"तेजस्विनी" चे थाटाचे स्वागत

लेखनविषय:
केवळ कोल्हापुरालाच नव्हे तर सार्‍या महाराष्ट्राला, देशाला अत्यंत अभिमान वाटावा अशी "नेमा"ची सुवर्ण कामगिरी करून घरी परतलेल्या तेजस्विनी सावंतचा करवीरकरांनी अगदी हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत-सत्कार केला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हजारोंनी जणू काही आपली कन्याच, आपली लाडकी बहिणच पराक्रम गाजवून माहेरी आली आहे अशा भावनेने तिच्यावर खाली फोटोत दाखविल्याप्रमाणे कौतुकाचा वर्षाव केला.

पंछी बनू उडता फिरू...

लेखनविषय:
लेखनप्रकार
गरमागरम धिरडी हाणली तोवर १०:४५ झाले होते. ११ ला निघायचे म्हणजे सगळ्यांना १०:४५ पासून हल्या करायला सुरू केले (पीएम ची खोड.... )शेवटी ११:०५ मिनिटांनी ७ जवानांनी साओ कॉन्राडो बीच कडे कुच केली.. तिथे पॅराग्लायडींचे कार्यालय कुठे आहे ही माहिती एप्रिल मध्ये किंमत विचारून हिंमत न झाल्याने आधीच झाली होती. तरी एकदा गुगलबाबाला शरण गेलो पेद्रो बोनीतो रँप इथे माहिती वाचली. बिगफ्लाय ह्या कंपनीची साईट बघून घेतली..

बुद्धीबळ नियमांचे भाषांतर - बुद्धीबळप्रेमींना एक आवाहन - प्रकल्प पूर्ण झाला.

लेखनविषय:
लेखनप्रकार
बद्दु ह्यांच्या बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ह्या धाग्यावरुन एक कल्पना सुचली. मराठीत बुद्धीबळाचे नियम मला आंतरजालावर मिळाले नाहीत. एकट्याने भाषांतर करणे वेळखाऊ आहे. परंतु मिसळपावावरील बुद्धीबळप्रेमींनी त्यांचा थोडा थोडा वेळ देऊ केला तर हा भाषांतराचा उपक्रम आपण मिळून करु शकू.

बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...

लेखनविषय:
लेखनप्रकार
बुद्धीबळाचे नियम (मराठीत) ...आहे का कोणाकडे? क्रुपया लिन्क द्या..आम्च्या मन्डळाच्या बुद्धीबळ स्पर्धेसाठी हवे आहेत.. धन्यवाद.

द गेम ऑफ द सेंचुरी!

लेखनविषय:
१७ ऑक्टोबर १९५६. न्यूयॉर्कमधे रोझेनवॉल्ड चेस टूर्नामेंट सुरु होती. १३ वर्षाचा एक बालक त्याच्या दुप्पट वयाच्या इंटरनॅशनल मास्टर आणि अमेरिकन चेस चँपिअन असलेल्या डोनाल्ड बायरनसमोर बसला होता. लोक कुतुहलानं हा सामना बघायला जमले होते. त्यातही हा मुलगा काळी मोहोरी घेऊन खेळत होता त्यामुळे किती चालीत तो मात खातो आहे ह्याचेच आडाखे बहुदा बांधत असावेत पण त्यांना कल्पना नव्हती की त्यादिवशी ते एक इतिहास घडताना बघणार होते!

अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)

लेखनविषय:
परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला! विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्‍याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते.

लिएंडर पेसचे १२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद!

लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्ल्डकप फुटबॉलच्या रणधुमाळीत आपल्या (सुद्धा) नजरेतून एक महत्त्वाची बातमी सुटली म्हणायची! आपला लिएंडर पेस आणि झिम्बाब्वेची कॅरा ब्लॅक ह्या द्वितीय मानांकित जोडीने दक्षिण आफ्रिकेचा वेस्ली मूडी आणि अमेरिकेची लीसा रेमंड ह्यांचा ६-४, ७-६ (५) असा सरळ सेट्स मध्ये पराभव करून २०१० चे विम्बल्डन मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. पेसचे हे सहावे मिश्र दुहेरी तर एकुणात १२ वे ग्रॅन्डस्लॅम विजेतेपद आहे.

मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

लेखनप्रकार
डिस्केमर : १. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा. २. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत. वि. सु.

सायना नेहवालचे अभिनंदन

लेखनविषय:
लेखनप्रकार
सायना नेहवालने इंडियन ओपन, सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपन (पैकी शेवटच्या दोन मागच्या एकाच आठवड्यात) अशा सलग तीन सुपर सीरीज जिंकून भारताची मान उंचावली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खुट्ट झालं तरी त्या सवंग सानिया मिर्झाला प्रसिद्धी देणारी भारतीय माध्यमे गुणी, सिन्सिअर आणि मेहनती सायनाला देखील सध्या बर्‍यापैकी स्पेस देत आहेत हे पाहून आनंद होतो आहे. कालची मॅच ज्यांना पाहायला मिळाली ते भाग्यवान. आपले जे. पी. मॉर्गन सायनावर कधी लिहिणार याची वाट पाहतो आहे. - बॅडमिंटनप्रेमी अप्पा

पॅराग्ल्यायडींग

लेखनविषय:
अनुभव लिहायचा प्रयत्न पहील्यांच करतो आहे बघु केती जमतो का. (१० वी च्या परीक्षीतील निबंधानंतर थेट १२ वर्षानंतर) कामशेत जवळ तुंग आणी तिकोन्या च्या जवळ असलेल्या टेकाडाजवळ टेंपल पायलट या पुणास्थित संस्थेने ने २ ३ ४ मे २००८ साली पॅराग्ल्यायडींग बेसिक कोर्स आयोजित केला होता. २ तारखेला दुपारी कामशेत हायवे जवळील धाब्यावर जमायचे होते. तिकडे १ तास तांत्रीक बाबी समजावुन सांगितल्या. रोज दुपारी २.०० ते ३.०० पर्यंत तांत्रीक बाबी १/२ तास धाबा ते टेकडी सुर्यास्ता पर्यंत सराव असा दिनक्रम होता पहील्या दिवशी फोटोत दाखवल्या प्रमाणे ग्लायडर घेउन धावयला लावले.
Subscribe to क्रीडा