मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

आमच्या तेंडल्याचा वाढदिवस !

जे.पी.मॉर्गन ·
सच्या भावड्या तुझा वाढदिवस आला..... आमच्या साठी २४ एप्रिल हा "सचिन दिवस" ! खोटं नाही सांगत - ह्या दिवशी आम्ही घरी गोडधोड करतो.... तू खेळत नसलास तर तुझ्या खेळींची चित्रफीत बघतो. आणि आम्ही गेल्या वर्षभरात काय काय बरोबर - चूक केलं त्याचा हिशोब मांडून तुझ्यासारखं काहीतरी (आमच्या लायकीनीच रे!) करायचा संकल्प करतो. ह्या वर्षी तर खूप मोठं सेलेब्रेशन होणार ! आयपीएल मध्ये ज्या पद्धतीनी मुंबईचा संघ हाताळलायस, जसा काय खेळलायस... आणि हो की रे !

पुन्हा एकदा लढत ६४ घरांच्या विश्वविजेतेपदाची!

चतुरंग ·
तारीख २० एप्रिल २०१०. तब्बल ४० तासांचा थकवणारा प्रवास करुन विश्वनाथन आनंद बायको अरुणा समवेत अखेर एकदाचा बल्गेरियाची राजधानी सोफियाला पोचला आणि माझ्यासारख्या लाखो रसिकांनी सुटकेचा निश्वास सोडला! आईसलँडमधल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाने तो फ्रँकफर्टला चार दिवस अडकून पडला होता आणि शेवटी त्याला गाडीने जावे लागले. तो आणि त्याचा आव्हानवीर बल्गेरियाचा वेसेलीन टोपालोव ह्यांच्यातला विश्वविजेतेपदाचा सामना २३ एप्रिलला सुरु होतोय.

द नवाब ऑफ नजफ़गढ़!

मेघवेडा ·
"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्‍या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!" पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्‍यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला.

अभिनंदन छोटा डॉन!

महेश हतोळकर ·
छोटा डॉनच्या ब्लॉगची सकाळने घेतलेली दखल! http://www.esakal.com/esakal/20100325/5160732294887613459.htm * फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा. लगे रहो डॉन भाई. अभिनंदन.

फिर आया मौसम आयपीएल का !

जयवी ·
फिर आया मौसम आय पी एल का । पुन्हा एकदा धूमधडाका आय पी एलचा. मनोरंजन का बाप …इति सोनी टिव्ही :)
पुन्हा ते तासनतास टीव्ही ला चिकटून बसणं, पुन्हा संध्याकाळच्या सगळ्या कार्यक्रमांना कात्री !! टिव्ही वर फक्त सोनी मॅक्स !! गेल्या दोन वर्षांपासून ह्या आय पी एल नं जो काही धुमाकूळ घातलाय ना की ज्याचं नाव ते ! त्या ललित मोदीला एक कडक सॅल्यूट !! त्याने हे जे काय प्रकरण सुरु केलंय त्याला खरंच तोड नाही. पैशांचा पाऊस पाडून खेळाडूंना त्याने आकर्षित केलं आणि प्रेक्षकांनाही ! मला क्रिकेटमधलं फार काही कळतं अशातला भाग नाही.

कारभारी गोपाळे!

चतुरंग ·
दिवाळीच्या आसपासचे अंगावर काटा मारणारे थंडीचे दिवस. सायकल दामटत शाळेत निघालो होतो. उललेल्या ओठांवर बोचर्‍या वार्‍याने चुरचुरत होतं. डोळ्यांना झोंबरं वारं लागून पाणी येत होतं. पहाटेच्या अंधारात सायकल स्टँडला लावून कुलूप घातले. किल्ली खिशात टाकली. तालमीच्या लाकडी दरवाज्याजवळ दबकत दबकत गेलो. जोर घुमवणार्‍या पोरांचे आवाज कानावर आले.. "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" "हुंयक हुंय्या!" - "हुंयक हुंय्या!" हळूच दरवाजा लोटून आत डोकावलो. डावीकडे जमिनीलगत समोरासमोर दोन भलेमोठे आरसे लावलेले होते आणि त्याच्यासमोर दोन्ही बाजूला पोरे एकमेकांकडे तोंडे करुन जोर घुमवत होती!

हिवाळी ऑलिंपिक मध्ये देवदास मधील गाण्यांवर आईस डान्स

अश्विनीका ·
सध्या व्हॅनकुव्हर , कॅनडा येथे हिवाळी ऑलिंपिक चालू आहे. हे २१ वे हिवाळी ऑलिम्पिक आहे . इथे फेब्रुवारी १२ ते २८ ह्या दरम्यान बर्फावरील खेळ खेळले जात आहेत. ह्यात बर्फावरील हॉकी , फिगर स्केटिंग (बर्फावर पायात स्केट्स घालून नाच), स्पीड स्केटिंग (पळण्याच्या स्पर्धेसारखीच पण पायात स्केट्स घालून बर्फाच्या ट्रॅक वरून पळणे), स्की जम्पिंग, फ्री स्टाईल आणि क्रॉसकंट्री स्किइंग , स्नोबोर्डिंग, स्लेईंग अशा अनेकविध स्पर्धा चालू आहेत. व्हॅनकुव्हर ला जाणे शक्यच नव्हते तरी घरच्या घरी टिव्ही वर ह्या स्पर्धा बघायला मजा येत आहे.

मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती!

मेघवेडा ·
जेपी यांची 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा' ही लेखमाला वाचल्यावर सतत क्रिकेटवर काहीतरी लिहीण्याची खुमखुमी होत होती. आणि त्यात काल वीरू व सचिननं तर आज लक्ष्मण व धोनीनं शतकं झळकावून आयताच विषय पुढ्यात ठेवला! क्रिकेटवरचं लिखाण म्हणजे साहेबांचा उल्लेख हा आलाच! आमच्यासाठी ईशस्तवनच ते! साहेबांवर कितीही लिहीलं तरीही कमीच.. "निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू॥ अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥" हे शब्द आपल्या साहेबांच्या बाबतीतही लागू पडतात. गेली अडीच वर्षं तो उत्तम क्रिकेट खेळतोय आणि टीकाकारांना त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर आहे हे! एकामागून एक धावांचे आणि शतकांचे मैलाचे दगड ओलांडत चाललाय..

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....(आमचे मॅनेजमेंट गुरू)

जे.पी.मॉर्गन ·
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ आय टी मध्ये आल्यापासून खूप "जार्गन" ऐकायची सवय झालीये बघा. एकतर आपण स्वस्तात कामं करून देणारे नव्या जमान्याचे "बाबू" आहोत हे मान्य नसणारी (अथवा मान्य करायची इच्छा नसणारी) लोकं रात्रंदिवस शब्दकोष घेऊन आपल्या फुटकळ आत्मसन्मानाला गोंजारण्यासाठी असे जड-जड शब्द शोधून काढतात. प्रोजेक्टवर राबणारा इसम "रिसोर्स" असतो....