मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

खुन्नस !

जे.पी.मॉर्गन ·
हे खरंतर (माझंच) नक्कल - चिकट लिखाण (कॉपी-पेस्ट) आहे. आधी एका संकेतस्थळावर प्रकाशित केलेलं. पण म्हटलं मि पा वर लिहायची सुरुवात ह्यानंच करावी. तुका म्हणे त्यातल्या त्यात..... ! नाही हो... ही खुन्नस म्हणजे एकेरी वाहतुकीतून उलट्या बाजूने येणाऱ्या पुणेकराकडे सिग्नल तोडणारा पुणेकर ज्या नजरेने बघतो ती खुन्नस नाही. किंवा हिमेश रेशमिया त्याच्या गाण्यांनी बिचाऱ्या श्रोत्यांवर काढतो तशीदेखील खुन्नस नाही. आपल्याला अभिप्रेत खुन्नस वेगळी आहे. खुन्नस.... तुम्ही म्हणाल अचानक खुन्नस ह्या प्रकाराबद्दल इतकं प्रेम उत्पन्न होण्याचं कारण? ते ही तसं इंटरेस्टिंग आहे.

मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

limbutimbu ·
मी हिन्दुस्तान मोटर्स लिमिटेड द्वारा आयोजित ग्रेट ड्रायव्हिन्ग चॅलेन्जमधे सहभाग घेतो आहे. निवडलेल्या स्पर्धकाने १० दिवसात ३००० किमी चा प्रवास जोडीने (कपल) करणे असे प्राथमिक स्वरुप आहे. स्पर्धकान्ची आवेदनपत्रे इन्टरनेटवरुन मागवलेली आहेत स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, पहिल्या १०० जणात निवड होण्यासाठी मला तुमच्या मतान्ची आवश्यकता आहे!

कोलकोत्याच्या दादा

मूखदूर्बळ ·
एक तरी धाव होऊ दे कोलकोत्याच्या दादा.. मिशा तुझ्या वाढवून घे आणि मग दाखव अदा.. बांधून घे गार्ड तु नाहीतर सुटुन जाइल रे बाया बापे हसतील न बघताच 'नगमा' मात्र बघून रे…. पछाडून दे लाथाडुन दे चेंडू सगळे सोडून दे शर्ट काढ सांभाळून नायतर हाडांचा मुरब्बा दिसेल रे….. फलंदाजीचा काय भरोसा परखून घे तु जरा आवरासावरा करुन घे संघातून काढल तर रणजी खेळयला जायच ना रे….

बीस्ट ऑफ बाकू!

चतुरंग ·
४ नोवेंबर २०००. पश्चिम लंडनमधल्या हॅमरस्मिथ उपनगरातला रिवरसाईड टेलीविजन स्टुडियो. आत बसलेले काही भाग्यवान लोक श्वास रोखून पडद्याकडे बघत होते. आजच्याच डावात सारं काही संपणार की आणखी शेवटचा एक डाव खेळाला जाणार ह्याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली होती. पंधराव्या डावात काळी मोहोरी घेऊन खेळणार्‍या क्रामनिकनं अडतिसाव्या चालीला आपला हत्ती पाचव्या पट्टीत नेला.

बोआ काँस्ट्रिक्टर!

चतुरंग ·
"ह्या मुलाला बुद्धीबळातले फारसे काही गम्य नाहीये. ह्याला पुढे ह्या खेळात काही भविष्य आहे असे मला वाटत नाही!" आपल्या बुद्धीबळ अकादामीमधे दाखल झालेल्या १२ वर्षाच्या मुलाबद्दल जगज्जेत्या मिखाईल बॉटविनिकने उद्गार काढले! नियतीची खेळी सुद्धा पहा कशी अगम्य असते, हाच मुलगा पुढे अतुलनील जगज्जेता झाला अनातोली कारपॉव आणि बॉटविनिकची भविष्यवाणी खोटी झाली! 'अनातोली' ह्या रशियन नावाचा अर्थ आहे 'सूर्योदय'! किती सार्थ ठरवले ना आपले नाव त्याने? १९५१ मधे पूर्वीच्या सोवियेत रशियामधल्या उराल प्रांतात जन्मलेल्या अनातोलीची बुद्धीबळाशी तोंडओळख झाली ती वयाच्या चौथ्या वर्षी.

आमचे क्रिकेट अंपायरिंग ... भाग १ ... परीक्षा

भडकमकर मास्तर ·
परीक्षा आपण रणजी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात बघतो ते अंपायर कसे तयार होतात ? प्रथम स्थानिक असोसिएशनची परीक्षा द्यायची, पास झाले की स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करायची, काही विशिष्ट पंधरा की वीस सामने झाले की तुम्ही त्या असोसिएशनच्या पॅनलवर येणार. मग पुढची परीक्षा द्यायला पात्र ठरणार.या सगळ्या परीक्षा दर वर्षी होत नाहीत. चार पाच वर्षांतून एकदा होतात. पुढची परीक्षा विभागीय.

कोण कोम???

सुनील मोहन ·
चार वेळा महिला मुष्टीयुद्ध विश्वविजेती एम्.सी. मेरी कोम यांच्याबद्दल असे उद्गार काढलेत अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मिल्खा सिंग यांनी. भारतीय मुष्टियोद्धा संघटनेने मेरी कोम यांची राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. फ्लाईंग सिख या नावाने प्रसिद्ध असलेल्या मिल्खासिंग यांनी ही महिला कोणता खेळ खेळते हेच माहिती नाही असे म्हटले. मणिपूरच्या मेरी कोमने सलग चारवेळा महिला विश्वविजेती होण्याचा सन्मान मिळविला आहे.

हे भारतात होईल?

बहुगुणी ·
http://fieldnotes.msnbc.msn.com/archive/2008/12/01/1685159.aspx अगदी हाच नसेल तरी असे इतर काही उपक्रम भारतात नक्कीच होत असावेत. अशा उपक्रमांची माहिती मिपा वर संकलित करता येईल का? तरुणाईचा (under-20) सहभाग मिपा वर कमी दिसतो तो वाढवता येइल.