पेरणाचिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही
अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या.
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच..
सहजच चूक ती मान्य करोनी, तू निमूट माझ्यासमोर यावे,
तुला पाहुनी छद्मीहसूनी मी मग उदारातेने माफ करावे.
सहजच मग तू लाचार हसूनी, स्पर्ष मला जरा करु पहावा,
शहारुन मी झुरळा सारखा झटकून त्याला दूर करावा.
सहजच तुझिया नयनी तेव्हा अंगार क्षणभर फुलूनी यावा,
संधी साधुनी तेवढीच मग शब्दांचा तूज मार बसावा .
सहजच म्हणूनी बाजाराला, आपण दोघांनी पोचावे,
रिक्तहस्ते कैसी परतू मी?
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते...
आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन
(मन भूत भूत ओरडते..)
तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी
का बाहेरची बाधा होते?
मळभ दाटते तेव्हा
मन भूत भूत ओरडते..
सहावे इंद्रिय जेव्हा
शंकांची उडवीते राळ,
आवेग जरा वा-याचा
भासतो जणू वेताळ..
मिटताच डोळे माझे
उभा मज समोर ठाकतो,
रोज मला उठवाया
तो झोटिंग बनुनी येतो..
लोक म्हणती आहे वेडा
दिवस असो वा रात्र,
किंचाळत असतो सारखा
ताणूनी सर्व ही गात्रं..
(ही भुताटकी
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी
घाण उग्र भपकारा
लांबूनच आला
क्वार्टर टाकून आला
सकाळी सकाळी
फेसाळत्या सोड्यात
बर्फाचा मनोरा
लिंबू जाउन बसले
जरासे बुडाशी
पाय जड झाले
दृष्टी नाही डोळी
अवस्था ही झाली
सकाळी सकाळी
किती पेग गेले
घशातून भरारा
म्हणे आठवांचा
सुटण्या येरझारा
घरचे निष्ठुर
म्हणती पितो देशी
विदेशी न मिळता
सकाळी सकाळी
रिकामी बाटली
अन पुडी फरसाणाची
जणू साक्ष देती
नादान पणाची
दिसे उभे घेउन
कुणी हाती जोडे
का भास व्हावा
सकाळी सकाळी
क्षणात डोळे
खाडकन उघडावे
कुणी तरी खाडकन
थोबाडी हाणावे
पैजारबुवा,
पेरणा अर्थातच
(जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती )
मुलगी घरी जायला निघते तेव्हा,
प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून.
फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा
आठवड्याची भाजी, मसाले, लोणची..
बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण..
डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..
१.
तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात..
मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही!
पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?
म्हणे "आरामात बसू"!
२.
म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही?
अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा.
(सत्य घटनेवर आधारीत..... शंका असेल त्यांनी आमंत्रण देऊन प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी )
मला वाटलं कसला दळीद्री आहेस तू ...
पण नंतर लक्षात आले की मागच्या पार्टीची वसूली करत होतास
कुत्र्या!
३.
आज पहाटे तो लवकर उठला
डबा उचलून धावत सूटला
लायनीताल्या लोकांना ढकलून दिले
दार जोराने बडवले
आताल्याला लवकर बाहेर बोलावले
जराही वेळ नाही असे सांगितले
आतले प्रकरण कुल वाटले
हालचालीच्या आवाजावरून मंद भासले
मनोमन स्वप्न रचले
वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे
"अरे बाबा सावकाश आवर ,
होल वावर इज आवर"
आजची कथा अशी झाली
ज्याची बीजे त्याने कालच पेरली
काल त्याच्या खास मित्राने
बढती मिळाल्याचे सांगितले
बास ते एक कारणच झाले
त्याच्याकडून पार्टी मागायचे
दुपारचे जेवण बाहेर घ्यावे
मस्तपैकी चिकन हाणावे
प्रेरणा अर्थात
ती विडंबित कविता
धूसर होऊन
विरून जाते
कधी उचकापाचक
करता करता
अवचित दिसते
पुन्हा विडंबन ते
प्रतिक्रियांच्या
पल्याड नेते
अन् नकळत हसू
अवखळसे
ओठांवर येते
चिवट कवी हे
घाव विडंबित
सोशीत राहतो
अन् पुन्हा नवा
कच्चा माल पाहूनी
मी प्रच्छन्न हसतो
पैजारबुवा,
पेरणा अर्थातच
स्वतःची अक्कल इवलीशी
दुसऱ्याकडे ही असे थोडीशी
हे मान्यच नाही तयासी
काय म्हणावे या वृत्तीसी
पप्पूबाळा
मम्मा मॅडम मुग गिळीती
बडवून कापाळास घेती
पाहूनी तव मंदमती
जी तुझ्या खानदानाची महती
पप्पूबाळा
कैसी खांग्रेसची प्रगती
कैसा खांग्रेसचा नाश
केवळ असे दैवदूर्विलास
त्याचे दु:ख असे कोणास?
पप्पूबाळा
दुराग्रही,अहंकार ग्रस्त
जनतेस करुनी त्रस्त
ज्ञान स्वतःचे पाजळतोस
का विदुषकासम वागतोस?