सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे.
हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत.
व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे.