तर वॉश करून येऊ दे." मॅडम पोरींना घेऊन गेल्या. "पोरींना ओळखता का या?" साहेबांचा प्रश्न . "हो साहेब .

सैरभैर डायरी - २.१

कपिलमुनी ·
आयुष्यात काय काय गंमती जमती झाल्यात चाळीशी नंतर याच्या आठवणी लिहाव्यात आता असा विचार केला. यात सलगता काही नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य घटना ! पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्यांचे आभार .

विश्वासाचे तर्क आणि तर्काचा विचार

देवू ·
चित्रपटांत दाखवतात तसे, आई-वडील मुलांना कवेत घेऊन नीतिमूल्यांचे बाळकडू पाजतात तसा प्रसंग माझ्या वाट्याला कधीच आला नाही. “हे चूक आहे” किंवा “ते करू नकोस” असे बोट दाखवत शिकवण देण्याचा सोहळा आमच्या घरात कधी घडला नाही. वाईट गोष्टी करू नयेत, हे मला घरातून नव्हे तर शाळेत गेल्यावर गांधीजींच्या " तीन माकडांनी " शिकवले. मात्र उपदेशांचा अभाव असला तरी वाचनाचा संस्कार आमच्या घरात नि:शब्दपणे रुजवला गेला होता. घरात येणारी मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रे दररोज वाचलीच पाहिजेत, असा बाबांचा न बोलता आलेला पण ठाम आदेश होता. सुरुवातीला मी मराठी ‘मटा’ वाचून दिवसाची सुरुवात करत असे.

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

विवेकपटाईत ·
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

५- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387 मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली.

४- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने. क्रमशः मागील दुवा : https://www.misalpav.com/node/53386 खूप गदगदून रडायचे होते पण गळ्यातले त्राणच संपून गेले होते. त्या दिवशी तशीच पडून राहिले. खाण्यापिण्याचीही वासना हरवली होती. संध्याकाळी सासूबाई नी जवळ घेतले. माझ्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवला. मला माई आठवली. मला कुठे दुखले खुपले की ती ही असेच करायचे. माझ्या डोक्यावर हात फिरवत सासूबाई म्हणाल्या. खा पोरी दोन घास खाऊन घे.

३- तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हु

विजुभाऊ ·
तोच विचार होता अगोदर. आणि तेच केलं असते पण वैकुंठरावाना गोपीकाबाई च आवडल्या . त्यामुळे यावं लागलं इकडे. आतोबा हसतात. क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53380 अगे कौसल्ये असे कसे म्हणतेस. समोरून चालून स्थळ आलंय तर नको का म्हणतेस. दुर्गा आज्ज्जी आता या बोलण्यात पुढे आली. जोडा कसा राम सीतेसारखा शोभेल. मला कळतंच नव्हते काय चाललंय ते. जोडा आणि सोयरीक हे दोन नवीन शब्द माहीत झाले इतकेच. बैलजोडी माहीत होती. पण जोडा हे काहितरी नवीनच. घरात का ठेवणार आहेस. मुलीला, मी या वयाची होते तेंव्हा सासूबाईच्या हाताखाली स्वयंपाक शिकत होते. आडाचे पाणी शेंदायचे, दोन दोन खंडी ज्वारीचे पीठ दळायचे.

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....( २)

विजुभाऊ ·
अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्‍या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण
क्रमशः मागील दुवा https://www.misalpav.com/node/53375 स्पर्षाचे गारूड म्हणायचे की की त्या निष्पाप हसण्याचे. ज्याच्या कडून कसलीही अपेक्षा नाही. ज्याला आपल्याकडून काहिही नकोय. लौकीक अर्थाने ते नाते कसले म्हणायचे.