मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"तेजस्विनी" चे थाटाचे स्वागत

इन्द्र्राज पवार · · कलादालन
केवळ कोल्हापुरालाच नव्हे तर सार्‍या महाराष्ट्राला, देशाला अत्यंत अभिमान वाटावा अशी "नेमा"ची सुवर्ण कामगिरी करून घरी परतलेल्या तेजस्विनी सावंतचा करवीरकरांनी अगदी हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत-सत्कार केला. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या हजारोंनी जणू काही आपली कन्याच, आपली लाडकी बहिणच पराक्रम गाजवून माहेरी आली आहे अशा भावनेने तिच्यावर खाली फोटोत दाखविल्याप्रमाणे कौतुकाचा वर्षाव केला. (फोटो "ई-सकाळ" सौजन्याने) Photobucket" alt="Tejswini1" /> महाद्वार रोडवरील मिरवणूक Photobucket आई, धाकटी बहिण आणि भाऊ यांच्यासमवेत Photobucket शासन व महापालिकेतर्फे स्वागत Photobucket शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर Photobucket शेवटी करवीरनिवासिनी माता "अंबाबाई" चा आशीर्वाद मिपावरील सर्व सदस्यांना म्युनिक, जर्मनी इथे तेजस्विनीने केलेल्या विश्वविक्रमाची माहिती झालीच आहे, तर तिला या निमित्ताने दिल्ली राष्ट्रकुल आणि लंडन ऑलिम्पिक्ससाठी हार्दिक शुभेच्छा!
लेखनविषय:

वाचने 3634 वाचनखूण प्रतिक्रिया 11

समंजस 11/08/2010 - 13:05
तेजस्विनीचे अभिनंदन !! अशीच कामगीरी पुढेही होत राहो या बद्दल शुभेच्छा.

स्पंदना 11/08/2010 - 15:25
उत्तम फोटो बद्ध माहिती. तेजस्विनीच हार्दीक अभिनंदन!! कोल्हापुरच दर्शन घडवल्या बद्दल थँक्स इंद्राज दा.

In reply to by स्पंदना

मला नक्की जाणीव होती की तुझा नेमका असाच प्रतिसाद येणार. महाद्वार रोड अगोदरच गर्दीने वाहुन जातो, आणि तेजस्विनीमुळे तर आणखीनच. हत्तीच्या मागे असलेल्या चांदीचा रथ पहा. अगोदर त्यातूनही तिची मिरवणूक निघाली.

असुर 11/08/2010 - 23:11
अतिशय देखणं स्वागत. आवडलं हे.वे.सां.न.ला. तेजस्विनीने अशीच यशाची नव-शिखरे गाठो या आणि अशा कोटी शुभेच्छा! -- बुल्स आय